पुणे – पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्योती मनोज बनकर (वय 30, व्यवसाय ग्राफिक डिझायनर) यांनी आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या पतीने वारंवार मारहाण, मानसिक छळ, शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप आहे.
पति अनैतिक संबंधांमध्ये गुंतला! पत्नी आणि मुलीला त्रास
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीचे बाहेर अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. सोशल मीडियावर “राज” आणि “रोहन” या बनावट नावांनी तो प्रोफाइल तयार करून महिलांना फसवत असल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे, तर घरातील पैसे आणि मौल्यवान वस्तू चोरून त्या महिलांवर खर्च करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दारूच्या नशेत शिवीगाळ आणि जीवघेण्या धमक्या!
महिलेने सांगितले की, तिचा पती रोज सकाळपासूनच दारू प्यायला सुरुवात करतो आणि नंतर घरी येऊन शिवीगाळ, मारहाण करतो. यापूर्वीही तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र त्याला समजावून सोडण्यात आले. त्यामुळे त्याचा छळ आणखी वाढला.
गॅस सिलिंडर लीक करून जीव घेण्याचा प्रयत्न!
सर्व हद्द पार करत, 28 मार्च 2025 रोजी आरोपी पतीने गॅस सिलिंडर लीक करून पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर त्याच्या मित्रांना बोलावून तिला मारहाण करण्याची धमकी दिली.
अतिशय धक्कादायक स्थिती – पत्नी आणि मुलगी भयभीत!
पीडित पत्नीने सांगितले की, तिच्या व मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तिने चार दिवस शेजाऱ्यांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला. मात्र आरोपी पती तिथे जाऊनही शिवीगाळ व धमक्या देत आहे.
पोलीस कारवाईची मागणी!
पीडित महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली असून, त्वरित गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.