केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर दुःखाचा डोंगर; वडील किसनराव मोहोळ यांचे निधन, राजकीय व सामाजिक क्षेत्रातून श्रद्धांजलीचा वर्षाव
पुणे : केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील आदरणीय किसनराव मोहोळ यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. आज कोथरूड येथे त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक मान्यवर, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. किसनराव मोहोळ यांच्या निधनामुळे...
फुगेवाडी विषारी दारूकांडाचे पडसाद विधानसभेत; १९ निष्पाप बळींच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांची ‘लक्षवेधी’
पिंपरी-चिंचवड : फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात बनावट व विषारी हातभट्टी दारू सेवनामुळे तब्बल १९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालेल्या धक्कादायक घटनेचे पडसाद आता राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटणार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी सूचना दाखल केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि अवैध दारू माफियांचे...
*महापालिका शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आदर्श केंद्र बनाव्यात, हीच आमची भूमिका – महापौर रवि लांडगे…*
*पिंपरी - महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, जिज्ञासू वृत्ती जोपासावी आणि अभ्यासासोबतच खेळ, कला व संस्कार यांनाही तितकेच महत्त्व द्यावे. पालक, शिक्षक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडणार असून महापालिका शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची...
आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत महापालिकेत आढावा बैठक संपन्न
पिंपरी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसेच सर्व आवश्यक सुविधा नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीत पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, आपत्कालीन...
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून राष्ट्रपती पदक विजेत्या आणि इंडियन आयडॉल फेम अबोली जरीत यांचा भव्य सत्कार; दिव्यांगांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरलेला प्रवास
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रपती पदक विजेत्या, "सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन" पुरस्कार प्राप्त आणि इंडियन आयडॉल फेम गायिका Aboli Jarit यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महापौर Ravi Landge यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्याने सभागृहात प्रेरणादायी आणि भावनिक वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला आयुक्त Dr. Vijay Suryavanshi, स्थायी समिती सभापती...
साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुणे-साईनगर शिर्डी थेट रेल्वे सेवेचा भव्य शुभारंभ; प्रवास होणार अधिक सोयीस्कर आणि जलद
पुणे : लाखो साईभक्तांची अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली असून पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यान सुरू करण्यात आलेल्या थेट रेल्वे सेवेचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या नव्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे पुणे, अहमदनगर आणि शिर्डी परिसरातील नागरिक तसेच साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाला...
पाच महिन्यांनंतर भाविकांसाठी खुलं झालं भीमाशंकर मंदिर; ऑनलाइन नोंदणी अनिवार्य, VIP दर्शन पूर्णपणे बंद
पुणे : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. विकासकामांमुळे 9 जानेवारी 2026 पासून बंद असलेले हे मंदिर 15 जूनपासून दर्शनासाठी खुले झाले असले तरी जिल्हा प्रशासनाने यावेळी काही कठोर नियम लागू केले आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात...
पिंपरीत किरकोळ वादातून चाकू हल्ला; लिफ्ट परिसरातील घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निवासी इमारतीतील लिफ्ट परिसरात शू रॅकवर थुंकण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच गंभीर हाणामारीत बदलला आणि एका तरुणाने थेट चाकू काढून एका व्यक्तीवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात...
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरूजी यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी शासकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये केलेले कार्य प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवून त्यांनी सरकारी शाळांचा कायापालट घडवून आणला. वाबळेवाडी आणि जळिंदरनगर येथील शाळांमध्ये त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगांमुळे केवळ विद्यार्थी संख्येत मोठी वाढ झाली नाही, तर त्या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांच्या रांगा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे....
कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या “जागतिक शांतता कराराचे” स्वागत!
पिंपरी :- गेल्या काही दिवसांपासून आखाती देशात सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीबाबत सकारात्मक करार होत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे जागतिक स्तरावर सुटकेचा श्वास घेतला जात असून, या युद्धात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...





