0
0
0
0
0

शैक्षणिक

Home शैक्षणिक Page 9

संभाजीनगरात दुहेरी शोकांतिका! सासूच्या निधनानंतर काही मिनिटांत सूनेचाही मृत्यू — वेदांतनगर हादरले

0

छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी दुपारी घडलेली एक दुर्दैवी घटना सर्वांना हळहळवून गेली आहे. वेदांतनगर परिसरात सासूच्या निधनाची बातमी कळताच सुनेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काही मिनिटांतच दोन पिढ्या हरवल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. मृतांमध्ये रुक्मिणी रूपचंद परदेशी (वय 96) आणि त्यांची सून विजया परदेशी (वय 62) यांचा समावेश आहे. दोघीही विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या आई आणि...

पुणे मेट्रो विस्तार प्रकल्पाला गती! हडपसर–लोणी काळभोर आणि हडपसर–सासवड रोड मेट्रो मार्गांना मान्यता

0

पुणेकरांसाठी मोठी पायाभूत सुविधा विकासाची आनंदवार्ता! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कॅबिनेट पायाभूत सुविधा समितीने पुण्यातील दोन नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिली आहे. हे मार्ग म्हणजे —🔹 हडपसर ते लोणी काळभोर🔹 हडपसर ते सासवड रोड रेल्वे स्टेशन या दोन्ही मार्गांच्या उभारणीसाठी ₹५,७०४ कोटींचा खर्च अपेक्षित असून, यामुळे पूर्व पुण्यातील नागरिकांना अखेर मेट्रोचा लाभ मिळणार आहे. प्रकल्पाची पार्श्वभूमी : फेब्रुवारी २०२५ मध्ये...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त..

0

पिंपरी, २७ ऑक्टोबर २०२५ :- महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय...

३५ लाखांच्या मालाच्या अपहाराचा थरार संपला! — लोणीकंद पोलिसांनी नंदुरबारमधून संपूर्ण माल हस्तगत करून आरोपीला जेरबंद केले

0

पुणे: अत्यंत कुशल तपास आणि तातडीच्या कारवाईत पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलिस स्टेशनने ३५ लाख रुपये किंमतीचा चोरीचा माल नंदुरबारमधून हस्तगत करत आरोपीला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील व्यापाऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त करण्यात आला आहे. ही घटना मा. भगवती ट्रान्सपोर्ट कंपनी, रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याकडे घडली होती. कंपनीच्या कंटेनर ट्रक (क्र. MH-12-TV-1024) मध्ये हायर कंपनीचे १२० फ्रिज...

पिंपरीचिंचवड महापालिकेच्या सांगीतिक सोहळ्यात गायक-वादकांचे सूर सजले; रसिकांनी दिली भरभरूनदाद

0

पिंपरी : प्रकाशाच्या झळाळीने, आनंदाच्या लहरींनी आणि सुरांच्या सुवासिक झुळुकींनी सजलेली दिवाळीची पहाट... कानात झंकारणारे स्वर, भावनांच्या लहरींनी ओथंबलेले वातावरण... आणि शेकडो संगीतप्रेमींची मिळणारी दाद... अशा संगीतमय वातावरणात मंगलसुरांच्या अभ्यंगस्नानाने रसिकांची दिवाळीची पहाट अविस्मरणीय झाली. आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात  सुरांच्या दीपांनी व भावनांच्या शब्दसुरावटीने आजची पहाट उजळली. भारतीय संस्कृतीतील प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण असलेल्या दिवाळीच्या स्वागतार्थ,...

महापालिका सार्वत्रिक निवडणूक; प्रभागनिहाय मतदार याद्या विभाजनाच्या कामाला उद्यापासून होणार सुरुवात

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभागनिहाय मतदार यादी विभाजित करण्याचे कामकाज उद्यापासून (१८ ऑक्टोबर २०२५) सुरू होणार आहे. या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक यांना मतदार यादी विभाजित करण्याच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. या कामकाजासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी  सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण...

इलेक्ट्रीक ट्रक निर्मितीसाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

पुणे : ब्ल्यू एनर्जी मोटर्स निर्मित स्वॅपेबल बॅटरी असलेला इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे 'रिव्होल्यूशन ऑन व्हील' असून त्यातील तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. राज्य शासन मुंबई- पुणे इलेक्ट्रीक कॉरिडोअरसारखे अन्य कॉरिडोर करण्यासाठी सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केले.   निघोजे येथील ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकच्या शुभारंभ प्रसंगी ते...

मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे : मानव - बिबट संघर्षात आता पर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे यावर तात्पुरती उपाययोजना न करता कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड आणि दौंड तालुक्यांमध्ये वाढलेल्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे, सोलर कुंपण, सायरन पोल, बिबट रिस्कयू सेंटर उभारण्याबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले.  ...

‘लुटेरी दुल्हन’चा शेवटी पर्दाफाश! राजस्थानमध्ये लग्नाच्या नावाखाली श्रीमंत नवरदेवांना फसवणाऱ्या टोळीचा भांडाफोड – मुख्य आरोपी काजल अखेर जेरबंद

0

सीकर (राजस्थान) : लग्नासारख्या पवित्र नात्याचा वापर करून आर्थिक फसवणुकीचा खेळ करणाऱ्या एका हायप्रोफाईल लुटेरी टोळीचा पर्दाफाश राजस्थान पोलिसांनी केला आहे. या टोळीची मुख्य आरोपी काजल उर्फ ‘लुटेरी दुल्हन’ अखेर तब्बल एका वर्षाच्या पाठलागानंतर गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आहे. तिच्या या अटकेनंतर लग्नाच्या नावाखाली फसवले गेलेल्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. लग्नाचे आमिष आणि फसवणुकीचा डाव ही फसवणुकीची कहाणी सीकर...

चिखलीतील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक रस्त्याचे डांबरीकरण सुरू; यश साने यांच्या प्रयत्नांना यश

0

पिंपरी-चिंचवड : चिखली येथील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आज युवा नेते यश दत्ताकाका साने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरेवास्तीतील नागरिकांच्या वतीने नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. हा मार्ग काही काळापूर्वी स्ट्रोम वॉटर लाईनच्या कामामुळे खड्डेमय झाला होता आणि मनपाच्या वतीने दुरुस्ती न झाल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक यांना रोजच प्रवास करताना गंभीर असुविधांचा सामना करावा...

Copyright ©