Breaking News
प्रभाग क्र. १० मधील नागरी समस्यांवर नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांच्याकडून ‘ऑन द स्पॉट’ तोडगा! पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची घेतली समन्वय बैठक
पिंपरी-चिंचवड, २५ मे २०२६ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर तातडीने, जागेवरच उपाययोजना करण्यासाठी एका विशेष समन्वय बैठकीचे आयोजन श्री सिद्धिविनायक मंदिर, संभाजीनगर, चिंचवड येथे आमदार श्री. अमितजी गोरखे यांच्या नेतृत्वाखाली आणि नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या बैठकीत नागरिकांनी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर थेट आपल्या समस्या मांडल्या, ज्यावर अधिकाऱ्यांनी...
‘सावधान रहा, सुरक्षित रहा’ हेच नवे ब्रीदवाक्य – गोपनीय माहिती शेअर न करता स्वतःचा बचाव करा; महिलांसाठी विशेष हेल्पलाईन उपलब्ध
पिंपरी-चिंचवड | सोशल मीडिया हे आजच्या घडीला संवादाचं महत्त्वाचं माध्यम ठरलं असलं, तरी याच माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग व सावध राहण्याची गरज आहे. सोशल मीडियावर गुप्त माहिती शेअर न करता, योग्य प्रायव्हसी सेटिंग्ज ठेवून, अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट टाळून स्वतःचा बचाव करता येतो. मोबाईल क्रमांक, आधार-पॅन कार्ड फोटो, घराचा पत्ता यांसारखी माहिती सार्वजनिक करणे धोकादायक ठरू...
भारत रत्न सचिन तेंडुलकर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदिच्छा भेट; सुपुत्र अर्जुनच्या विवाहाचे निमंत्रण
मुंबई : क्रिकेट विश्वातील विक्रमादित्य आणि भारतरत्न Sachin Tendulkar यांनी आज पत्नी Anjali Tendulkar यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ सुपुत्र अर्जुन तेंडुलकर यांच्या विवाहाचे औपचारिक आमंत्रण दिले. भेटीदरम्यान राज्यातील क्रीडा सुविधा, युवकांसाठीच्या प्रशिक्षण योजना, ग्रामीण भागातील क्रीडा संकुलांची उभारणी तसेच खेळाडूंसाठीच्या आर्थिक सहाय्य योजनांवर सविस्तर चर्चा झाली. शासनाच्या...
लोकमान्य हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन; कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा हॉस्पिटलला सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम
पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी) :- गेल्या ४० वर्षांपासून रुग्णसेवेत अग्रेसर असलेल्या चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलमधील जवळपास ४०० परमनंट (कायमस्वरूपी) कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या १० ते ११ महिन्यांचा थकीत पगार आणि कोरोना काळातील हक्काचे मानधन न मिळाल्यामुळे या संतप्त कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. या आंदोलन स्थळी उपस्थित राहून राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यवस्थापनाच्या...
पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न.
पिंपरी, २६ जानेवारी २०२६ - पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आशा किरण सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला या महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी एकत्र येत सूर्यनमस्कार सादर करून योग व उत्तम आरोग्याचा संदेश दिला. या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच...
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून राष्ट्रपती पदक विजेत्या आणि इंडियन आयडॉल फेम अबोली जरीत यांचा भव्य सत्कार; दिव्यांगांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरलेला प्रवास
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रपती पदक विजेत्या, "सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन" पुरस्कार प्राप्त आणि इंडियन आयडॉल फेम गायिका Aboli Jarit यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महापौर Ravi Landge यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्याने सभागृहात प्रेरणादायी आणि भावनिक वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला आयुक्त Dr. Vijay Suryavanshi, स्थायी समिती सभापती...
स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे पोलिसांना सन्मान – ‘पोलीस पदक फॉर मेरिटोरियस सर्व्हिस’ जाहीर
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील विविध पोलीस दलातील धाडसी आणि प्रामाणिक कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘पोलीस पदक फॉर मेरिटोरियस सर्व्हिस’ जाहीर केले आहे. या यादीत पुणे शहर पोलिसांचा ठसा उमटला असून, पोलीस दलातील निष्ठा, कार्यतत्परता आणि धाडस दाखवणाऱ्या अनेकांना हा सन्मान मिळाला आहे. या पदकासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी विविध गुन्ह्यांच्या तपासात उत्कृष्ट यश मिळवले आहे. गुन्हे उकलण्यात तांत्रिक...
*महापालिका शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आदर्श केंद्र बनाव्यात, हीच आमची भूमिका – महापौर रवि लांडगे…*
*पिंपरी - महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, जिज्ञासू वृत्ती जोपासावी आणि अभ्यासासोबतच खेळ, कला व संस्कार यांनाही तितकेच महत्त्व द्यावे. पालक, शिक्षक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडणार असून महापालिका शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची...
महाराष्ट्र–पंजाब आध्यात्मिक नात्याला नवी दिशा; संत नामदेवांच्या घुमान येथे संतपीठाचा अभ्यास दौरा संपन्न
पिंपरी चिंचवड: शीख संप्रदायाचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब मध्ये संत परंपरेतील अनेक संतांच्या वाणीसह संत शिरोमणी संत नामदेव यांच्या अभंगांचा समावेश आहे. ही बाब महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील आध्यात्मिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करणारी ठरते. भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारा हा सांस्कृतिक वारसा दोन्ही राज्यांना एका सूत्रात बांधतो आणि राष्ट्रीय एकात्मतेचे सुंदर उदाहरण ठरतो, असे प्रतिपादन...
नवी दिल्लीत भारत–श्रीलंका मैत्रीला नवे बळ; राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा
नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. श्रीलंकेचे राष्ट्रपती Anura Kumara Dissanayake यांनी भारत दौऱ्यावर असताना उच्चस्तरीय चर्चा केली. या भेटीत दोन्ही देशांतील अलीकडील प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच भविष्यातील सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सखोल विचारविनिमय झाला. भारत आणि Sri Lanka यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यावर...









