गुंड गजा मारणेला सोशल मीडियाच्या चित्रफिती महागात पडल्या – पुणे पोलिसांनी थेट गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर केलं
पुणे: गुंड गजा मारणे उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील्स महागात पडल्या. पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढवणाऱ्या या चित्रफितीमुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे याची तब्बल चार तास चौकशी केली. यावेळी मारणेचे सोशल मीडिया अकाउंट देखील तपासण्यात आले. गजा मारणे याच्या "GM Boys" या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या साथीदारांनी "गजा मारणे डॉन" व "भाई" अशा प्रकारच्या रील्स...
वयोवृद्धांना फसवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; पोलिसांनी ८ गुन्ह्यांचा छडा लावत ८.६८ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत
पुणे : पोलीस असल्याचे भासवून व वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने अचूक सापळा रचून अटक केली आहे. आरोपी हमीद अफसर खान (वय ३०, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, पुणे) याने हातचलाखीने विविध परिसरांत वृद्ध नागरिकांची दागिन्यांची लुबाडणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखा युनिट ६ चे अंमलदार पो.हवा. नितीन मुंढे आणि पो.हवा. कानिफनाथ कारखेले...
हिंजवडी वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास; PMRDA कडून १६६ अतिक्रमणांवर कारवाई!
पुणे (हिंजवडी): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)ने हिंजवडी आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीला प्रतिबंध घालण्यासाठी पीएमआरडीएने सखोल पावले उचलत, गेल्या १५ दिवसांत तब्बल १६६ अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्थेला दिलासा दिला आहे. हिंजवडी हा पुण्याचा प्रमुख आयटी हब असल्यामुळे येथे दररोज लाखो कर्मचारी ये-जा करतात. यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामं आणि होर्डिंग्जमुळे प्रचंड...
देशातील विद्युत चाचणी क्षमता अधिक मजबूत होणार; CPRI च्या महत्त्वपूर्ण बैठकीत सखोल आढावा
नवी दिल्ली : केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान (CPRI) यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविताना केंद्रीय ऊर्जा मंत्री मा.ना. श्री. मनोहर लाल यांनी संस्थेच्या चाचणी (टेस्टिंग) सुविधांना अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यावर सविस्तर व व्यापक आढावा घेतला. ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील गरजा लक्षात घेऊन CPRI च्या परीक्षण क्षमतेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीदरम्यान, उच्च क्षमतेच्या विद्युत...
महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘साहित्यरत्न’ नावाने झालेल्या ‘साहित्यरत्न दौड २०२६ मध्ये’ हजारो युवा एकत्र धावले, नागरिक- पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;
लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान चौकात अत्यंत दणक्यात, उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात ‘साहित्यरत्न दौड २०२६’ पार पडली. उल्लेखनीय म्हणजे साहित्यरत्न दौडमध्ये नागरिक, युवक आणि क्रीडाप्रेमींनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून २२०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. विजय...
“सबंध महाराष्ट्राच्या, माझ्या लाडक्या दादांना… अखेरचा प्रणाम!” – अदिती तटकरे
मुंबई | प्रतिनिधी सबंध महाराष्ट्राच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे, जनतेच्या सुख-दुःखाशी नाते जपणारे स्व. अजितदादा पवार यांना अखेरचा प्रणाम अर्पण करताना राज्यभरातून अश्रूंनी भरलेली श्रद्धांजली वाहिली जात आहे. या शोकाकुल वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली भावना— “सबंध महाराष्ट्राच्या, माझ्या लाडक्या दादांना… अखेरचा प्रणाम!”— ही आज प्रत्येक मराठी मनाची हाक बनली आहे. अजितदादा हे केवळ एक राजकीय...
कर्तव्यनिष्ठांचा गौरव! ‘फिनिक्स विशेष सन्मान’ सोहळ्यात समाजहिताचे प्रेरणादायी क्षण
पुणे | कर्तव्यभावना, जबाबदारी आणि प्रामाणिकपणा या मूल्यांना सन्मानित करणारा ‘फिनिक्स विशेष सन्मान’ सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष सन्मान देण्यात आला. कर्तव्य आणि जबाबदारीचे प्रतीकया सोहळ्यात सन्मानित झालेल्या व्यक्तींनी आपल्या कार्यातून समाजापुढे उत्तम उदाहरण ठेवले आहे. त्यांचे अनुभव ऐकताना सभागृहात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अभिमान आणि आदराचे भाव दिसत होते. कर्तव्यनिष्ठा...
‘Run For Walk’ एकता दौडीत हजारो नागरिकांचा सहभाग — राष्ट्रभावना आणि आरोग्याचा संगम!
पुणे: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘Run For Walk’ या एकता दौडीत नागरिक, विद्यार्थी, पोलीस अधिकारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या उपक्रमाचे आयोजन पुणे शहर पोलीस, अंमली पदार्थ विरोधी पथक, तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६:३० वाजता पुणे पोलीस आयुक्तालयातून झाली. या प्रसंगी पुणे...
लाडली बहनांना मोठा दिलासा! दोन महिन्यांची आर्थिक हप्ता एकत्र मंजूर
मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या लाभार्थी महिलांना सरकारकडून मोठी आनंद वार्ता मिळाली आहे. राज्य सरकारने दोन महिन्यांची हप्ता रक्कम एकत्र देण्याचा निर्णय घेतला असून यामुळे लाखो महिलांच्या घरखर्चाला आणि दैनंदिन गरजांना मोठा हातभार लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महिला बचतगट, घरगुती खर्च करणाऱ्या गृहिणी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दिलासा मिळणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचा मिळून एकूण हप्ता थेट लाभार्थींच्या...
पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे औपचारिक स्वागत
दिनांक: ३० जून २०२५ :- महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२५ चा आज पहिला दिवस असून, अधिवेशनाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. विधान भवनाच्या प्रांगणात पार पडलेल्या या औपचारिक स्वागत सोहळ्याने विधानपरिषदेच्या कार्यवाहीस सकारात्मक सुरुवात झाली. मुख्यमंत्री आणि सभापती यांच्यात झालेल्या संवादातून आगामी अधिवेशनाची दिशा आणि सहकार्यातून वाटचाल होणार असल्याचे स्पष्ट झाले. ...







