Home Breaking News निगडीत रिक्षा पलटीचा अपघात : मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले मदतीला धावले; माणुसकीचा...

निगडीत रिक्षा पलटीचा अपघात : मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले मदतीला धावले; माणुसकीचा मोठा संदेश

161
0
निगडी परिसरातील पुणे गेट हॉटेल समोर घडलेल्या अपघातात एका रिक्षाचा अचानक पलटी होऊन मोठी दुर्घटना टळली. या अपघातात एक महिला आणि रिक्षाचालक अडकले असताना, नशिबाने त्या मार्गावरून जात असलेले मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ मदतीचा हात दिला.
सचिन चिखले हे कामानिमित्त देहूकडे जात होते. त्यावेळी रस्त्यावर एक रिक्षा (MH-14 KU-7411) उलटलेली दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःची गाडी थांबवली आणि कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित नागरिकांनीही त्वरित मदतीला धाव घेत रिक्षातील महिला व चालकाला सुखरूप बाहेर काढले. ही कृती केवळ साहसी नव्हे तर समाजाच्या हितासाठी तत्परतेचं उत्तम उदाहरण आहे.
जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ती सुरळीत केली.
सचिन चिखले यांच्या या माणुसकीच्या आणि संवेदनशीलतेच्या कृतीचे परिसरात सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. त्यांच्या पुढाकारामुळे मोठा अनर्थ टळला, हे स्पष्टपणे दिसून आले.
मनसे कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक जबाबदारीचा भान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. अपघातग्रस्तांना मदतीचा हात देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, अशा प्रसंगात राजकीय पदे न भूता, मानवतेच्या आधारावर केलेले कार्य अधिक महत्त्वाचे ठरते.