पुणे विमानतळ पोलीस स्टेशनची मोठी कारवाई – १२ किलो गांजासह इसम जेरबंद; ३ लाखांचा अंमली पदार्थ जप्त
पुणे | शहरामध्ये अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. विमानतळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका इसमाला १२ किलो गांजासह अटक केली असून, जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे ₹३,००,००० इतकी आहे. ही कारवाई दि. २२ जून २०२५ रोजी लोहगाव येथील कर्मभूमीनगर परिसरात करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे अचूक कारवाई पोलिस उप-निरीक्षक नितीन राठोड यांना गोपनिय बातमीदारा मार्फत...
गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाची कुशल कारवाई; दोन चोरीच्या मोटारसायकलीसह आरोपीच्या मुसक्या आवळल्या
पुणे – शहरातील हडपसर आणि लोणीकाळभोर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पोलीस दलाने या प्रकरणी चौकशी सुरू केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.दिनांक २० मे २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस अधिकारी व अंमलदार गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार अमित बोडरे आणि चेतन शिरोळकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एक संशयित इसम...
महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात
पिंपरी, दि. ३ मार्च २०२५ - महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करणे तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख, गतिमान प्रशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या लोकशाही दिन उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि...
गुंड गजा मारणेला सोशल मीडियाच्या चित्रफिती महागात पडल्या – पुणे पोलिसांनी थेट गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर केलं
पुणे: गुंड गजा मारणे उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील्स महागात पडल्या. पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढवणाऱ्या या चित्रफितीमुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे याची तब्बल चार तास चौकशी केली. यावेळी मारणेचे सोशल मीडिया अकाउंट देखील तपासण्यात आले. गजा मारणे याच्या "GM Boys" या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या साथीदारांनी "गजा मारणे डॉन" व "भाई" अशा प्रकारच्या रील्स...
माजी आमदार, शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे यांचे निधन; मावळने गमावला एक विचारवंत नेतृत्व
पुणे : मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते, शिक्षणमहर्षी आणि माजी आमदार कृष्णराव धोंडिबा भेगडे (वय ८९) यांचे सोमवारी (दि. ३० जून) रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. द्रष्ट्या नेतृत्वाचा अंत – शिक्षणासाठी आयुष्यभर झटणारे व्यक्तिमत्त्वकृष्णराव भेगडे हे शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श नाव होते. त्यांनी शिक्षण प्रसारासाठी झटत...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजासकट दोन विद्यार्थी अटक.
पुणे, दि. ५ डिसेंबर २०२४: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ज्याला शिक्षणाचे माहेरघर मानले जाते, तेथे गांजा आढळल्याने खळबळ उडाली आहे. चतुःशृंगी पोलिसांनी याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपशील: प्रा. संजयकुमार पुंडलिकराव कांबळे (वय ४६, रा. दापोडी) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी प्रतीक अंकुश गुजर (वय २०, रा. पिरंगुट, मुळशी) आणि आकाश मयांक ब्रह्मभट...
‘कौल पुण्याचा’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती; पुण्याच्या विकासासाठी भाजपचा निर्धार अधिक दृढ
पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कौल पुण्याचा’ या भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पुणेकरांचा विश्वास आणि शहराच्या विकासासाठीचा संकल्प या कार्यक्रमातून अधिक ठामपणे अधोरेखित झाला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि...
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; पुरंदरच्या भूमी अभिलेख अधिकारी मनीषा भोसले यांचा मृत्यू.
पुणे: मुंबई-पुणे महामार्गावर खडकी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी (दि. २५) भीषण अपघातात भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी मनीषा विजयसिंह भोसले (वय ४०, रा. कवठे महांकाळ, सांगली) यांचा मृत्यू झाला. भरधाव एसटी बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भोसले यांची नुकतीच पुरंदर तालुक्यात बदली झाली होती. त्या पिंपरीतील चिखली येथे आपल्या भावाकडे आल्या होत्या....
कोंढव्यातील स्पा सेंटरवर पुणे पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, स्पा मॅनेजर महिलेला अटक
पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत ४ पीडित महिलांची सुटका केली असून एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या पथकाने केली. दि. ०७ मार्च २०२६ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, कोंढवा येथील...
पुण्यातून फरार झालेला विश्वासघातकी चालक अखेर गजाआड! सव्वा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे, ३० जुलै २०२५: पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विश्वासघातकी चालकाने मालकाच्या कामासाठी आणलेली पगाराची रक्कम चोरून पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मात्र, पोलिसांनी चाणाक्ष तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी सलमान यासीन पठाण (वय ३२, रा. ठाणे) याला अखेर ठाण्यातून अटक केली आहे. काय घडलं होतं? फिर्यादीच्या गाडीतून मजुरांचा पगार देण्यासाठी १५ लाखांहून अधिक रोख रक्कम...











