Home Breaking News तडीपार आदेशाचा भंग करणारा आरोपी जेरबंद! गुन्हे शाखा युनिट ३ ची कौतुकास्पद...

तडीपार आदेशाचा भंग करणारा आरोपी जेरबंद! गुन्हे शाखा युनिट ३ ची कौतुकास्पद कारवाई

49
0

पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सतत सज्ज आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे कोथरूड परिसरात तडीपार आदेशाचा भंग करून लपून बसलेल्या एका आरोपीस अचूक माहितीच्या आधारे पकडण्याची धडाकेबाज कारवाई.

दि. १८ जून २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस पथक आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या निर्देशानुसार पेट्रोलिंग करत होते. सपोफौ पंढरीनाथ शिंदे आणि पोलीस अंमलदार अमोल काटकर हे खाजगी वाहनाने पौडफाटा, कोथरूड परिसरात गस्त घालत असताना त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुणे शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला आरोपी अक्षय शांताराम सावंत (वय ३०, रा. शिवणे, पुणे) हा सध्या सागर कॉलनी, कोथरूड येथील आपल्या काकाच्या घरी थांबला आहे.

सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रंगराव पवार यांना देण्यात आली. त्यानंतर तत्काळ कृती करत, गुन्हे शाखा युनिट ३ चे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, मात्र पोलिसांनी शर्तीचा निर्धार करत वेळीच त्यास पकडून जेरबंद केले.

अधिक तपासात निष्पन्न झाले की, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३ पुणे शहर यांच्या आदेश क्र. ३१/२०२३ नुसार अक्षय सावंत यास पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून दि. ११/१०/२०२३ पासून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, त्याने कोणत्याही अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता आदेशाचा भंग करत कोथरूडमध्ये वास्तव्यास होतो.

त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ नुसार गुन्हा नोंदवून, पुढील कारवाईसाठी कोथरूड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

🔹 अचूक माहिती, तत्पर कारवाई: तडीपार आरोपीच्या मुसक्या आवळल्या!
🔹 पोलिसांची सजगता आणि नियोजनामुळे गुन्हेगार गजाआड!
🔹 पुणे पोलिसांकडून कायदा तोडणाऱ्यांना स्पष्ट इशारा!

ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-१) श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या ऑपरेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सपोफौ पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारू, पोलीस अंमलदार अमोल काटकर, विशाल भिलारे, अक्षय गायकवाड आणि महिला पोलीस अंमलदार अर्चना वाघमारे यांनी सहभाग घेतला.