महाराष्ट्र
क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या आमिषाने ₹1 कोटींची फसवणूक! खारघर पोलिसांची कारवाई, आरोपीला मुंब्रा येथून केली अटक
पनवेल परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामध्ये एका गुंतवणूकदाराला ‘क्रिप्टो करन्सीमध्ये भरघोस परतावा मिळेल’ असे आमिष दाखवून तब्बल ₹1 कोटी 3 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार समोर येताच खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास पनवेल सायबर सेलच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला होता. तांत्रिक तपासाअंती आणि मोबाइल लोकेशनच्या आधारे तपास...
रोल्स रॉयस ते रेंज रोव्हरपर्यंत… सावकार नानासाहेब गायकवाडच्या कोट्यवधींच्या आलिशान गाड्या पोलिसांच्या ताब्यात! | ‘वैष्णवी हगवणे’ प्रकरणातील धक्कादायक गुन्हेगारीचा पर्दाफाश
पुणे | ६ जून २०२५ – पुणे शहरातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास जसजसा खोलात जात आहे, तसतसे अनेक दाढीखाली लपलेले गुन्हे उघडकीस येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आता सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड यांच्या नावावर असलेल्या कोट्यवधींच्या आलिशान लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत. लक्झरी कार साम्राज्याचा भांडाफोड नानासाहेब गायकवाड याच्या ताब्यातून पोलिसांनी रोल्स रॉयस, रेंज रोवर,...
अनैसर्गिक संबंधावरून वाद, रक्तरंजित खून… २४ तासांत आरोपी जेरबंद! विश्रामबाग पोलिसांची गून्हे उघडकीस आणण्यात विलक्षण कामगिरी
पुणे | ६ जून २०२५ – पुणे शहरात पुन्हा एकदा अनैसर्गिक संबंधावरून निर्माण झालेल्या वादातून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंडई मेट्रो स्टेशनसमोरील इमारतीच्या पार्किंगमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत अवघ्या २४ तासांत आरोपी रमेश प्रकाश सत्रे (वय २१, रा. कातरड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याला अटक करून गुन्हा...
कोंढव्यात परकीय नागरिकाची माहिती लपविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा! रियल इस्टेट एजंट व घरमालकावर पोलिसांची कारवाई
पुणे | ६ जून २०२५ – पुणे शहरातील कोंढवा परिसरात परकीय नागरिकांच्या अनधिकृत वास्तव्याचा पर्दाफाश करत कोंढवा पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. परकीय नागरिकांची माहिती पोलीस ठाण्यात न देता, बेकायदेशीर पद्धतीने भाड्याने घर दिल्याप्रकरणी संबंधित घरमालक आणि रिअल इस्टेट एजंट अदनान शबीर हुसेन बोहरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? कोंढवा पोलिसांना पोलीस आयुक्त कार्यालयाच्या परकीय...
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते! महाराष्ट्राच्या विकासात ऐतिहासिक पाऊल
महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण आज घडला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंतचा प्रवास आता पूर्णपणे अखंड आणि सुसज्ज महामार्गावरून होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्याचे उद्घाटन झाल्याने ७०१ किलोमीटर लांब महामार्ग आता सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. या महामार्गामुळे समृद्ध महाराष्ट्राची संकल्पना आता प्रत्यक्षात उतरली आहे,...
लोणावळ्यात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार; जिल्हाधिकाऱ्यांचा पाहणी दौरा, रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास सोमवारपासून सुरूवात!
लोणावळा – पर्यटनाच्या नकाशावर ओळख निर्माण केलेल्या लोणावळा शहरात एक नवीन विकास पर्व सुरू होण्याच्या दृष्टीने गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक व पाहणी दौरा पार पडला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार सुनील शेळके, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत शहरातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास सोमवारपासून...
हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प — राज्यात १० कोटी झाडांची लागवड, पर्यावरण संतुलनासाठी व्यापक योजना जाहीर
मुंबई | प्रतिनिधी :- राज्याला हरित व समृद्ध बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानासाठी १० कोटी वृक्षलागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी वर्षीही तितक्याच झाडांची लागवड करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वृक्षारोपण ही लोकचळवळ होण्यासाठी...
पावसाच्या आगमनाने उघड झाली बीएमसीची अपयशी तयारी, हिंदमाता ते कुर्ला – सगळीकडे जलमय स्थिती
मुंबई | प्रतिनिधी :- मुंबईत मान्सूनने यंदा 26 मे रोजीच दमदार हजेरी लावली, मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अद्याप अपूर्ण असलेल्या पावसापूर्व तयारीमुळे शहर पुन्हा एकदा पाण्याखाली गेलं आहे. हिंदमाता, गांधी मार्केट, कुर्ला, चेंबूर, गोवंडीसह अनेक जुन्या व नव्या जलभरतीच्या ठिकाणी पाणी साचले असून, मेट्रो रेल्वेच्या एक्वा लाईनवरील काही स्थानकांसुद्धा जलमय झाली आहेत. अर्धवट तयारीमुळे मुंबईची मान्सून परीक्षेत पुन्हा नापासबीएमसीने अद्याप...
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला! मुंबई-नागपूर प्रवासाची नवी क्रांती, वेळ निम्मा होणार
मुंबई | प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या बहुप्रतिक्षित आणि ऐतिहासिक समृद्धी महामार्गाचे अखेरचे आणि सर्वात जास्त तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेले 76 किमीचे इगतपुरी ते अमाणे (ठाणे) हे अंतर आज, 5 जून 2025 रोजी औपचारिकरित्या वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटनामुळे 701 किलोमीटर लांब असलेला संपूर्ण मुंबई-नागपूर समृद्धी...
RCB चा विजयोत्सव काळवंडला! चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू; संघाच्या निवेदनाने हळहळ व्यक्त
बेंगळुरू | प्रतिनिधी :- 18 वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने अखेर आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आणि या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी हजारो चाहत्यांनी बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर एकत्र गर्दी केली. मात्र, अनियंत्रित जमावामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 11 निष्पाप चाहत्यांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. विजयाच्या उत्साहात झालेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण कर्नाटकासह देशभरात हळहळ व्यक्त केली...





