पुणे : कोंढवा बलात्कार प्रकरणात धक्कादायक वळण – आरोपी पीडितेला परिचित; सेल्फी तिच्या संमतीने घेतले, फोटो संपादित; रसायन फवारल्याचे पुरावे नाहीत!
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती – प्राथमिक तपासात मोठा खुलासा पुणे – कोंढवा परिसरात घडलेल्या २२ वर्षीय आयटी महिला व्यावसायिकावर कथित बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक वळण समोर आले आहे. पीडित महिला आणि आरोपी पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते, आणि फोटो तिच्या संमतीने काढण्यात आला असून, तो नंतर संपादित करण्यात आल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. गंभीर...
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते! महाराष्ट्राच्या विकासात ऐतिहासिक पाऊल
महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण आज घडला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंतचा प्रवास आता पूर्णपणे अखंड आणि सुसज्ज महामार्गावरून होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्याचे उद्घाटन झाल्याने ७०१ किलोमीटर लांब महामार्ग आता सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. या महामार्गामुळे समृद्ध महाराष्ट्राची संकल्पना आता प्रत्यक्षात उतरली आहे,...
लोणी काळभोर पोलिसांची यशस्वी कारवाई – घरफोडीतील सराईत चोरटा जेरबंद, तब्बल १.९५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
लोणी काळभोर पोलिसांनी उत्कृष्ट तपास आणि शिताफीच्या कारवाईतून घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला जेरबंद केले असून, त्याच्याकडून तब्बल ₹१,९५,४२१/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपीचा माग काढला. पोलिसांच्या सततच्या गस्त घालण्यामुळे आणि संशयास्पद हालचालींवर...
‘सद्भावना पदयात्रे’चा पहिला टप्पा जल्लोषात पूर्ण — जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, काँग्रेसचा सामाजिक ऐक्याचा निर्धार!
परभणी जिल्ह्यातील वरोडा नाका ते परभणी शहर असा 'सद्भावना पदयात्रेचा' पहिला टप्पा आज जनसामान्यांच्या प्रचंड सहभागाने आणि जोरदार घोषणांनी उत्साहात पार पडला. एकता, सामाजिक समता आणि संविधानाच्या मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेसकडून काढण्यात आलेली ही पदयात्रा म्हणजे केवळ राजकीय उपक्रम नसून समाजातील असंतोष समजून घेण्याचा प्रयत्न असल्याचे नेतृत्वाने स्पष्ट केले. आजच्या पदयात्रेत प्रमुख मान्यवरांचे नेतृत्व: 🔸 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ🔸 माजी मंत्री सतेज...
वाघोलीत अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई; २३ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त
पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले असून, त्यानुसार वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. दि. १३ जानेवारी २०२६ रोजी तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना वाघोली ते केसनंद मार्गावरून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संबंधित ठिकाणी सापळा रचण्यात आला. वाघोलीकडून येणाऱ्या...
डेक्कन पोलीस ठाण्याची मोठी कारवाई – मोबाईल चोरीतून ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : डेक्कन पोलीस ठाण्याच्या पथकाने मोबाईल चोरीत मोठे यश मिळवले असून तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सीईआयआर (Central Equipment Identity Register) या तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत वाढ होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा गुन्ह्यांचा तपास सोपा...
चिंचवड स्टेशन परिसरात संतसृष्टीचा भव्य अनुभव | आरोग्य जागृतीसह पालखी सोहळा थाटात पार
चिंचवड स्टेशन: श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर, चिंचवड स्टेशन या शाळेत दिनांक ५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त विविध उपक्रमांनी सजलेला भक्तिमय शालेय पालखी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. टाळ, मृदुंग, फुगडी, रिंगण, दिंडी या वारकरी परंपरेच्या प्रत्येक घटकास विद्यार्थ्यांनी जिवंत ठेवत वारकरी संप्रदायाची सुंदर अनुभूती दिली. या वेळी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत नामदेव यांचे वेश परिधान करून...
पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये धडक कारवाई; ४.२७ कोटींचा एमडी जप्त, अंतरराज्यीय अंमली पदार्थ रॅकेट उध्वस्त
पुणे : अंमली पदार्थविरोधी कारवाईत पुणे पोलिसांनी मोठे यश संपादन करत राजस्थानपर्यंत जाळे पसरलेल्या मेफेड्रॉन (एमडी) तस्करी करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १ किलो ९६० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून, एकूण ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. ०३/०२/२०२६ रोजी...
मुंबईत मराठी माणसाला घर नाकारल्यास बिल्डरवर कारवाई! राज्य सरकारचा स्पष्ट इशारा – मंत्री शंभूराज देसाई यांची विधानपरिषदेत ठाम घोषणा
मुंबईसारख्या महानगरात मराठी भाषिक नागरिकांना केवळ त्यांच्या भाषेचा, खानपानाचा किंवा पारंपरिक ओळखीचा आधार घेत घर नाकारले जाण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत मोठा राजकीय आवाज उठला आणि राज्य सरकारकडून थेट बिल्डरांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. "मराठी माणसाचा मुंबईत पहिला हक्क" राज्याचे गृह आणि गृहनिर्माण राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टपणे विधानपरिषदेत जाहीर केलं की, "मुंबई, उपनगर किंवा राज्यात...
हडपसर पोलिसांची प्रभावी कारवाई – १२ तासांत अपहरणाची यशस्वी उकल, तीन आरोपी गजाआड!
पुणे शहरात हडपसर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अपहरणाची उकल करत तिन्ही आरोपींना जेरबंद केले असून, अपहृत इसमाची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले आहे. हा प्रकार एका तरुणीच्या प्रेमसंबंधांवरून घडला असून, पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे. अपहरणाची पार्श्वभूमी – कुटुंबातील वादातून घटना मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी वाघोलीतील एका मुलीच्या प्रेमात होता. मात्र, तिच्या कुटुंबीयांना हे संबंध मान्य...








