Home Breaking News डेक्कन पोलीस ठाण्याची मोठी कारवाई – मोबाईल चोरीतून ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

डेक्कन पोलीस ठाण्याची मोठी कारवाई – मोबाईल चोरीतून ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

62
0
पुणे : डेक्कन पोलीस ठाण्याच्या पथकाने मोबाईल चोरीत मोठे यश मिळवले असून तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सीईआयआर (Central Equipment Identity Register) या तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत वाढ होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा गुन्ह्यांचा तपास सोपा झाला आहे. या कारवाईतून जप्त केलेल्या मोबाईलमुळे अनेक पीडितांना दिलासा मिळणार आहे.
 मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी punepolice.gov.in किंवा https://www.ceir.gov.in/ या संकेतस्थळावर माहिती नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तक्रारीची नोंदणी झाल्यानंतर संबंधित मोबाईल नेटवर्क ब्लॉक केले जाते, ज्यामुळे चोरट्यांना मोबाईल वापरणे अशक्य होते आणि तपास सुलभ होतो.
डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व त्यांच्या पथकाच्या या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. डेक्कन पोलिसांची मोठी कारवाई – ४.५० लाखांचा मोबाईल चोरीचा मुद्देमाल जप्त