चंदननगरमध्ये ड्रग्ज माफियांवर पुणे पोलिसांचा मोठा घाव; २५ लाखांचा मॅफेड्रॉन जप्त, एक आरोपी अटकेत
पुणे शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक ०२ ने चंदननगर परिसरात मोठी कारवाई करत २५ लाख रुपये किमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अंमली...
‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ – आदित्य ठाकरे यांचे मुंबईकरांना सादरीकरण; “मुंबई अदानीस्तान होऊ देऊ नका” असा थेट इशारा
मुंबई | मुंबई महानगरपालिकेत तब्बल २५ वर्षे सत्ताधारी राहून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबईकरांना अभिमान वाटेल अशी भरीव आणि दूरदृष्टीपूर्ण विकासकामे केली असल्याचे ठामपणे मांडत ‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ या संकल्पनेअंतर्गत भव्य सादरीकरण आज वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम येथे पार पडले. हे सादरीकरण युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सादर केले. या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या...
मोठा फसवणूक रॅकेट उघड! सोशल मीडियावर गाड्यांचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक – कोरेगाव पार्क पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पुणे शहरातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या पथकाने चारचाकी वाहनांच्या नावाखाली मोठी फसवणूक करणाऱ्या आरोपीला जेरबंद करत महत्त्वाची कारवाई केली आहे. या आरोपीने सोशल मीडियावर आकर्षक जाहिराती टाकून लोकांना जास्त परताव्याचे आमिष दाखवत त्यांच्या गाड्या घेतल्या, पण त्यांना ना मोबदला दिला ना गाडी परत केली. त्यामुळे अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले होते. फसवणुकीचा प्रकार : सोशल मीडियावरून सुरू झालेला खेळ गुन्हा नोंद:...
राजस्थान-चेन्नई उत्सुक, पण जॅकपॉट केकेआरला; कॅमरुन ग्रीन ठरला आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू – मिळाले तब्बल ₹25.20 कोटी
दुबई | आयपीएल 2026 च्या मिनी-लिलावाला दुबईमध्ये आज जोरदार सुरुवात झाली आणि पहिल्याच सत्रात क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं ते ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरुन ग्रीन याने. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या ग्रीनवर अनेक संघांनी बोलींचा पाऊस पाडला, मात्र अखेर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने बाजी मारत त्याला ₹25.20 कोटींना खरेदी केले. ग्रीनची मूळ किंमत केवळ ₹2 कोटी होती. मात्र लिलावात त्याच्यासाठी झालेल्या जबरदस्त चुरशीमुळे...
पुणे: मांजरीतील लाउडस्पीकर फॅक्टरीला भीषण आग – लाखोंचा माल जळून खाक!
फायर ब्रिगेडच्या तातडीच्या कारवाईने आग आटोक्यात – सुदैवाने जीवितहानी नाही! पुणे – पुण्यातील मांजरी खुर्द परिसरात एका लाउडस्पीकर फॅक्टरीला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. आगीत लाखोंचा माल जळून खाक झाला असला तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ६,००० चौरस फूट फॅक्टरी जळून खाक – अत्याधुनिक मशिन्स आणि साहित्याचे मोठे नुकसान! पुणे फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ४:४३ वाजता ही आग लागल्याची...
मन सुन्न करणारी घटना: नव्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा झाड कोसळून मृत्यू
विक्रोळी | मुंबई | २८ मे २०२५ — मुसळधार पावसात विक्रोळीतील एका बागेत उभ्या असलेल्या झाडाखाली कोसळून तेजस नायडू या २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तेजस याच दिवशी नवीन मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीवर रुजू होणार होता. मात्र पावसामुळे त्याने नोकरीची सुरुवात एक दिवस लांबवली, आणि नियतीने त्याच दिवशी त्याच्यावर घाला घातला. एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त तेजस आपल्या मित्रांसोबत विक्रोळीतील...
कात्रज–कोंढवा रोडवरील बेशिस्त वाहतुकीचा आणखी एक बळी; अपघाताने नागरिकांमध्ये संताप
पुणे | प्रतिनिधी :- कात्रज–कोंढवा रोडवरील बेशिस्त वाहतूक, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे आज पुन्हा एक दुर्दैवी अपघात घडला असून, यात आणखी एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर अपघातांची मालिका सुरू असताना, प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता जणू ‘अपघातप्रवण मार्ग’ बनत चालला आहे, अशी तीव्र भावना स्थानिक नागरिक व्यक्त...
आयआयएम नागपूरमध्ये ऊर्जा व क्रीडा क्षेत्रातील मोठी झेप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2MW सौरऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी आणि गोल्फ अकॅडमीचे उदघाटन!
नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आयआयएम नागपूर येथे 2 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी तसेच अत्याधुनिक गोल्फ अकॅडमी आणि लर्निंग सेंटरचे भव्य उदघाटन करण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांमुळे नागपूरच्या औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सौरऊर्जा प्रकल्पामुळे स्वच्छ ऊर्जेचा विस्तार ▶ आयआयएम नागपूरमध्ये उभारला जाणारा 2 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प परिसराला...
पुण्यातील ‘बर्गर किंग’ विरुद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड; सुप्रीम कोर्टाने स्थानिक हॉटेलला दिली तात्पुरती दिलासा!
(नवी दिल्ली) ७ मार्च २०२५ :- सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या त्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे, ज्यामुळे पुण्यातील 'बर्गर किंग' या स्थानिक रेस्टॉरंटला त्याच नावाने व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला होता. अमेरिकेतील प्रसिद्ध फास्ट फूड ब्रँड 'बर्गर किंग कॉर्पोरेशन' आणि पुण्यातील या रेस्टॉरंटमध्ये २०१४ पासून व्यापारचिन्हावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या...
“एमजे हेक्टर गाडी दिलीस तर तिथेच पेटवून देईन”; फॉर्च्युनरसाठी वैष्णवीच्या वडिलांना धमकी – हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप
प्रतिनिधी | पुणे | वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलं आहे. हगवणे कुटुंबाने न्यायालयात पाच कोटींच्या गाड्यांचा दावा करत आपल्यावरील आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी हगवणेंच्या प्रत्येक दाव्याची जोरदार खरमरीत चिरफाड केली आहे. “माझ्याशी वाद घालून म्हणाला – एमजे हेक्टर गाडी पेटवून देईन” वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले की, “मी एमजे हेक्टर गाडी बुक केली होती....








