पुणे

Home पुणे Page 167

भारतीय सायकलिंगला गौरवशाली क्षण; हर्षवीर सिंग यांना ‘ब्ल्यू जर्सी’ने सन्मानित

0

पुणे | प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी एक अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला. मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या हस्ते सर्वोत्तम भारतीय सायकलपटू श्री. हर्षवीर सिंग यांना ब्ल्यू जर्सी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे भारतीय सायकलिंगच्या क्षितिजावर देशी खेळाडूंची चमक अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे. यावेळी स्पर्धेतील इतर विजेत्या भारतीय सायकलपटूंनाही पदके प्रदान करण्यात आली, तसेच...

पुणे पोलीसांची तिन्ही ठिकाणी मोठी कारवाई; विमानतळ, भारती विद्यापीठ आणि भ्रष्टाचार निरोधक पथकाची जप्ती एकूण २८ लाखांपर्यंत

0

पुणे शहरात पोलिसांनी तीन ठिकाणी एकाच वेळी मोठी कारवाई करत गुन्हेगारांना धक्का दिला आहे. विमानतळ पोलीस स्थानक, भारती विद्यापीठ पोलीस स्थानक आणि भ्रष्टाचार निरोधक पथकाने एकत्रितपणे केलेल्या या कारवात एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व कारवांतून एकूण २८ लाख रुपयांपर्यंतची संपत्ती जप्त केली गेली आहे. या कारवामुळे पुणे शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना मोठा यश मिळाला...

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या विविध कार्यालयास भेट

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या निवडणूक संबंधित तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांनी आज महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनास भेट दिली तसेच विविध कक्षांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी मुख्य निवडणूक निरीक्षक यांना अभिरक्षा कक्ष, प्रस्तावित मतमोजणी कक्ष, आचारसंहिता कक्ष तसेच नामनिर्देशन...

आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ‘चितळे बंधू’ दुकानफोडी प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद, तीन गुन्ह्यांचा उलगडा

0

पुणे : आंबेगाव परिसरातील नामांकित ‘चितळे बंधू’ दुकानात घरफोडी करून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत एका विधीसंघर्षित बालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या चौकशीत एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ₹1,24,600 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 10.15 ते दि. 26 जानेवारी रोजी सकाळी...

महाशिवरात्रीतही भीमाशंकर मंदिर राहणार बंद; कुंभमेळा २०२७ पार्श्वभूमीवर विकासकामांना वेग, भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

0

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या व्यापक विकासकामांमुळे यंदा महाशिवरात्रीच्या काळातही मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत दि. १२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मंदिर नित्यदर्शनासाठी...

ट्राफिक सिग्नल बंद पाडणाऱ्या बॅटरी चोरट्या टोळीचा वानवडी पोलिसांकडून पर्दाफाश; 34 बॅटरींसह चार जण जेरबंद, पाच गुन्ह्यांचा उलगडा

0

पुणे : शहरातील वाहतूक व्यवस्थेला थेट बाधा आणणाऱ्या ट्राफिक सिग्नल कंट्रोलर बॉक्समधील बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. सिग्नल लाईट गेल्यानंतरही बॅटरीवर चालणारी यंत्रणा ठप्प करून नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या या टोळीतील चार जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून तब्बल 34 बॅटऱ्या, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि इतर साहित्य असा सुमारे ₹1.68 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात...

भोसरीत गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष; गणेशभक्तांची अलोट गर्दी, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

0

भोसरी : भोसरी परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला गुरुवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, ढोल-लेझीमचा ताल, डीजेचा दणदणाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संपूर्ण भोसरी परिसर दुमदुमून गेला. गणरायाला निरोप देण्यासाठी भोसरीतील प्रमुख रस्त्यांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. भोसरी परिसरातील विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पडल्या. पारंपरिक वाद्ये, आकर्षक रथ, विद्युत रोषणाई, विविध सांस्कृतिक सादरीकरणे आणि भक्तांचा...

Copyright ©