Home Breaking News मुंबई जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती; अंचल गोयल यांची नियुक्ती

मुंबई जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती; अंचल गोयल यांची नियुक्ती

157
0

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मुंबई शहर जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकाऱ्यापदी अंचल गोयल (IAS) यांची नियुक्ती केली आहे. गोयल या 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांना नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर 31 जुलै 2023 रोजी नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी त्या परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

अंचल गोयल सध्या नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (NSSCDCL) मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होत्या. त्यांच्या व्यापक अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांची मुंबई जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपूर हिंसाचार प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश

दरम्यान, नागपूर हिंसाचार प्रकरणावर बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, “महाराष्ट्र सरकार या परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळत आहे. या घटनेत कोणीही दोषी आढळल्यास पक्षभेद न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.”

जोशी यांनी सांगितले की, नागपूरमध्ये झालेल्या अशांततेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर महाराष्ट्र सरकार कठोर पावले उचलत आहे. या हिंसाचारात अनेक भागांत दगडफेक, जाळपोळ आणि अनुचित प्रकार घडले होते.