गुन्हेगारी
विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई — घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ८ गुन्ह्यांची उकल
पुणे शहरातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने दिवाळीच्या दिवसांत घरफोडी आणि दुकाने उचकटण्याच्या मालिकेमागील सराईत टोळीचा धडाकेबाज पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून एकूण ८ घरफोडी गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादाची, तांत्रिक तपासाची आणि कठोर मेहनतीची उज्ज्वल उदाहरण ठरली आहे. गुन्हा कसा झाला? – धाडसी पद्धतीने कडी...
पुणे शहरात ट्रिपल सीट वाहनचालकांवर मोठी कारवाई; दोन दिवसांत २६४९ प्रकरणे नोंद
पुणे शहर वाहतूक पोलीस यांच्या वतीने ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. दिनांक १२/०२/२०२६ व १३/०२/२०२६ रोजी पुणे शहर वाहतूक विभाग आणि सर्व पोलीस ठाण्यांनी संयुक्तरित्या ही मोहीम हाती घेतली. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आणि वाहतूक शिस्तीचा अभाव लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. शहरभर एकाच वेळी धडक कारवाई पुणे शहरातील प्रमुख रस्ते, गर्दीचे चौक आणि वाहतूक दाटीच्या भागांमध्ये एकाच...
पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ५० हून अधिक घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद!
पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांत घडलेल्या सततच्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अखेर ५० हून अधिक घरफोड्या करणाऱ्या एका कुख्यात चोरट्याला जेरबंद करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. १७ लाखांच्या मुद्देमालासह अट्टल गुन्हेगाराला अटक शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचत हर्षद गुलाब पवार (वय...
पुणे हादरलं! शिवसेना युवा नेते निलेश घारे यांच्या कारवर गोळीबार, वॉरजे परिसरात मध्यरात्री थरार – पोलिस तपास सुरू
पुण्यातील वॉरजे परिसरात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या घटनेने शहर हादरले आहे. शिवसेनेच्या युवा विभागाचे नेते निलेश घारे यांच्या कारवर अज्ञात दोघांनी गोळीबार केला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा थरार – अवघ्या काही मिनिटांत कारवर गोळीबार मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे 11:30 वाजता निलेश घारे हे वॉरजेतील गणपती मठा भागातील आपल्या कार्यालयात आले होते....
पुण्यात पुन्हा निर्घृण हत्या: पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर कुऱ्हाडीने हल्ला.
पुणे: हडपसर येथे काल मध्यरात्री झालेल्या एक धक्कादायक घटनेत वित्त व्यवस्थापक वासुदेव कुलकर्णी (वय 45) यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. विशेष म्हणजे, हा हल्ला फुरसुंगी-सासवड रोडवरील पोलीस स्टेशनपासून अवघ्या 300 मीटर अंतरावर रात्री 2:30 वाजता घडला, ज्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोबाईल हॉटस्पॉटवरील किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोरांचा...
पुण्यात पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करून पसार झालेल्या सराइतांचा सोलापूरमध्ये पर्दाफाश
पुणे: हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत गंभीर घटना घडली. दोन दुचाकीस्वारांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, आरोपींनी सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाले. आरोपी निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १९, तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय २०, हडपसर), आणि अमरसिंग जग्गरसिंग टाक (वय २३) यांना सोलापूर परिसरातून अटक करण्यात...
आई-वडिलांशी किरकोळ वाद… आणि थेट पुण्याला! पुणे पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे १६ वर्षीय मुलगी सुखरूप घरी परतली
पुणे :- हिंगोली जिल्ह्यातील एका लहानशा गावातून अचानक बेपत्ता झालेली १६ वर्षीय मुलगी पुण्यात सापडली. आई-वडिलांशी झालेल्या किरकोळ वादामुळे मानसिक तणावात आलेल्या या मुलीने कोणालाही न सांगता घर सोडले आणि पुणे गाठले. मात्र पुणे शहरातील पोलिसांच्या सजगतेमुळे आणि सहृदयतेमुळे ही मुलगी सुखरूप आपल्या कुटुंबाकडे परतली. पुण्यात पोहोचल्यावर ही मुलगी बुधवार पेठ परिसरात एकटीच फिरत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती, चिंता आणि...
सिंहगड रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई! तडीपार गुन्हेगारांकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त
पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तडीपार गुन्हेगारांवर जोरदार कारवाई करत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई २४ मार्च २०२५ रोजी करण्यात आली असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी प्रभावी हस्तक्षेप करत गुन्हेगारांना अटक केली आहे. 🔹 खंडु म्हेत्रेच्या मुसक्या आवळल्या! गावठी पिस्तूलसह ताबा सिंहगड रोड पोलिसांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तडीपार गुन्हेगार खंडु...
पिंपरी-चिंचवड: IT व्यावसायिकाची ₹७१ लाखांची फसवणूक; गुन्ह्यात सहभागी रशियन तरुणाला गोव्यातून अटक.
सायबर पोलिसांनी एका रशियन तरुणाला गोव्यातून अटक केली असून त्याच्यावर आयटी व्यावसायिकाची ₹७१.०५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपीने शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून हा गुन्हा केला. गुन्ह्याचा तपशील: आरोपी टॉनी उर्फ अनातोली मिरोनोव (३० वर्षे), मूळ रहिवासी ओरेनबर्ग सिटी, रशिया, सध्या हनुमान मंदिराजवळ, मंड्रेम, पेडणे, गोवा येथे राहत होता. त्याच्या विरोधात वाकड येथे राहणाऱ्या एका आयटी व्यावसायिकाने सायबर पोलिस...
भावानेच केला भावाचा खून! – ताम्हीणी घाटातील बेवारस मृतदेह प्रकरणाची उकल, अनिकेत शिर्के यास पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात
ताम्हीणी घाटात अलीकडेच सापडलेल्या बेवारस मृतदेहाच्या प्रकरणात एक धक्कादायक वळण आले आहे. मृत व्यक्तीचा खून त्याच्या सख्या भावानेच केल्याचे निष्पन्न झाले असून, वारजे माळवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. घटना कशी उघडकीस आली? दि. २६ जुलै २०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे हे कर्तव्यावर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, अनिकेत अनिल शिर्के या इसमाने त्याच्या सख्या...












