Breaking News
बॉम्बे हायकोर्टचा महाराष्ट्र सरकार व सिंहगड कॉलेजवर जोरदार हल्लाबोल; विद्यार्थिनीला परत शिक्षणाचा अधिकार, परीक्षेस बसण्याची मुभा
पुणे | २८ मे २०२५ — ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात इंस्टाग्रामवर टीका करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक करून तिला शिक्षण आणि परीक्षा देण्यापासून रोखणाऱ्या कारवाईवर बॉम्बे हायकोर्टाने जोरदार फटकारा दिला आहे. न्यायालयाने विद्यार्थिनीच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाल्याचे सांगत तिला परीक्षा देण्यास परवानगी दिली असून, कॉलेजला तिच्या निलंबनाचा पुनर्विचार करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर टीका, नंतर अटक सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील ही...
मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात नवी खळबळ! लोकप्रिय इन्फ्लुएंसर ‘ओरी’ ANC समोर हजर; तपासाची दिशा बदलण्याची शक्यता
मुंबईच्या मनोरंजन व सोशल मीडिया जगतात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. देशातील लोकप्रिय इन्फ्लुएंसर ओरी (Ori) बुधवारी मुंबई पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स सेल (ANC) समोर स्वतः हजर झाले. काही दिवसांपासून त्यांचे नाव एका संभाव्य ड्रग्ज नेटवर्कशी जोडले जात असल्याने हा तपास अधिकच गतीमान झाला आहे. ओरीच्या ANC कार्यालयातील उपस्थितीनं मीडिया, चाहत्यांमध्ये आणि डिजिटल जगतात मोठी चर्चा झाली आहे. अनेक लोक ANC...
उत्तर प्रदेशातील गोंडा रेल्वे अपघात: प्रवासी, जखमींवर उपचार सुरू, रेल्वे सेवेवर परिणाम
लखनऊ : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. एका प्रवासी रेल्वेचे डबे रुळांवरून घसरल्याने अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून, काही जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रेल्वे सेवेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणत आहे. ➡️ घटनास्थळी मदतकार्य सुरू: अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले असून, गंभीर...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान….
पिंपरी, १७ मार्च २०२६ :- महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला स्वतः सक्षम झाल्यानंतर ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला सक्षम करीत असते. त्यामुळे आज प्रत्येक महिला सक्षम व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबवणे गरजेचे असून त्यासाठी महापालिकेचा समाज विकास विभाग सक्षमपणे कामकाज करीत आहे असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने चिंचवड...
पावसाळ्यापूर्वी महापालिकेची युद्धपातळीवरील तयारी; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची नाले व नदीपात्रांची प्रत्यक्ष पाहणी
पिंपरी : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मान्सूनपूर्व तयारीला वेग दिला असून शहरातील संभाव्य पूरस्थिती, पाणी साचण्याच्या समस्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध नाले, नदीपात्रे आणि सखल भागांची प्रत्यक्ष पाहणी करत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण...
सलमान खानला ‘माफी मागा नाहीतर ५ कोटी भरा’ धमकी; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा खळबळजनक इशारा.
सलमान खानला मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण युनिटकडे नवीन धमकी; वाचायचं असेल तर मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा ५ कोटी दंड भरावा लागेल. मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोमवारच्या दिवशी एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण युनिटला संदेश पाठवून सांगितले की, सलमान खानने मंदिरात जाऊन काळवीट हत्या प्रकरणात माफी मागावी किंवा...
पॅरिस ऑलिम्पिक्समधील विजेत्यांचा सन्मान: पंतप्रधान मोदींच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार, भारताचे ऑलिम्पिक स्वप्न 2036 च्या दिशेने
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी आयोजित केला. या ऑलिम्पिक्समध्ये भारताने 6 पदके जिंकून आपल्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनातील दुसरा सर्वोत्तम विक्रम नोंदवला. यात दोन पदके जिंकून इतिहास घडवणारी शूटर मनू भाकरही सहभागी होती, जिने पंतप्रधान मोदींना आपल्या यशामागील पिस्तूलाची माहिती दिली. इतर पदक विजेते शूटर सारबजोत सिंह आणि स्वप्नील कुसाळे...
पुण्यातील कॅनरा बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला; २४ तासांत विधीसंघर्षित बालक ताब्यात, गुन्हे शाखा युनिट ६ ची कौतुकास्पद कारवाई!
पुणे | मांजरी खुर्द येथील कॅनरा बँकेत शनिवारी मध्यरात्री झालेल्या तिजोरी फोडण्याच्या प्रयत्नात गुन्हे शाखा युनिट ६ ने अवघ्या २४ तासांत एक विधीसंघर्षित बालक ताब्यात घेऊन मोठा गुन्हा उधडकीस आणला. अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने केलेल्या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या तपास कौशल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. घटनेचे सविस्तर विवरण दि. १३ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री मांजरी खुर्द येथील कॅनरा बँक शाखेचे बाहेरचे शटर...
ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन; शौर्यदिनानिमित्त मानवंदना
पुणे :- भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या २०८ व्या शौर्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पेरणेफाटा येथील विजयस्तंभास विधिवत अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी देशाच्या इतिहासातील शौर्य, समता आणि स्वाभिमानाच्या परंपरेला मानवंदना दिली. या अभिवादन सोहळ्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सह पोलीस आयुक्त रंजन...
पुण्यात टोळक्याची दहशत; कोयत्याने वार करून दोघांवर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल.
पुणे : पुण्यातील खडकी बाजार परिसरात बुधवारी दुपारी साडेबारा वाजता टोळक्याने दोन तरुणांवर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. रस्त्याच्या कडेला नाश्ता करणाऱ्या या दोघांवर कोणतेही पूर्वीचे वैर नसताना, टोळक्याने हल्ला करून परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी नितेश विनोद पवार (वय २४, रा. अरुणकुमार वैद्य वसाहत, खडकी बाजार) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी राहुल...









