Home Breaking News पोलीस अधिकाऱ्यांच्या उज्वल कार्याचा गौरव!

पोलीस अधिकाऱ्यांच्या उज्वल कार्याचा गौरव!

127
0

पुणे | प्रतिनिधी:- पोलीस दलातील उत्कृष्ठ तपास कौशल्य, निष्कलंक सेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकांचे वितरण समारंभ यंदा दि. १३ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता पोलीस संशोधन केंद्र, पाषाण, पुणे (सी.पी.आर.) येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा. पोलीस महासंचालक यांच्या हस्ते होणार असून राज्यातील एकूण ११ पोलीस अधिकाऱ्यांना सन २०२२ मधील उत्कृष्ट तपास कार्याबद्दल हा सन्मान बहाल करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकुशलतेद्वारे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे.

कायदेशीर व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या पुरस्काराने पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होते. गुन्हेगारी जगताला आव्हान देणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या तपास कौशल्यामुळे अनेक गुन्हे मार्गी लागले आहेत. हे पदक हे केवळ वैयक्तिक यश नसून महाराष्ट्र पोलीस दलाची सामूहिक ताकद आणि सेवा भावनेचे प्रतीक आहे.

या कार्यक्रमासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू-भगिनी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा सोहळा माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरणार असून पोलीस दलाच्या कार्याची ओळख सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात मीडियाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.