संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या वतीने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या संयुक्त कारवाईमध्ये सुमारे ८७५ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत झोपडीचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली, उप आयुक्त अण्णा बोदडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई...
११ वर्षांनी कैद्याचा पर्दाफाश! पोलीस हत्येच्या गुन्ह्यातील दोषी शिताफीने अटकेत
पुणे :- तब्बल ११ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत आयुष्य जगणाऱ्या आणि पोलीस हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या आरोपीला अखेर पुणे पोलिसांनी अत्यंत शिताफीने जेरबंद केले. कर्नाटकातील गुलबर्गा येथे एका पोलीस अंमलदाराच्या हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला अमरीश काशीनाथ कोळी (वय ४५, मुळगाव घाटगे लेआउट, कलबुर्गी, कर्नाटक, सद्य: रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे) हा कैदी शासकीय रुग्णालयातून २०१४ मध्ये पळून गेला होता. अखेर...
वाकडमधील फिनिक्स मॉलबाहेर हवेतील गोळीबार; सीसीटीव्हीत कैद, आरोपी अटकेत.
पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकडमधील फिनिक्स मॉलच्या बाहेर मंगळवारी (१६ सप्टेंबर) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने हवेतील गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. फिनिक्स मॉल हा परिसरातील सर्वात मोठा आणि प्रमुख मॉल म्हणून ओळखला जातो, आणि येथे अनेक लोक खरेदीसाठी आणि मनोरंजनासाठी येत असतात. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी गोळीबार केल्यानंतर संबंधित आरोपी पळून गेला, मात्र हा सर्व...
विचारांशी तडजोड नाही! अनेक पक्षांच्या ऑफर धुडकावून प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; टिळक भवनमध्ये भव्य सत्कार सोहळा
पुणे | प्रतिनिधी — पुण्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशांत जगताप यांच्यासोबत पुण्यातील...
वाघोली पोलिसांची कारवाई – दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त!
पुणे | २२ जुलै २०२५ – पुणे शहरातील वाघोली व हडपसर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी करून नागरिकांचे दागदागिने लांबवणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीचा वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली असून ४ लाख ३३ हजार २२६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून अचूक कारवाई मा. वरिष्ठांच्या सूचनांनुसार सुरू असलेल्या गुन्हा...
गुन्हे शाखा युनिट-03 ची मोठी कारवाई! टोळक्यासह गंभीर गुन्हे करणारा शिताफीने अटक — धारदार हत्यारे, पिस्तूल व मोटारसायकल जप्त
पुणे शहर गुन्हे शाखा, युनिट-03 ने आणखी एक उल्लेखनीय कारवाई करत शहरातील गुन्हेगारी जगताला मोठा धक्का दिला आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आणि अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रेडारवर असलेला शिताफीने फिरणारा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार युनिट-03 च्या अधिकार्यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर चोरी, मारहाण, जीवघेणी हल्ला, शस्त्रास्त्र बाळगणे, गंभीर...
लग्नाचे आमिष, आंतरराष्ट्रीय फसवणूक – ३.६० कोटींचा गंडा घालणाऱ्या ‘डॉ. ओबेरॉय’चा पर्दाफाश!
पुणे | ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईटवरून विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल ₹३.६० कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट नावाने shaadi.com वर प्रोफाईल तयार करून महिलांशी ओळख वाढवणाऱ्या डॉ. रोहित ओबेरॉय उर्फ अभिषेक शुक्ला (रा. लखनऊ, सध्या पर्थ, ऑस्ट्रेलिया) याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. या प्रकरणात इतर आंतरराष्ट्रीय आरोपींचाही सहभाग असल्याचे...
स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे पोलिसांना सन्मान – ‘पोलीस पदक फॉर मेरिटोरियस सर्व्हिस’ जाहीर
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील विविध पोलीस दलातील धाडसी आणि प्रामाणिक कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘पोलीस पदक फॉर मेरिटोरियस सर्व्हिस’ जाहीर केले आहे. या यादीत पुणे शहर पोलिसांचा ठसा उमटला असून, पोलीस दलातील निष्ठा, कार्यतत्परता आणि धाडस दाखवणाऱ्या अनेकांना हा सन्मान मिळाला आहे. या पदकासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी विविध गुन्ह्यांच्या तपासात उत्कृष्ट यश मिळवले आहे. गुन्हे उकलण्यात तांत्रिक...
सात वर्षांनंतर अखेर बदली! पिंपरी न्यायालयातील सहाय्यक सरकारी वकिलांची ‘उचलबांगडी’; बार असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी न्यायालयात सात वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या सहाय्यक सरकारी वकिलांच्या बदलीच्या निर्णयामुळे कायदे क्षेत्रात आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दिनांक ३० जून २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार सहाय्यक सरकारी वकील साधना बाळासाहेब बोरकर यांची बदली करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने सातत्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना महत्त्व...
नसरापूर संतापाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात धक्कादायक घटना; ९ वर्षीय नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, आजोबा ताब्यात
पुणे | पर्वती : नसरापूरमधील भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Parvati परिसरात ७० वर्षीय व्यक्तीने आपल्या ९ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघड झाला आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झोपडपट्टी भागातील एका घरात घडली. आरोपीने मुलीला एकटे पाहून तिच्यावर अत्याचार करण्याचा...











