Breaking News
डोंबिवलीच्या वीर पुत्रांना अश्रूपूरित श्रद्धांजली; सहस्रोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
डोंबिवली – एक शोकाकुल आणि हृदयद्रावक क्षण: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन नागरिक, अतुल मोणे, संजय लेले आणि हेमंत जोशी यांना आपले प्राण गमवावे लागले. मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर आज त्यांच्यावर डोंबिवली दत्तनगर येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. या अंतिम निरोपाच्या क्षणी संपूर्ण डोंबिवली शहर हळहळून गेले. बागशाळा मैदानावर ठेवले गेले अंत्यदर्शनासाठी पार्थिव:संध्याकाळच्या सुमारास डोंबिवलीतील बागशाळा...
बनावट भरती प्रक्रियेपासून सावध राहण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन
पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सध्या कोणत्याही पदासाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याची स्पष्ट माहिती प्रशासन विभागाने दिली आहे. अलीकडे समाजमाध्यमांवर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचे भासवणारी खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. तसेच महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे, उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध केली जात आहे. परंतु महानगरपालिकेकडून भरती प्रक्रियेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत आदेश अथवा सूचना...
पुण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; समर्थ पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, तीन सराईत गुन्हेगार जेरबंद
पुणे – शहरातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि कौशल्याने तीन सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे. या आरोपींनी चार लाखांहून अधिक रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पुणे शहर पोलिसांच्या दक्षतेचा आणि कार्यक्षमतेचा उत्तम नमुना ठरली आहे. घटना २५ जून २०२५ रोजी घडली होती. फिर्यादी यांच्या बंद...
‘लाच देण्याआधी १०० वेळा विचार करा!’ तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा; म्हणाले, ‘मी अहंकारी नाही, स्पष्टवक्ता आहे’
मुंबई : महाराष्ट्रात अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) कठोर कारवाई सुरू असतानाच, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रोखठोक भूमिकेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कारवाईदरम्यान कोणी लाच देण्याचा प्रयत्न केला आहे का, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “माझ्या बाबतीत लाच देण्याचे धाडस कोणी करेल असे मला वाटत नाही. जर कोणी...
२० वर्षांपासून विकास रखडला; फसवणूक व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप, व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
पिंपरी | प्रतिनिधी :पिंपरी येथील नमस्कार हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विनोद अनंता धुमाळ यांनी त्यांच्या कुटुंबाची तब्बल २० वर्षांपासून फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित व्यावसायिकांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी दापोडी पोलिसांकडे केली आहे. विकास करार करूनही ना विकासकाम झाले, ना करारानुसार मोबदला मिळाला, असा आरोप धुमाळ यांनी केला. धुमाळ यांनी सांगितले की, २२ डिसेंबर २००६ रोजी कायदेशीर...
एकाच तिकीटावर मुंबईकरांना सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ!
मुंबईच्या वाहतुकीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला गेला असून, एकाच तिकीटावर मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूकसेवा उपलब्ध होणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत "इंटीग्रेशन ऑफ तिकिटिंग सर्व्हिसेस" या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आजचा दिवस मुंबईच्या दळणवळणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. एका...
मुंबई, ठाणे, रायगड, पुण्यात जोरदार पाऊस; पालघरसाठी रेड अलर्ट! | हवामान विभागाचा इशारा गंभीर
मुंबई | २६ जुलै २०२५:- मुंबईसह उपनगरात शनिवारी सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान खात्याने सांगितले की, शनिवारी दिवसभरात आणि रविवारी सकाळपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ४०-५० किमी/तासापर्यंत जाऊ शकतो. पावसाचा डेटा - मुंबईसह...
पुणेकरांसाठी मोठी बातमी! कात्रज चौकातील वाहतूक पूर्ववत सुरू – ६ जूनपासून सर्व मार्ग खुले
वाहतूक पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय; काम पूर्ण झाल्यानंतर कात्रज चौक पुन्हा सर्व वाहनांसाठी खुला पुणे – कात्रज चौकात सुरू असलेले सेगमेंटल लाँचिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे, आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कात्रज चौक पुन्हा खुला करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी यासंदर्भात अधिकृत प्रेसनोट प्रसिद्ध केली आहे. दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने कात्रज मुख्य...
लोणावळ्यात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार; जिल्हाधिकाऱ्यांचा पाहणी दौरा, रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास सोमवारपासून सुरूवात!
लोणावळा – पर्यटनाच्या नकाशावर ओळख निर्माण केलेल्या लोणावळा शहरात एक नवीन विकास पर्व सुरू होण्याच्या दृष्टीने गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक व पाहणी दौरा पार पडला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार सुनील शेळके, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत शहरातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास सोमवारपासून...
मुंबई जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती; अंचल गोयल यांची नियुक्ती
मुंबई : महाराष्ट्र सरकारने मुंबई शहर जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकाऱ्यापदी अंचल गोयल (IAS) यांची नियुक्ती केली आहे. गोयल या 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांना नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर 31 जुलै 2023 रोजी नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी त्या परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. अंचल गोयल सध्या नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट...











