पुणे

Home पुणे Page 158

‘स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’ – आमदार अमित गोरखे

0

पुणे : 'आजच्या तरुण पिढीमध्ये अफाट क्षमता आहे, मात्र मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ते स्वतःची खरी ताकद विसरत आहेत. करिअरच्या शर्यतीत धावताना शारीरिक आणि मानसिक फिटनेस जपला, तरच मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचा ‘स्व’ ओळखून, ध्येय निश्चित करून यशाकडे वाटचाल करावी,' असे प्रेरणादायी आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर...

सराईत ३ आरोपींकडून ०४ गावठी पिस्तुलं आणि ०५ जिवंत काडतुसे जप्त

0

कळेपाडळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगारांच्या धाडसी टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ०३ रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून ०४ गावठी पिस्तुलं आणि ०५ जिवंत काडतुसे अशी मोठी शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली असून अंदाजे रु. 2,42,000/- चा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. या टोळीमुळे परिसरात गुन्हेगारी वाढू शकते, अशी शक्यता वर्तविली...

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या घरगुती पाईपलाईन जोडणी कामकाज करिता प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता

0

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एम एन जी एल) कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांची आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या समवेत घरगुती पाईपलाईन जोडणी कामकाज संदर्भात नुकतीच बैठक घेण्यात झाली त्या बैठकीत कंपनीने कुशल मनुष्यबळ प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असून याबाबत महापालिकेने सहकार्य करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली, महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मोरवाडी येथे उपरोक्त विषयांकित प्रकरणी एमएनजीएल यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनपर कार्यक्रम व भरती मेळावा घेण्यात आला.यात संस्थेमधील प्लंबर या ट्रेडचे आजी व माजी विद्यार्थ्यांशी समक्ष संपर्क साधून...

पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ लागू; २२ जानेवारी २०२६ पर्यंत जमावबंदी आदेश जारी

0

पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यात कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, शस्त्रे, अस्खे सोडावयाची अस्त्रे...

लातूरचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प; महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ६१ उमेदवारांसह मैदानात – सभेत ठाम निर्धार

0

लातूर ही धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारी मराठवाड्याची महत्त्वाची भूमी आहे. डाळी, तेलबिया आणि धान्य व्यापारामुळे लातूरची ओळख देशभरात एक सक्षम व्यापारी केंद्र म्हणून आहे. अशा या लातूर भूमीत ग्रामदैवत सिद्धेश्वर-रत्नेश्वर, हजरत सुरज शहा वली आणि राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना नमन करून लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ निमित्त आयोजित भव्य सभेत उपस्थितांना संबोधित करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी...

धनकवडीत २५.९० लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; फॉरेक्स कंपनीतील कर्मचाऱ्यासह ६ जण अटकेत, चोरीचा ऐवज जप्त

0

पुणे : धनकवडी परिसरात घडलेल्या तब्बल २५ लाख ९० हजार रुपयांच्या रोख रक्कम आणि परकीय चलन लुटीच्या प्रकरणाचा सहकारनगर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत मोठे यश मिळवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दरोड्याचा सूत्रधार तक्रारदाराच्या फॉरेक्स कंपनीतच काम करणारा कर्मचारी असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह सहा आरोपींना अटक केली असून सुमारे २५ लाख २०...

उंद्री–हांडेवाडीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा; राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवृत्ती बांदल यांची १२ पाण्याच्या टाक्यांची महत्त्वाकांक्षी योजना

0

पुणे शहराच्या वेगाने वाढणाऱ्या दक्षिण उपनगरांमध्ये गंभीर बनलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आता मोठा उपाय सुचवण्यात आला आहे. Nivrutti Bandal यांनी उंद्री, हांडेवाडी, पिसोली, ऑटाडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी आणि उंद्री हिलटॉप परिसरातील लाखो नागरिकांना दिलासा देण्यासाठी किमान १२ उंच पाण्याच्या टाक्या उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या संदर्भात पुणे महापालिका आयुक्त Naval Kishore Ram यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलच्या...

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त

0

पुणे : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली "सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षिततेचा" या अभियानाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य व जनहित लक्षात घेता विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत १ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली...

पुण्यातील वानवडी पोलिसांची कठोर कारवाई; बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस ४ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा!

0

पुणे शहरातील वानवडी पोलिसांनी एका गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात उल्लेखनीय तपास करत आरोपीस शिक्षा होण्यासाठी सक्षम पुरावे सादर केले. वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हा क्रमांक ५९६/२०१७ नुसार, भादंवि कलम ३५४, ३५४ (A), ३५४ (ए) सह ‘पोस्को’ कायदा २०१२ अंतर्गत कलम ७, ८, ११, १२ नुसार, आरोपी आकाश महादेव कांबळे याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. ही संतापजनक घटना...

दिवसा ढवळ्या आळंदीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; मोकळ्या जागेत धाव घेत रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण

0

पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात मंगळवारी दिवसा ढवळ्या बिबट्या मोकळ्या जागेत धावत असल्याचा थरारक प्रकार समोर आला असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वडगाव रोड परिसरातील हा व्हिडिओ रहिवाशांनी आपल्या घरांच्या गच्चीवरून शूट केला असून, त्यात बिबट्या भरधाव वेगाने पळताना स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये काही नागरिक घाबरलेल्या अवस्थेत बिबट्याच्या मागे धावत असल्याचेही दिसत असून, काही क्षणांतच...

Copyright ©