पुणे

Home पुणे Page 164

आमदार अमित गोरखे यांच्या निवेदनाची दखल घेत महापालिका आयुक्तांनी भामा आसखेड धरणातील गाळ काढण्यासाठी जिल्हा जलसंधारण विभागाला दिले तातडीचे आदेश

0

पिंपरी-चिंचवड शहराला भेडसावणारी पाण्याची तीव्र टंचाई दूर करण्यासाठी आणि भविष्यातील पाणीसाठा सुरक्षित करण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी पाऊल उचलले आहे. भामा आसखेड धरणातील साचलेला गाळ काढून धरणाची मूळ साठवण क्षमता वाढवण्यात यावी, यासाठी आमदार गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जिल्हा जलसंधारण विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे...

वैष्णवी हगवणे प्रकरण : आदिती तटकरे यांनी पालकांची भेट घेऊन सांत्वन केलं; “अन्यायग्रस्त वैष्णवीस न्याय मिळवून देणं ही आपली नैतिक जबाबदारी”

0

पुणे | मुळशी :- वैष्णवी हगवणे या तरुणीच्या दुर्दैवी व संशयास्पद मृत्यूप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्या दुःखात सहभागी होत मनापासून सांत्वन केलं. या भेटीत बोलताना तटकरे म्हणाल्या, “ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. एका संवेदनशील मुलीचं आयुष्य अन्यायाच्या सावटाखाली संपलं, यापेक्षा...

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर दुःखाचा डोंगर; वडील किसनराव मोहोळ यांचे निधन, राजकीय व सामाजिक क्षेत्रातून श्रद्धांजलीचा वर्षाव

0

पुणे : केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील आदरणीय किसनराव मोहोळ यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. आज कोथरूड येथे त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक मान्यवर, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. किसनराव मोहोळ यांच्या निधनामुळे...

कस्पटे कुटुंबाला पिस्तुल दाखवणाऱ्या निलेश चव्हाणचा अखेर शिनेमा संपला! नेपाळ बॉर्डरवरून अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे मोठे यश!

0

पिंपरी-चिंचवड – वैष्णवी मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबाला संरक्षण देणारा व कस्पटे कुटुंबाला धमकावणारा निलेश चव्हाण याला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. गेल्या 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेशच्या अटकेने प्रकरणात मोठा वळणबिंदू आला आहे. देशभरात शोधमोहीम, पोलिसांची सात पथकं सक्रिय! निलेश चव्हाण याला पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या चार आणि पुणे पोलिसांच्या तीन पथकांनी संयुक्तरीत्या देशभर शोधमोहीम राबवली. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान,...

स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

0

पिंपरी, दि. ३ ऑगस्ट :- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक, 'प्रती सरकार'चे शिल्पकार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.  यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत...

मतदान केंद्रांवर थेट पाहणी; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा सुरक्षा व्यवस्थेवर कटाक्ष

0

पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येत असून, मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार सो. यांनी स्वतः विविध मतदान केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततामय आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. पाहणीदरम्यान श्री. अमितेश कुमार यांनी बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी...

पुण्यातील हिराबाग चौकात भीषण अपघात: चारचाकी आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

0

पुणे: पुण्यातील हिराबाग चौकात काल संध्याकाळी चारचाकी आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर दुचाकीस्वाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे कारण चारचाकी वाहन चालकाला अचानक आलेला दौरा असल्याचे समजले आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहन चालवणाऱ्या चालकाला अचानक दौरा आल्यामुळे त्याचे वाहन नियंत्रणाबाहेर गेले आणि समोर चालणाऱ्या दुचाकीला आणि पुढे असलेल्या रिक्षाला जोरदार...

संतोष देशमुख हत्या प्रकरण: फरार वाल्मिक कराड पुण्यात शरण, १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली

0

पुण्यात खळबळ माजवलेल्या संतोष देशमुख हत्येप्रकरणात अनेक दिवस फरार असलेले आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीसमोर शरण आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनलेल्या कराड यांना पुण्यात सीआयडी न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. काय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण? संतोष देशमुख यांची हत्या हे मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेले प्रकरण आहे. या घटनेमुळे देशमुख कुटुंबाला...

पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना टळली; स्थानिकांनी ७० विद्यार्थ्यांना शालेय बसमधून वाचवले

0

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शालेय बसचा चालक नियंत्रण गमावून बसला. या बसमध्ये प्रवास करणारे सत्तर विद्यार्थी वाचले. हा अपघात पिंपरी-चिंचवड येथील दाभाडे सरकार चौकात गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता झाला. शालेय बस रस्त्याच्या बाहेर जाऊन इंद्रायणी नदीच्या पुलाच्या लोखंडी रेलिंगवर अडकली आणि पुलाच्या संरचनेवर लोंबत राहिली. सतर्क नागरिकांनी त्वरित धाव घेत बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर...

पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर; गोळीबारात तरुणाचा मृत्यू

0

पुणे | गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहर हादरवणारी मोठी घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात झालेल्या गँगवॉरमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. या गँगवॉरमध्ये गोळीबार झाला असून, त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा...

Copyright ©