राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महापालिकेच्या वतीने वाहण्यात आली आदरांजली
पिंपरी, दि. २८ जानेवारी २०२६ - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम,नगररचना उपसंचालक किशोर गोखले,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण...
कर्तव्यावर असताना वीरमरण; मुंबई पोलीस अंमलदार विदीप जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई | प्रतिनिधी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विदीप जाधव यांचे कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघाती निधनाने संपूर्ण पोलीस दलासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावत असताना त्यांचे अकाली जाणे ही अत्यंत दुःखद व हृदयद्रावक घटना आहे. विदीप जाधव हे एक कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि मेहनती पोलीस अंमलदार म्हणून ओळखले जात होते. नेहमीच जबाबदारीने काम करत, कायदा-सुव्यवस्थेचे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रजासत्ताक दिनाचा भव्य शासकीय सोहळा संपन्न
मुंबई | २६ जानेवारी २०२६भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत दिमाखदार आणि राष्ट्राभिमान जागवणारा शासकीय राष्ट्रध्वजवंदन व संचलन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सकाळी ठीक ९.१५ वाजता शिवाजी पार्क परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आणि तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमस्थळी पोलीस दल, सशस्त्र दल, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन...
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना नमन; कामगार हक्क आणि स्वाभिमानाचा वारसा अधोरेखित
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज मुंबईतील द सेंट रेजिस हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेनेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा, कार्याचा आणि कामगार हितासाठीच्या संघर्षाचा गौरव करत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेवक श्री. निशिकांत शिंदे, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस श्री. दिलीप जाधव, युनिट अध्यक्ष श्री. विवेक करलकर, हॉटेल...
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासात पारदर्शकतेची मागणी – लॉटरी प्रक्रिया ठरलेल्या क्रमानेच व्हावी, रहिवाशांचा ठाम आग्रह
मुंबई: वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या लॉटरी प्रक्रियेबाबत चाळीतील रहिवाशांनी ठाम भूमिका घेतली असून, ही प्रक्रिया चाळींच्या ठरलेल्या आणि अधिकृत क्रमानेच पार पडावी, अशी जोरदार मागणी ते सातत्याने करत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही संदिग्धता राहू नये, तसेच पूर्ण नियमितता आणि पारदर्शकता राखली जावी, हीच रहिवाशांची प्रमुख मागणी आहे. बी डीडी चाळ पुनर्विकास हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी...
दादरच्या रामश्याम वाडीत पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज पाणी मिसळले; तत्काळ कारवाईने नागरिकांना दिलासा
मुंबई: दादर पश्चिम येथील रामश्याम वाडी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याची गंभीर बाब समोर आली होती. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार, संसर्ग आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता, या समस्येची तात्काळ दखल घेण्यात आली. प्रकरण लक्षात येताच महापालिका अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून संबंधित पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू करून...
लिबर्टी गार्डन सोसायटीत रस्ते व सांडपाणी लाईन कामाचा आढावा – दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई : वॉर्ड क्रमांक ४७ मधील लिबर्टी गार्डन सोसायटी परिसरात सुरू असलेल्या CC रोड आणि सांडपाणी वाहिनी (सीवेज लाईन) कामाचा प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित कंत्राटदार तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा करण्यात आली. परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता, रस्त्याचे मजबुतीकरण व सांडपाणी व्यवस्थेचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणे...
स्व. राज पुरोहित यांना भावपूर्ण श्रद्धांजली – मुंबईत पुरोहित कुटुंबियांची भेट घेऊन व्यक्त केली शोकभावना
मुंबई :माजी मंत्री तथा मुंडे साहेबांचे अत्यंत निकटवर्तीय स्व. राज पुरोहित जी यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट देऊन पुरोहित कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले आणि मनःपूर्वक शोकभावना व्यक्त करण्यात आल्या. या भेटीदरम्यान स्व. राज पुरोहित यांच्या कार्याची आठवण करून देताना सांगण्यात आले की, ते अत्यंत समर्पित, निष्ठावान आणि जनतेशी घट्ट नातं...
वाढवण बंदर आणि मेगा प्रकल्पांविरोधात पालघरमध्ये जनआंदोलन – जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नागरिकांचा ठाम लढा
पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन पार पडले. प्रस्तावित वाढवण बंदर तसेच जिल्ह्यातील विविध मेगा प्रकल्पांविरोधात स्थानिक नागरिकांनी एकत्र येत आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनात मच्छिमार, आदिवासी, शेतकरी, कामगार, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ, मुरबे बंदर, केळवे टेक्सटाईल पार्क आणि ‘चौथी मुंबई’ यांसारख्या प्रकल्पांमुळे...
उल्हासनगरमध्ये शिवसेनेला निर्णायक बळ – वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय हालचालींमध्ये शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या नगरसेविका सुरेखा सोनवणे आणि नगरसेवक विकास खरात यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या दोन्ही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही...





