Breaking News

Home Breaking News Page 328

पुणे पोलीस आयुक्तांची 93 वी बेधडक कारवाई…… भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन परिसरातील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

0

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार गणेश उर्फ भावड्या बाबु ओव्हाळ (वय-24 रा. जय शिवाजी चौक, आंबेगाव बुद्रुक, पुणे) गणेश ओव्हाळ याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी गणेश उर्फ भावड्या ओव्हाळ याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह,...

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 91 वी स्थानबध्दतेची कोंढवा परिसरात अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई!

0

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारुची विक्री करुन दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार भिमय्या लिंगय्या भंडारी (वय- 23 रा. कानडेनगर, उंड्री, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 91 वी कारवाई आहे. भिमय्या भंडारी हा कोंढवा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारुचा...

पुण्यातील रहाळकर राममंदिरात काँग्रेस च्या वतीने केली महाआरती, भजन, प्रसादाचे वाटप – माजी आमदार मोहन जोशी,व कसबा मतदार संघांचे आमदार रवींद्र धंगेकर

0

अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत असताना याच श्रद्धायुक्त भावनेने आम्ही प्रभू श्रीरामाची महाआरती केली,असे याप्रसंगी बोलताना मोहन जोशी यांनी सांगितले.श्रीरामाविषयी सर्व भारतीयांच्या मनात श्रद्धा आहे. श्रीराम हे दैवत प्रत्येक भारतीयाचे आहे, कोणा विशिष्ट व्यक्ती अथवा समूहाचे नाही व कोणा पक्षाचे अथवा संघटनेचेही नाही, या दैवताला पक्षीय, राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न कोणी केला, तरी ते भारतीयांना मान्य होणार...

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसाची गांजा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई..

0

पिंपरी चिंचवड,दि.१८:- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रुग्णवाहिकेतून गांजाची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पथकाने तब्बल 96 किलो गांजासह एक कोटी 31 लाख 55 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे आणि रणधीर माने यांना १२ जानेवारी रोजी गांजा विक्री प्रकरणी...

शिरगांव पोलिसांचा दारूभट्टी बनवणाऱ्या अड्ड्यावर छापा मारून कारवाई

0

पुणे,दि. शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पावना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टी बनवणाऱ्या अड्ड्यावर शिरगाव पोलिसांनी छापा यामध्ये नऊ लाख बाष्ठ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शुभम राजगुरे यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी शिरगाव या गावच्या हद्दीमध्ये पवना नदीच्या कडेला मोकळ्या जमिनीमध्ये...

पुण्यात रत्नागिरी हापूसची आंब्याची पेटी दाखल, एका आंब्याचा दर किती जाणून घ्या ??

0

पुणे,दि.१८:- पुणे बाजारात गुरुवारी रत्नागिरी हापूस दाखल झाला. यापूर्वी पुण्यातील बाजारात देवगड हापूस आला होता. आता पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी विकली गेली. ही पेटी बोली लावून विकल्यामुळे तिला सर्वोच्च दर मिळाला. पहिल्या मानाचा आंब्याच्या पेटीला 21 हजार रुपये किंमत मिळाली आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत 440 रुपये आहे. एक महिना आधीच आंब्याची पहिली...

हडपसर परिसरात दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पुणे पोलीस आयुक्तांची कारवाई…….

0

आरोपी ओंकार उभे याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ओंकार उभे याला एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.खुनाचा प्रयत्न, अपहरण, बलात्कार असे गंभीर गुन्हे करुन हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी...

ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणाऱ्या राजस्थान मधील अभिनेत्रीसह दोन परदेशी तरुणी वर पुणे शहर सामाजिक सुरक्षा पोलिसांची बेधक कारवाई

0

पुणे शहरातील विमानगर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानमधील दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी दलाल इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन सन्यासी व रोहित यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानगर भागातील एका हॉटेलमध्ये...

ज्या भागात लहानाचा मोठा झाला, आणि ज्या ठिकाणी शरद मोहोळ चा खुनाचा कट रचित दहशत करून वर्चस्व गजविण्याचं ठिकाणीच पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड विठ्ठल शेलार ची धिंड काढली…….

0
विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील मुठा गावापासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या उरवडे या गावचा मुळचा रहिवासी आहे. विठ्ठल शेलार याच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे होते. त्याच्यावर मोक्का कारवाई केली होती. त्यातून जामीन मिळाल्यावर २०१७ मध्ये त्याने तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट व भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याला मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांची भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली होती.गॅगस्टर शरद मोहोळ याचा खून प्रकरणात अटक करण्यात आलेला गुंड विठ्ठल शेलार हा ज्या भागात दहशत माजवत होता, त्याच भागात त्याच्या हातात बेड्या घालून पोलिसांनी धिंड काढली.शरद मोहोळ खूनतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याच्या हातात बेड्या घालून दोन बाजूने दोन पोलिसांनी खांद्यामधून दोरीने आवळून त्याला रस्त्याच्या कडेने चालवत नेले जात होते. विठ्ठल शेलार हा गुमान खाली मान घालून पोलिस सांगतील तसा जात होता. वाकड येथील कावेरी नगर परिसरातील पोलिसांनी त्याला फिरविला.शरद मोहोळ खून प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर आता पोलीस त्याची पाळेमुळे खणून काढू लागली आहेत. त्यातून पोलिसांनी विठ्ठल शेलारची बुलेटप्रुफ स्कॉपिओ गाडी जप्त केली आहे. शेलार याने ती पुनावळे येथील फार्म हाऊसवर लपवून ठेवली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर ते शोध घेत होते. त्यावेळी शेलार याच्या साथीदारांनी ती गाडी इतरत्र हलविण्याचा प्रयत्न सुरु केला. ते गाडी घेऊन जात असताना पोलीस आपल्या मागावर असल्याचे त्याच्या साथीदारांना समजल्यावर त्यांनी ही गाडी रस्त्यात सोडून पळ काढला. पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे. शरद मोहोळ प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ६ महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत.ज्या भागात लहानाचा मोठा झाला, त्याच राहत्या घराच्या परिसरातून पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. वाकड भागात धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील मुठा गावापासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या उरवडे या गावचा मुळचा रहिवासी आहे. विठ्ठल शेलार याच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे होते. त्याच्यावर मोक्का कारवाई केली होती. त्यातून जामीन मिळाल्यावर २०१७ मध्ये त्याने तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट व भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याला मुळशी, भोर, वेल्हा या...

जागतिक क्रमवारीत असलेली आरती पाटील ह्या बॅडमिंटन खेळाडूचा ‘पुनीत बालन ग्रुप’शी करारबद्ध;…….

0

आरती पाटील ही एक भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू असून ती सध्या महिला एकेरी SU5 साठी पॅरा-बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहे. कोल्हापुर जिल्हयातील उजगावात जन्मलेल्या आरतीने २००८ मध्ये धावपटू म्हणून मैदानावर प्रवेश केला तेंव्हाच २००९ मध्ये तिने रॅकेट उचलण्याचा निर्णय घेतला आणि तेंव्हापासून बॅडमिंटनपटू म्हणून तिच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पुढच्याच वर्षी तिने राष्ट्रीय स्तरावर खेळायला सुरुवात केली. तथापि;...

Copyright ©