पुण्यातील रस्त्यावर जीव धोक्यात घालून अश्लील चाळे; सार्वजनिक शिस्तीला सुरूंग!
पुणे – महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि निषेधार्ह घटना समोर आली आहे. शिंदेवाडी – खेड-शिवापूर मार्गावर एका धावत्या दुचाकीवर एका जोडप्याने अश्लील चाळ्यांचे प्रदर्शन करत संपूर्ण शहराची अब्रू झाकली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काय आहे नेमकी घटना? ▪️ व्हायरल व्हिडिओमध्ये...
मोकाच्या गुन्ह्यातील १० महिन्यांपासून फरार आरोपीला पुणे पोलिसांनी अखेर गजाआड केलं!
पुणे – पुणे शहरातील गुन्हेगारी जगताला हादरवणाऱ्या एका मोठ्या यशामध्ये, कोंढवा पोलिसांनी मोकाच्या (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) गुन्ह्यातील १० महिन्यांपासून फरार असलेला आरोपी हर्ष संतोष जाधव (वय १९, रा. गोकुळनगर, कोंढवा बु.) याला अटक करून एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. हर्ष जाधवविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२१४/२०२४ अंतर्गत भारतीय दंड संहिता, आर्म अॅक्ट व मोकासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल...
ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन; शौर्यदिनानिमित्त मानवंदना
पुणे :- भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या २०८ व्या शौर्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पेरणेफाटा येथील विजयस्तंभास विधिवत अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी देशाच्या इतिहासातील शौर्य, समता आणि स्वाभिमानाच्या परंपरेला मानवंदना दिली. या अभिवादन सोहळ्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सह पोलीस आयुक्त रंजन...
पुणे मेट्रो मंडई स्टेशनच्या ग्राउंड फ्लोअरवर वेल्डिंगदरम्यान लागलेल्या आगीनं धुराचे लोट; पाच अग्निशमन गाड्यांच्या मदतीने पाच मिनिटांत आग आटोक्यात.
पुणे: मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पुणे मेट्रोच्या मंडई स्टेशनच्या ग्राउंड फ्लोअरवर ठेवलेल्या फोम मटेरियलला अचानक आग लागली. आगीमुळे संपूर्ण स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले. पुणे अग्निशमन विभागाने तत्काळ पाच अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले आणि अवघ्या पाच मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. वेल्डिंगदरम्यान लागली आग प्राथमिक माहितीनुसार, स्टेशनच्या कामादरम्यान वेल्डिंगचे काम...
२८ एप्रिलला पिंपरी चिंचवड शहरातील सायंकाळचा पाणीपुरवठा राहणार बंद
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी जलशुद्धीकरण केंद्र येथे करण्यात येणाऱ्या स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे उद्या मंगळवार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार, दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करून सहकार्य...
कुदळवाडीत महापालिकेची मोठी कारवाई! ५ दिवसांत ४६५ एकर भूभाग अतिक्रमणमुक्त
पिंपरी:- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) आणि पोलीस प्रशासनाने मिळून कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेत आजपर्यंत २,०५२८ अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत. गेल्या ५ दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या या मोहिमेत तब्बल ४६५ एकर भूभाग अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे. ५ दिवसांत लाखो चौरस फूट भूभाग मोकळा महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या...
३० कोटींच्या कर्जप्रकरणात धक्कादायक फसवणूक! माजी आमदार संजय जगताप यांच्यासह कुटुंबाच्या बनावट सह्या; बंगला जप्तीचा प्रयत्न उघड
पुणे– शहरात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये माजी आमदार संजय जगताप आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल ₹३० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. बनावट सह्या करून त्यांचं सिंध सोसायटीतील बंगला आणि सासवडमधील मालमत्ता जप्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जगताप यांच्या पत्नी, आई, भाऊ आणि वहिनी यांच्या खोट्या सह्या करून कर्जाचे नूतनीकरण करण्यात आले, असा...
पुरस्थितीवर महापालिकेची सतत नजर : नागरिकांसाठी तातडीच्या मदतसेवा सज्ज
पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे १०० टक्के भरल्याने आणि सततच्या पावसामुळे नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आपली संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ मदतसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला असून, नागरिकांना आवाहन केले आहे की आपत्कालीन परिस्थितीत त्वरित 020-67331111 / 020-28331111 या...
घरफोडी गुन्ह्यातील पाहिजे आरोपी कात्रज येथून जेरबंद; गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान मोठे यश
पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने सतत वाढत असलेल्या घरफोडी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केलेल्या काटेकोर पेट्रोलिंगमधून एक मोठे यश हातात घेतले आहे. पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी कात्रज परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने तत्काळ कारवाई करत आरोपीला जेरबंद केले. गोपनीय माहिती आणि वेगवान कारवाई दिनांक ०६/१२/२०२५ रोजी रात्रीच्याच वेळी गुन्हे शाखा युनिट २...
सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्यांवर पुणे पोलिसांचा धडक अॅक्शन! चार जणांना अटक, १३ इंस्टाग्राम अकाऊंटवर गुन्हा दाखल
पुणे शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करून समाजात भीती आणि दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही धडक मोहीम हाती घेतली. 📌 गुन्हेगारीच्या महिमा मंडनाविरोधात कठोर पावले! गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विशेषतः इंस्टाग्राम आणि फेसबुकवर गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या....












