Breaking News
मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटातील वाद पेटला; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव.
मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वीच मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटातील वादाने पेट घेतला आहे. राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकल्याच्या घटनेनंतर मुंबईत वातावरण तापले आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसे सैनिकांनी गोबर आणि नारळ फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुंबईत तणाव निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील गडकरी रंगायतन सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक सुरू होती. उद्धव ठाकरे...
पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलमध्ये ‘DigiYatra’ सेवेचा भव्य शुभारंभ!
पुणे विमानतळावरील प्रवाशांसाठी नवीन डिजिटल युगाची सुरुवात होत आहे! अत्याधुनिक सोयींनी युक्त असलेल्या नवीन टर्मिनलवर ‘DigiYatra’ सेवेचा शुभारंभ शनिवार, ८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार मंत्री मा. श्री. मुरलीधरजी मोहोळ प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 🔴 पुणे विमानतळाच्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा! ‘DigiYatra’ सेवा सुरू झाल्याने पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्वरित...
वरळी सीफेसवर संतापजनक प्रकार : पुणे-मुंबई महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
छत्री लागल्याचा राग, अंगावर संतापाने हल्ला – गर्दुल्ल्याच्या क्रूर कृत्याने वरळी सीफेस हादरले! मुंबईतील वरळी सीफेसवर शनिवारी (१९ एप्रिल) एका महिलेवर झालेल्या हल्ल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ हातातील छत्री चुकून अंगाला लागल्याने ३५ वर्षीय व्यक्तीने काचेचा तुकडा महिलेच्या पाठीत खुपसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुपारी दीड वाजताच्या सुमारास अनिता बाळू...
चेंबूर : ऑटोरिक्षा चालकाने शाळेत जाणाऱ्या मुलीला पडक्या इमारतीत नेले, तिच्यावर बलात्कार; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका 13 वर्षीय मुलीवर शाळेत जात असताना रिक्षाचालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याने तिला एका पडक्या इमारतीत नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने मुलीला ही घटना आईला किंवा इतर कोणाला सांगू नकोस अन्यथा आईला जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेली मुलगी कशीतरी घरी पोहोचण्यात यशस्वी झाली. जेव्हा तिच्या पालकांनी तिला तिच्या स्थितीबद्दल विचारले तेव्हा ती तुटून...
पिंपरी चिंचवडमध्ये जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे जापनीज मेंदूज्वर (Japanese Encephalitis - JE) प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. १ ते १५ वयोगटातील बालकांसाठी १ मार्च २०२५ पासून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत अवघ्या तीन दिवसांत ३५ हजारांहून अधिक मुलांचे लसीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही मोहीम शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विशेष लसीकरण शिबिरांमध्ये प्रभावीपणे राबविली जात...
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! डिसेंबरचा हप्ता जमा होणार लवकरच; थकीत रकमेचाही निपटारा सुरू.
मुंबई : राज्यातील महिलांसाठी आर्थिक मदतीचा दिलासा ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना पुन्हा चर्चेत आली आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना मोठा आधार मिळाला आहे. आता या योजनेतील डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. महिला लाभार्थ्यांसाठी आर्थिक मदत: महायुती सरकारने जुलै महिन्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली. या योजनेत...
जय गायकवाडला पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून तडीपार; कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा मोठा निर्णय
खराडी (पुणे) — पुणे शहरातील गुन्हेगारीवर कडक लगाम घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा ठोस पाऊल उचलले आहे. खराडी पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी जय गौरव गायकवाड (वय २०), रा. दिनकर पठारे वस्ती, लेन नं. २, पप्पु शिंदे यांचे घरासमोर, खराडी, पुणे याला तडीपार करण्यात आले आहे. या आरोपीविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्या हालचालींमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती....
पुण्यात वाहनचोरी करणारा आरोपी जेरबंद; गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई
पुणे शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी Pune Police यांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत वाहनचोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Faraskhana Police Station येथे दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले....
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा
मुंबई, दि.20 : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य...
पुण्यात यंदा साकारतेय वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती; दगडूशेठ गणपतीच्या १३४ व्या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरणार!
पुणे : पुण्याच्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या यंदाच्या १३४ व्या गणेशोत्सवासाठी भक्तांना भव्य आणि आध्यात्मिक अनुभव देणारी आकर्षक सजावट साकारण्यात येणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात वृंदावन येथील प्रसिद्ध प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येत असून, ही सजावट गणेशभक्तांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य प्रतिकृती साकारली जात...













