Breaking News
अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा यांची पावसाळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक व पहाणी दौरा
पिंपरी, २३ मे २०२५ : पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यात घडणाऱ्या घटनांसह कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शासनाने पूरग्रस्तांना दिलेली मदत वेळेत पोहोचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याची खबरदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही...
‘संविधान हत्या दिवस’ निमित्ताने लोकशाही रक्षकांचा सन्मान; मा. राज्यपाल व मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न
मुंबई: 'संविधान हत्या दिवस' या विशेष दिवसानिमित्त मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एका भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात (१९७५-७७) लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या लोकशाही सेनानींचा गौरव करण्यात आला. लोकशाहीसाठी झुंजणाऱ्यांना मानाचा मुजरा कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या शेकडो लोकशाही सेनानींना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या सेनानींनी आणीबाणीच्या...
मीरा-भाईंदरमधील मराठी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली; प्रशासनाच्या भूमिकेवर उठले अनेक प्रश्न!
मीरा-भाईंदर परिसरात मराठी भाषेच्या प्रश्नावर मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समिती यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले आंदोलन चिघळल्यामुळे संपूर्ण परिसरात राजकीय खळबळ उडाली. या आंदोलनाला परवानगी नाकारण्याच्या निर्णयामुळे तणाव वाढला आणि मराठी जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त झाला. मंगळवारी (८ जुलै २०२५) रोजी नियोजित मोर्चाला पोलिसांकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांना अटक...
“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा”
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पडली. आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी ९२ तक्रारी वजा सूचना मांडल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १२, ९, २, १८, ३, ८, ८ आणि ९ अशा एकूण ६९ तक्रारवजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेसाठी...
खारघर येथील ‘ग्रामविकास भवन’ची मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी; ग्रामविकास योजनांना मिळणार नवी गती
नवी मुंबई : राज्यातील ग्रामविकास आणि पंचायत राज व्यवस्थेला अधिक सक्षम आणि आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या खारघर, नवी मुंबई येथील ‘ग्रामविकास भवन’ या अत्याधुनिक शासकीय संकुलाची आज ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध प्रशासकीय विभाग, प्रशिक्षण कक्ष, बैठकींसाठी उपलब्ध सुविधा तसेच पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्यातील ग्रामविकास विभागाच्या विविध योजना...
अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी शरद पवार विद्या प्रतिष्ठान मैदानावर दाखल
बारामती | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा पसरवणाऱ्या घटनेनंतर आज बारामतीत भावनिक वातावरण पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतिम संस्कारासाठी विद्या प्रतिष्ठान मैदानावर दाखल झाले. आपल्या पुतण्याला अखेरचा निरोप देताना शरद पवार भावुक झाल्याचे दृश्य उपस्थितांच्या मनाला चटका लावून गेले. विद्या प्रतिष्ठान मैदान परिसरात सकाळपासूनच प्रचंड गर्दी जमली असून, राज्यभरातून नेते,...
रशिया-उत्तर कोरिया मैत्रीत नवा अध्याय! राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे किम जोंग उन यांना रशियाला अधिकृत आमंत्रण
जागतिक राजकारणातील महत्वाची घडामोड घडली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांना रशियाला अधिकृतपणे भेट देण्यासाठी आमंत्रित केले आहे. या आमंत्रणामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया आणि उत्तर कोरिया यांचे संबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्य या क्षेत्रांत सहकार्य...
पुण्यातील गुन्हे शाखेची मोठी कामगिरी – जामीनावर असलेल्या आरोपींकडून ४ गावठी पिस्तुलं आणि ५ जिवंत काडतुसे जप्त!
पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ६ ने पुन्हा एकदा आपली चपळाई, कौशल्य आणि तात्काळ कारवाई यामुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडवली आहे. वाघोली परिसरात गंभीर गुन्ह्यात जामीनावर असलेल्या आरोपींकडून एकूण ४ देशी बनावटीच्या पिस्तुलांसह ५ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ₹१,६२,००० इतकी आहे. घटना तपशीलदिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी, वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत...
हडपसरमधील प्लास्टिक स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही.
पुणे: हडपसरच्या रामटेकडी परिसरातील सुरेशनगर आणि जुनी म्हाडा कॉलनीजवळ असलेल्या प्लास्टिक स्क्रॅप गोडाऊनला शनिवारी भीषण आग लागली. अंदाजे १५ गुंठे क्षेत्रफळावर फैलावलेल्या या आगीवर अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे नियंत्रण मिळवता आले. घटनेचा तपशील: हडपसरच्या कालाभाई बोराटे नगर आणि बीटी कावडे येथील अग्निशमन केंद्रांमधून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून आगीचा फटका आजूबाजूच्या म्हाडा कॉलनी...
घरफोडी गुन्ह्यातील पाहिजे आरोपी कात्रज येथून जेरबंद; गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान मोठे यश
पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने सतत वाढत असलेल्या घरफोडी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केलेल्या काटेकोर पेट्रोलिंगमधून एक मोठे यश हातात घेतले आहे. पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी कात्रज परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने तत्काळ कारवाई करत आरोपीला जेरबंद केले. गोपनीय माहिती आणि वेगवान कारवाई दिनांक ०६/१२/२०२५ रोजी रात्रीच्याच वेळी गुन्हे शाखा युनिट २...








