गुन्हेगारी
सराईत ३ आरोपींकडून ०४ गावठी पिस्तुलं आणि ०५ जिवंत काडतुसे जप्त
कळेपाडळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगारांच्या धाडसी टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ०३ रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून ०४ गावठी पिस्तुलं आणि ०५ जिवंत काडतुसे अशी मोठी शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली असून अंदाजे रु. 2,42,000/- चा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. या टोळीमुळे परिसरात गुन्हेगारी वाढू शकते, अशी शक्यता वर्तविली...
पास्तर बलजिंदर सिंगचा अमानवी कृत्यांचा पर्दाफाश – महिलांवरील हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज लीक!
नवी दिल्ली – पास्टर बलजिंदर सिंगवर महिलांसह त्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा आरोप सिद्ध करणारे सीसीटीव्ही फुटेज लीक झाले आहे. या धक्कादायक फुटेजमध्ये तो महिलांवर हिंसक हल्ला करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर यापूर्वीच एका तरुणीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे, पण अजूनही त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. 🔸 महिला सुरक्षेचा प्रश्न – कायदा केवळ बघ्याची भूमिका...
हडपसर पोलिसांचे यशस्वी ऑपरेशन; चांदीचे २ लाखांचे दागिने जप्त, ४ गुन्ह्यांची उकल
पुणे शहरातील हडपसर परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हडपसर पोलीस स्टेशनच्या सतर्क तपास पथकाने केवळ ३ विधिसंघर्षित बालकांना अटक करून थेट ४ घरफोडी प्रकरणांचा छडा लावला आहे. दि. २ जून २०२५ रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना हडपसर पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड आणि त्यांचा तपास पथक...
हरवलेल्या माऊलीला दिला दिलासा! पोलिसांच्या सतर्कतेमुळे ५५ वर्षीय महिला सुखरूप पोहोचली दिंडीमालकांच्या ताब्यात
वारीतील गर्दीत हरवलेल्या एका वरिष्ठ महिलेला शोधून काढून सुखरूप तिच्या दिंडीमालकांकडे सोपवण्याचा माणुसकीचा आणि तत्परतेचा आदर्श पुणे पोलीस दलाने पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. ठिकाण: मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्द, पुणे वारीचा उत्साह आणि भक्तिरस भरलेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे शहरातून सुरू असताना, एक ५५ वर्षीय महिला – सीता दत्तात्रय ठाकूर, रा. दसखार, भटआळी – या वाऱ्याच्या वेगासारख्या चालणाऱ्या दिंडीत...
सिंहगड कॉलेज परिसरात कोयत्याचा थरार! आरोपी तन्मय भुयारीला भारती विद्यापीठ पोलिसांची शिताफीने अटक; विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा निर्माण झाली शांतता
पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात कोयत्याने हल्ला करत दहशत माजवणाऱ्या तन्मय भुयारी या आरोपीला अखेर भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ५.३० वाजता ही घटना घडली. फिर्यादी व्यक्ती चहा पिण्यासाठी थांबले असताना, आरोपी तन्मय भुयारी व त्याचा साथीदार ज्ञानेश्वर जाधव यांनी रागाच्या भरात फिर्यादीवर लोखंडी हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे सिंहगड कँपस...
वानवडी खुनाचा थरार: अवघ्या ६ तासांत आरोपींना गजाआड; पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
पुणे – वानवडी परिसरातील शांतीनगर येथे ताडीच्या दुकानात खून झाल्याप्रकरणी अवघ्या ६ तासांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने आरोपींना ताब्यात घेत संपूर्ण शहराचे लक्ष वेधले आहे. दि. २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता, शांतीनगर, वानवडी येथील सरकारमान्य ताडीच्या दुकानावर झालेल्या वादात मलंग महेबुब कुरेशी (वय ६०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. आदिल शेख,...
सलमान खानला ‘माफी मागा नाहीतर ५ कोटी भरा’ धमकी; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा खळबळजनक इशारा.
सलमान खानला मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण युनिटकडे नवीन धमकी; वाचायचं असेल तर मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा ५ कोटी दंड भरावा लागेल. मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोमवारच्या दिवशी एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण युनिटला संदेश पाठवून सांगितले की, सलमान खानने मंदिरात जाऊन काळवीट हत्या प्रकरणात माफी मागावी किंवा...
मराठी भाषेत बोलल्यामुळे एका मराठी विद्यार्थ्यावर अमराठी विद्यार्थ्याकडून मारहाण
नवी मुंबईतील वाशी परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. फक्त मराठी भाषेत बोलल्यामुळे एका मराठी विद्यार्थ्यावर अमराठी विद्यार्थ्याकडून मारहाण करण्यात आली. ही घटना मराठी अभिमान आणि अस्मितेवर आघात करणारी असल्याची तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. घटनेनंतर संबंधित मराठी विद्यार्थ्याने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्री. संजय धुमाळ यांची...
पुणे पोलिसांची लोकाभिमुख कामगिरी — युनिट ६ ने शोधले २५ हरवलेले मोबाईल; मालकांना परतवाटपाची प्रक्रिया सुरू
पुणे — शहरातील वाढत्या मोबाईल चोरी आणि हरवलेल्या फोनच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ ने पुन्हा एकदा उल्लेखनीय कार्य करत २५ हरवलेले मोबाईल फोन जप्त करून त्यांच्या मुळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.सुमारे ₹५,११,०००/- किंमतीच्या या मोबाईल फोनचा मालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास पोलिसांच्या काटेकोर तांत्रिक तपासामुळे शक्य झाला. 🔹 सीईआयआर पोर्टलची मदत — तांत्रिक विश्लेषणातून...
बकरी ईद सणासाठी परिमंडळ ५ मध्ये महत्त्वपूर्ण समन्वय बैठक; मौलाना, ट्रस्टी, कुरेशी आणि प्रशासनाची उपस्थिती
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० मे २०२५ रोजी सायं. ४.३० ते ५.३० दरम्यान परिमंडळ ५ कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत परिमंडळ ५ मधील सर्व मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, कुरेशी समाजाचे प्रतिनिधी, पुणे मनपा व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, कत्तलखान्याचे मुकादम तसेच स्थानिक पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन आगामी बकरी ईद सणाचे शांततेत आणि...








