Breaking News
राष्ट्रीय सहकार धोरण 2025: स्वच्छ व हरित ऊर्जा तत्त्वावर चालणारी नवभारताची ग्रामविकास क्रांती!
नवी दिल्ली | देशातील प्रत्येक गाव पर्यावरणपूरक, स्वयंपूर्ण आणि हरित ऊर्जेवर आधारित बनविण्याच्या दिशेने भारत सरकारने महत्वाकांक्षी पावले उचलली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ‘राष्ट्रीय सहकार धोरण 2025’ अंतर्गत देशभरात सहकाराच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गावागावात हरित क्रांतीचा वारा या धोरणांतर्गत आता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात सौर आणि पवन उर्जेच्या साधनांची...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी सौजन्यभेट – दिल्ली दौऱ्यात राजकीय चर्चांना उधाण!
नवी दिल्ली | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांची सौजन्यभेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक चर्चा झाली. दोन राज्यांचे नेते एकत्र – विकासावर भर या भेटीदरम्यान हरियाणा आणि महाराष्ट्रातील शासकीय योजनांची अंमलबजावणी, केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाचे मुद्दे आदी विषयांवर चर्चा झाली. फडणवीस आणि खट्टर यांची ही भेट राजकीय...
इको पॉइंटच्या खोल दरीत अडकलेला कुत्रा तब्बल दोन दिवसांनंतर सुखरूप बाहेर – ‘सह्याद्री मित्र आपत्कालीन पथकाची’ शौर्यगाथा!
माथेरान | निसर्गरम्य माथेरानमधील प्रसिद्ध इको पॉइंटजवळील लँडस्केप पॉइंटच्या 150 ते 200 फूट खोल दरीत अडकलेल्या एका भटक्या कुत्र्याला तब्बल दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर अखेर सोमवारी संध्याकाळी सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही अत्यंत धाडसी व संवेदनशील मोहिम ‘सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संघटनेच्या’ बचाव पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली. कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न सह्याद्री मित्र संघटनेच्या स्वयंसेवकांनी सहनशीलता, धाडस आणि संयम यांचे...
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; रोजगार, वृक्षारोपण, रक्तदान, बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम, चित्रकला व इतर उपक्रमांना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद!
पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे लोकप्रिय नेते ना. श्री. अजितदादा पवार यांचा वाढदिवस केवळ औपचारिक साजरा न करता समाजोपयोगी आणि युवकांना दिशा देणाऱ्या अनेक उपक्रमांमधून जल्लोषात साजरा करण्यात आला. रोजगार मेळाव्यात मोठा यश: ४२६ पदवीधरांना मिळाली तात्काळ नोकरी! स्पर्धेच्या युगात नोकरीसाठी धडपड करणाऱ्या हजारो पदवीधरांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात मोठा दिलासा मिळाला. १५८८ विद्यार्थ्यांनी थेट मुलाखती दिल्या ४२६ जणांना मिळाले...
पुणे मेट्रोचा स्पेशल विद्यार्थी उपक्रम: ११८ रुपये खर्चाचे कार्ड आता मोफत; परंतु २०० रुपयांचा टॉप‑अप बंधनकारक
पुणे मेट्रोने विद्यार्थ्यांसाठी एक जबरदस्त आरंभिक घोषणा केली आहे: ‘वन पुणे विद्यार्थी पास कार्ड’, जे सामान्यतः ₹११८ (₹१०० + १८% GST) मध्ये मिळते, ते २५ जुलै ते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे! महत्त्वाच्या तपशीलांचा आढावा: कार्ड मोफत मिळवण्यासाठी किमान ₹२०० टॉप‑अप करणे अनिवार्य आहे. हा ₹२०० टॉप‑अप पूर्णपणे प्रवासीच्या कार्डमध्ये जमा होणार आहे; कोणतेही सेवा शुल्क लावले...
रायगडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई : महाड MIDC मध्ये ८९ कोटींच्या केटामाईन अंमली पदार्थाचा पर्दाफाश!
महाड, रायगड | २४ जुलै २०२५: रायगड जिल्ह्यातील महाड MIDC परिसरात बेकायदेशीररित्या तयार करण्यात आलेले ८८.९२ कोटी रुपयांचे 'केटामाईन' अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, या कारवाईने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. ही धक्कादायक माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर, पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची तातडीने स्थापना करण्यात आली. त्यानंतर विविध विभागांतील पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने E-26/3, रोहन...
अकोला पोलीस सज्ज! कावड पालखी उत्सवासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची सार्वजनिक मंडळांसोबत बैठक
"शांततेचा संदेश, सुरक्षिततेची हमी!" आगामी कावड पालखी उत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील उत्साही वातावरणात सुरक्षा आणि समन्वयाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. अकोला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक (IPS) (@archit.59) यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील सार्वजनिक कावड पालखी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती लक्षणीय होती. मंडळांशी संवाद साधताना श्री. चांडक यांनी त्यांच्या...
मराठी भाषेत बोलल्यामुळे एका मराठी विद्यार्थ्यावर अमराठी विद्यार्थ्याकडून मारहाण
नवी मुंबईतील वाशी परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. फक्त मराठी भाषेत बोलल्यामुळे एका मराठी विद्यार्थ्यावर अमराठी विद्यार्थ्याकडून मारहाण करण्यात आली. ही घटना मराठी अभिमान आणि अस्मितेवर आघात करणारी असल्याची तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. घटनेनंतर संबंधित मराठी विद्यार्थ्याने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्री. संजय धुमाळ यांची...
सरकारी यंत्रणेला शिस्त लावणारा निर्णय! तलाठी ते उपजिल्हाधिकारी ‘फेसॲप’ वर देणार हजेरी
महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. तलाठ्यांपासून ते थेट उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व शासकीय अधिकाऱ्यांना फेसऍपद्वारे दररोज हजेरी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा निर्णय शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रशासनासाठी अत्यावश्यक ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा करत स्पष्टपणे सांगितले की, "सरकार लाख चांगले निर्णय घेते, पण अधिकारीच जर जबाबदारीने काम करत नसतील, तर जनतेपर्यंत त्या...
मोका गुन्ह्यातील फरारी आरोपीला हैदराबादमधून केली अटक; पुणे पोलिसांची धडक कारवाई
पुणे – पुणे शहरातील कुख्यात टिपू पठाण टोळीतील एका मोका गुन्ह्यातील फरारी आरोपीला अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ०५ च्या पथकाने हैद्राबादमधून अटक केली आहे. आरोपी फैयाज गफार बागवान (वय २८) याच्या अटकेमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. फैयाज बागवान याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०८(२), ३२९(३), ३५१(२), ३५२, १८९(१)(२), १९१(२) सह कलम ६१(२), १११ तसेच महाराष्ट्र...





