निष्पाप नागरिकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या बेफिकीर केबल जाळ्यावर तात्काळ कारवाई करा; आमदार अमित गोरखे यांचा प्रशासनाला इशारा
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत केबल आणि इंटरनेट वायरींचे जीवघेणे जाळे पसरले असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे आता निष्पापांचे बळी जाऊ लागले आहेत. काल सेक्टर २६ परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, या 'डेथ ट्रॅप'ला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार? असा संतप्त सवाल आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केला आहे. सेक्टर २६ परिसरात वाय-फाय केबल गळ्यात अडकून...
“करदात्यांसाठी महत्त्वपूर्ण बदल: नवीन कर स्लॅब सुधारित, स्टँडर्ड डिडक्शन वाढवले”
"कर स्लॅब 2024-25: स्टँडर्ड डिडक्शन वाढले, नवीन कर रेजिममध्ये बदल; करदात्यांना किमान १७,५०० रुपयांची बचत: वित्तमंत्री" नवीन कर रेजिम आयकर स्लॅब 2024-25: मोदी सरकारने मध्यमवर्गीय आणि आयकरदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांसाठी स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. यासोबतच, नवीन कर स्लॅबमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. या बजेटमध्ये, अर्थमंत्री निर्मला...
महाराष्ट्रातील वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसवण्यासाठी ३१ मार्च २०२५ अंतिम मुदत; २ कोटी वाहनधारकांसाठी नवी अट.
मुंबई: महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनचोरी रोखणे व वाहनांची ओळख सुसंगत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सुमारे दोन कोटी वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली असून, यानंतर अटींचे पालन न करणाऱ्या वाहनमालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. तांत्रिक वैशिष्ट्ये व महत्त्व: हाय...
भक्ती, फिटनेस आणि पर्यावरणाचा अनोखा संगम; दहावी पुणे–पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न, २३५० सायकलस्वारांचा विक्रमी सहभाग
पुणे : वारकरी परंपरेचा आध्यात्मिक वारसा आणि आधुनिक काळातील आरोग्य-जागरूकतेचा सुंदर मिलाफ घडवून आणणारी इंडो अथलेटिक्स सोसायटी आयोजित दहावी पुणे–पंढरपूर सायकल वारी यंदा अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. देहू येथील गाथा मंदिरातून पहाटे प्रस्थान केलेल्या या सायकल वारीत तब्बल २३५० सायकलस्वारांनी सहभाग घेत २३५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करत पंढरपूर गाठले. यंदा सायकल वारीच्या दहाव्या पर्वानिमित्त विक्रमी सहभाग...
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सापडली महिलेची संशयास्पद मृतदेहाची पोतडी; पोलीस तपास सुरू.
तळेगाव दाभाडे : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे) वर शिरगाव फाट्याजवळ महिलेचा संशयास्पद मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह पोत्यात आढळला असून महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पिंपरी-चिंचवड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रकरणाची माहिती: आज दुपारी १२:३० वाजता सुमारे १०० मीटर अंतरावर सोमाटणे एक्झिटजवळ हा मृतदेह सापडला. अंदाजे ३०-४० वयोगटातील या महिलेचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होता, ज्यामुळे तिची...
मुंबईजवळ 76 एकरांवर भव्य गृहनिर्माण प्रकल्प; NeoLiv ची 500 कोटींची मोठी गुंतवणूक
मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून NeoLiv कंपनीने मुंबईजवळील पनवेल-खोपोली पट्ट्यात तब्बल 76 एकर जागेवर भव्य गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी कंपनी सुमारे 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यामुळे मुंबई महानगर परिसरातील रिअल इस्टेट बाजाराला मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल-खोपोली परिसरातील 76 एकर जमीन...
सांगलीचा प्रणव देशाच्या पातळीवर झळकला! ‘परीक्षा पे चर्चा 2026’ साठी महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थ्याची निवड
सांगली : सांगलीच्या मातीने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली असून महाराष्ट्राच्या लेकराने थेट देशाच्या पातळीवर झेंडा रोवला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित ‘परीक्षा पे चर्चा 2026’ या उपक्रमासाठी देशभरातून तब्बल 4.5 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या प्रचंड स्पर्धेतून केवळ 36 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील...
कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष ते मराठी साहित्याची सेवा; अरुण बोऱ्हाडे यांच्या बहुआयामी कार्याचा महापालिकेकडून सन्मान…
पिंपरी, दि. २१ ऑगस्ट २०२६ :- कामगार चळवळ, सामाजिक व राजकीय क्षेत्र आणि मराठी साहित्यविश्वात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणारे मोशी येथील ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ कामगार नेते तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अरुण तुकाराम बोऱ्हाडे यांचा आज महापालिका सभेत मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. अरुण बोऱ्हाडे यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात कामगार, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. पिंपरी-चिंचवड...
तेजज्ञान फाउंडेशनचा रौप्य जयंती महोत्सव उत्साहात साजरा; अभिनेता सोनू सूद यांनी दिला ध्यानाचा संदेश
पुणे-गेल्या २५ वर्षांपासून समाजात सकारात्मक विचार रुजवणाऱ्या तेजज्ञान फाउंडेशनचा रौप्य जयंती महोत्सव सिंहगड रोड येथील मनन आश्रमात उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेता व चित्रपट निर्माता सोनू सूद यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: सोनू सूद यांनी वृक्षारोपण केले आणि सर्व साधकांसोबत ध्यानधारणेत सहभागी झाले. फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती घेत त्यांनी आश्रम परिसराचा दौरा केला. दीप प्रज्वलनाने...
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केली निगडी प्राधिकरण अग्निशमन केंद्राच्या कामाची पाहणी…
दि.१८ फेब्रुवारी २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निगडी प्राधिकरण येथे नवीन अग्निशमन केंद्राच्या इमारतीच्या काम सुरू आहे. या इमारतीच्या कामाची महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी संबधित अधिका-यांकडून कामाची माहिती घेत काम मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य़ विभागाअंतर्गंत निगडी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवनाजवळ अत्याधुनिक अशा अग्निशमन क्रेंद्राचे काम...











