शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर उभं शहर पुन्हा सुवर्णकाळाकडे; राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचारमुक्त विकासाचा निर्धार
पिंपरी-चिंचवड हे शहर शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन, धर्मनिरपेक्ष मूल्यांवर उभं राहिलं आहे. गेल्या २५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसवर एकही भ्रष्टाचाराचा ठोस आरोप सिद्ध झालेला नाही. उलट, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (JNNURM) यांसारख्या महत्त्वाच्या योजनांतून हजारो कोटी रुपयांचा निधी शहरासाठी आणून पिंपरी-चिंचवडला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेची ओळख मिळवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक...
खून, बलात्कार व ‘मोका’खालील फरार आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक!
पुणे शहरात गेल्या दोन वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आणि ‘मोका’ अंतर्गत घोषित आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातून फरार असलेल्या विशाल लक्ष्मण भोले (वय ३२, रा. दुष्काळ झोपडपट्टी, ताडीवाला रोड, पुणे) याला पोलिसांनी ३१ जुलै रोजी अटक केली. आरोपीने फिर्यादी महिलेला खोटे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. आपले आधीच लग्न झाले आहे हे लपवून फिर्यादीच्या...
पुणे पोलिसांची भव्य कारवाई! आंतरराज्य बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती रॅकेटचा पर्दाफाश – 36 जण ताब्यात, 21 शस्त्रे जप्त
संघटित गुन्हेगारीविरोधातील मोठा विजय मिळवत, पुणे पोलिसांच्या झोन-4 आणि क्राईम ब्रांचच्या विशेष पथकाने आंतरराज्य बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती व तस्करी रॅकेटचा मोठा भंडाफोड केला आहे. या धडक मोहिमेत 36 संशयितांना ताब्यात, तर 21 अवैध शस्त्रांसह मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणातील कारवाईमुळे संपूर्ण गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. शस्त्र तस्करीचा पहिला धागा – 21 शस्त्रांची जप्ती पोलिसांनी गेल्या 3...
ताथवडे येथे उभारले जाणार पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालय; २० हेक्टर जमीन हस्तांतरणाचा मार्ग मोकळा, शहराच्या सुरक्षेला मिळणार नवे बळ
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक सक्षम आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे स्वतंत्र मुख्यालय, परेड ग्राऊंड आणि इतर प्रशासकीय कार्यालयांसाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील तब्बल २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली...
1 ऑगस्टपासून NPCI ने लागू केले नवीन FASTag नियम; 31 ऑक्टोबरपर्यंत नियमांचे पालन करणे आवश्यक.
1 ऑगस्ट 2024 पासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने टोल संकलन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, ट्रॅफिकची गर्दी कमी करण्यासाठी आणि देशाच्या रस्त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवीन FASTag नियम लागू केले आहेत. या बदलांसोबतच, वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यांची अद्ययावतता सुनिश्चित करावी लागणार आहे, अन्यथा टोल प्लाझांवर त्रास सहन करावा लागू शकतो. पालन न केल्यास होणारे परिणाम: 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत नवीन नियमांचे पालन...
पुण्यात भाजी विक्रेत्या महिलेचा विनयभंग; कथित नगरसेवकाच्या फोन कॉलने खळबळ.
पुणे, १३ डिसेंबर २०२४: वडगाव शेरी भागातील कथित नगरसेवकाने एका भाजी विक्रेत्या महिलेला फोन करून "मी तुला आवडतो, तुझ्या दुकानावर येतो" असे म्हणत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला, वय ३०, हिने दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा सात वाजता तिच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून...
श्री तुळशीबाग गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मदतनिधी वितरित
पुणे – गणेशोत्सव म्हटला की सर्वसामान्यांच्या मनात उत्साहाची लहर उसळते, मात्र त्याचवेळी अनेक मंडळे सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित घटकांसाठी विधायक कार्यही करत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला, ज्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर...
मतदान जनजागृतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून व्हिंटेज कार रॅलीचे आयोजन
पिंपरी : लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे, १५ जानेवारी रोजी राज्य शासनाने निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्या दिवशी सर्वप्रथम शहरातील सर्व मतदारांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, आपले मतदान ही आपली जबाबदारी असून आपल्या कर्तव्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांनी केले. पिंपरी चिंचवड...
महापुरुषांच्या देशसेवेचा आणि सामाजिक कार्याचा आदर्श घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची वाटचाल सुरु – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर
पिंपरी, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ – माजी पंतप्रधान भारतरत्न, इंदिरा गांधी यांनी देशाच्या विकास, स्वावलंबन आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले तर माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा पाया घालून अखंड भारताची निर्मिती केली, या थोर व्यक्तींच्या देशसेवेचा आणि सामाजिक कार्याचा आदर्श घेत महापालिका कार्य करत आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. माजी पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच...
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघात! तब्बल १३ वाहनांचा झाला चुराडा, वाहनचालकांत घबराट
पुणे | मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी एक भीषण साखळी अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल १३ वाहने एकमेकांवर आदळून चुरडून गेली, परिणामी महामार्गावर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. धुकं, भरधाव वेग आणि निष्काळजीपणा ठरले कारण! प्राथमिक माहितीनुसार, घनदाट धुकं, ओला रस्ता आणि वाहनचालकांचा भरधाव वेग हे या दुर्घटनेचे प्रमुख कारण ठरले आहे. अनेक वाहनचालकांना वेळेत ब्रेक न लागल्याने, एकामागोमाग एक...









