बाणेर पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणारे सराईत चोरटे जेरबंद; लाखोचा मुद्देमाल जप्त
पुणे – बाणेर परिसरातील घरफोडीच्या मालिकांमुळे त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बाणेर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कौशल्यपूर्ण आणि कसोशीनं केलेल्या तपासातून ५४ लाखांहून अधिक रकमेच्या घरफोडी गुन्ह्याचा छडा लावत पाच सराईत आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला सोने, दुचाकी आणि मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीचा थरार – तपशीलवार हकीगत: दि. ७ जून ते ९...
प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित परिसंवादात विचारवंत, साहित्यिक आणि कलाकारांच्या तोंडून महामानवांच्या कार्याची प्रेरणादायी मांडणी
पिंपरी– क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला समतेचा, ममतेचा आणि सर्जनशीलतेचा लढा हा केवळ इतिहासातील एक अध्याय नसून, आजच्या समाजासाठी मार्गदर्शक तारा आहे. शिक्षण, स्त्री-पुरुष समता, शेतकरी न्याय, लोककला आणि संवाद या मूल्यांद्वारे त्यांनी सामाजिक परिवर्तनाचं जे बीज पेरले, ते आजही प्रेरणादायी आहे. या महामानवांची शिकवण केवळ स्मरणात न ठेवता ती आचरणात आणणे हाच...
यशाचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर अथक परिश्रम करा-प्रा.नितीन बानुगडे – “आयआयबी” तर्फे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
यशाचे रहस्य म्हणजे मागे हटणे नाही आणि अथक परिश्रम करणे आणि जर तुम्ही त्याचे पालन केले तर डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक बनण्याचा तुमचा दृढनिश्चय सार्थकी लागेल. “तुम्ही कोण आहात, यापेक्षा कोण होणार आहात, याचा विचार करा. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चांगले मार्गदर्शन घेण्यावर भर द्या. जितके जास्त कष्ट घ्याल, तितकेच मोठे यश मिळते. कुठलेही काम लहान, अवघड नसते. मनातून...
पुण्यातील बाणेरमध्ये स्पावर पुणे पोलिसांचा छापा; तीन महिलांची सुटका, व्यवस्थापक अटकेत, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश!.
पुणे, ५ डिसेंबर २०२४ – पुणे शहर गुन्हे शाखेने ३ डिसेंबर रोजी बाणेर येथील एका स्पावर छापा टाकून वेश्याव्यवसाय चालवल्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापकासह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही धडक कारवाई बाणेर रोडवरील बापूसाहेब मुरकुटे पाटील कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘मून थाई स्पा’ या केंद्रावर करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकाराची...
पुणे हादरलं! शिवसेना युवा नेते निलेश घारे यांच्या कारवर गोळीबार, वॉरजे परिसरात मध्यरात्री थरार – पोलिस तपास सुरू
पुण्यातील वॉरजे परिसरात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या घटनेने शहर हादरले आहे. शिवसेनेच्या युवा विभागाचे नेते निलेश घारे यांच्या कारवर अज्ञात दोघांनी गोळीबार केला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा थरार – अवघ्या काही मिनिटांत कारवर गोळीबार मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे 11:30 वाजता निलेश घारे हे वॉरजेतील गणपती मठा भागातील आपल्या कार्यालयात आले होते....
पुणे मनपा हद्दीतील २३ गावांसाठी मुंबईत विशेष बैठक; विकास निधी, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वसुली व कर्मचारी पुर्नसेवेवर महत्त्वाचे निर्णय
पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या प्रलंबित प्रश्नांवर आज सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक नागरी सुविधा, विकासकामे, कर्मचारी समस्या आणि आर्थिक नियोजनासंबंधी अनेक ठोस निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने पुणेकर नागरिकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली. विकासासाठी आर्थिक पाठबळ – फुरसुंगी आणि उरुळी देवाची या नवीन नगर परिषदेच्या...
पुणे सज्ज ‘तिरंगा यात्रे’साठी! ऑपरेशन सिंदूरच्या यशावर देशभक्तीचा जल्लोष; लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पुणेकरांचा एकत्रित उत्सव
पुणे | भारतीय लष्कराच्या अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’ या अतिशय धाडसी व यशस्वी कारवाईमुळे देशभरात राष्ट्रभक्तीची लाट उसळली आहे. याच ऐतिहासिक मोहिमेला सलाम करण्यासाठी पुणे शहरात एक भव्य आणि अभिमानास्पद ‘तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. तिरंगा यात्रेची माहिती 📅 रविवार, १८ मे २०२५🕓 सायंकाळी ४:०० वाजता📍 छत्रपती संभाजी महाराज स्मारक, डेक्कन ते संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे आयोजकांचे आवाहन...
मावळ तालुक्यात पर्यावरणपूरक ऐतिहासिक निर्णय – विदेशी वृक्ष काढून स्थानिक प्रजातींची लागवड; जैवविविधतेला मिळणार नवा श्वास
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मावळ तालुक्यात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सह्याद्री देवराई संस्था आणि पुणे उपवनसंरक्षक कार्यालय (पुणे विभाग) यांच्यातील करारावर आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. या करारानंतर सोमाटणे, गहुंजे आणि भंडारा डोंगर परिसरात विदेशी वृक्षांची जागा भारतीय स्थानिक प्रजाती घेणार आहेत. गेल्या काही दशकांत सबबाबूल, ग्लिरिसीडिया यांसारख्या विदेशी जातींचा परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रसार...
पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई! अपहरणाचा कट उधळला, मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक
पुणे, ३ एप्रिल २०२५:पुणे शहरातील कोंढवा भागात एका व्यक्तीच्या अपहरणाचा कट गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने उधळून लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी अपहरण झालेल्या व्यक्तीला सुखरूप सोडवून मुख्य आरोपीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अपहरणाचा थरार: 📌 १ एप्रिल २०२५ रोजी कॉलर नामे फिर्यादी (रा. कोंढवा, पुणे) याने पोलिसांना कळवले की, त्यांचे वडील (वय ४३) यांना दोन इसमांनी जबरदस्तीने गाडीत...
मोबाईल हिसकावून पळणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश; लष्कर पोलिसांची कारवाई, टोळीप्रमुखासह दोघांना अटक!
पुणे शहरात दिवसाढवळ्या आणि रात्री पादचाऱ्यांना लुटणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा लष्कर पोलिसांनी पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, या टोळीचा प्रमुख अनिकेत आरणे व त्याचा साथीदार आयान पठाण यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. दिनांक १५ मे २०२५ रोजी फिर्यादी हे साचापीर स्ट्रीट, कॅम्प परिसरातील सिटीझन ट्रेडिंग बँकेजवळून...














