Breaking News
लालबागच्या राजाच्या अंतिम विसर्जन प्रवासाला सुरुवात; चिंवडा गल्लीपासून निघाली भक्तांची महासागरासारखी मिरवणूक
मुंबई : मुंबईच्या सुप्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला अखेर सुरुवात झाली असून, चिंवडा गल्ली येथून बाप्पाने आपल्या अंतिम विसर्जन प्रवासाला प्रस्थान केले. बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या विविध भागांतून आलेल्या लाखो भाविकांची गर्दी मिरवणुकीत पाहायला मिळत आहे. उपलब्ध माहितीनुसार, जवळपास ५ लाख भाविक या भावनिक आणि भक्तिमय सोहळ्याचे साक्षीदार झाले आहेत. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला मुंबईच्या गणेशोत्सवातील विशेष महत्त्व आहे....
स्वागतम ई-प्रवेश प्रणालीला नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद आजपर्यंत सुमारे ७ हजार ८९४ जणांनी घेतला लाभ
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी सेवा देण्यासाठी दि. १ मे २०२६ पासून महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेशासाठी ‘स्वागतम ई-प्रवेश’ ही ऑनलाइन नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून १ मे २०२६ ते २५ मे २०२६ (सायंकाळी ४ वाजेपर्यंत) या कालावधीत सुमारे ७ हजार ८९४...
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केली निगडी प्राधिकरण अग्निशमन केंद्राच्या कामाची पाहणी…
दि.१८ फेब्रुवारी २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निगडी प्राधिकरण येथे नवीन अग्निशमन केंद्राच्या इमारतीच्या काम सुरू आहे. या इमारतीच्या कामाची महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी संबधित अधिका-यांकडून कामाची माहिती घेत काम मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य़ विभागाअंतर्गंत निगडी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवनाजवळ अत्याधुनिक अशा अग्निशमन क्रेंद्राचे काम...
परिवहन वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू
पुणे :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे मालवाहतूक, टुरिस्ट टॅक्सी, बस तसेच अॅम्ब्युलन्स या परिवहन संवर्गातील वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. या नव्या मालिकेमुळे वाहनधारकांना त्यांच्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ज्या वाहनधारकांना खास व लक्षवेधी नोंदणी क्रमांक हवा आहे, त्यांनी विहित शुल्क (तीनपट किंवा नियमित शुल्क) भरून अर्ज करावा. यासाठी...
भुसावळमधील वांजोळा चौक बनला ‘डेथ ट्रॅप’; महिनाभरात 10 भीषण अपघात, अनधिकृत प्रवेश मार्गांमुळे नागरिकांमध्ये भीती
भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील वांजोळा चौक हा सध्या अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असून, गेल्या अवघ्या एका महिन्यात या चौकात तब्बल 10 गंभीर रस्ते अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांनी या चौकाला आता ‘डेथ ट्रॅप’ अर्थात मृत्यूचा सापळा अशी उपमा दिली आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले...
महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
पिंपरी, दि. १२ जानेवारी २०२६ – छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचा मुलमंत्र देणाऱ्या तसेच मुत्सद्दीपणा, नितीमत्ता यांचा सुरेख संगम असलेल्या स्वराज्यप्रेरिका जिजाऊ माँसाहेब या थोर आदर्श राजमाता आहेत. सक्षम नेतृत्व घडवायचे असेल तर मूल्याधिष्ठित विचारांची पायाभरणी आवश्यक असते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. तर स्वामी विवेकानंद यांनी तरुणाईला केवळ स्वप्न पाहायला नाही, तर जबाबदारी घ्यायला शिकवले. आत्मविश्वास, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा...
“गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे” – आमदार महेश लांडगे यांचा उपमुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष इशारा; गोसंवर्धनावरून दोन दादांमध्ये पुन्हा आमने-सामने
पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी गोरक्षकांवरील खोटे आरोप आणि गोरक्षणावर लावण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत खणखणीत भूमिका मांडली आहे. इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गढी आणि समाधीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनात ते बोलत होते. लांडगे म्हणाले, "गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नाही, तर हा धर्मरक्षणाचा आणि गोमातेच्या संवर्धनाचा पवित्र...
सराईत ३ आरोपींकडून ०४ गावठी पिस्तुलं आणि ०५ जिवंत काडतुसे जप्त
कळेपाडळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगारांच्या धाडसी टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ०३ रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून ०४ गावठी पिस्तुलं आणि ०५ जिवंत काडतुसे अशी मोठी शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली असून अंदाजे रु. 2,42,000/- चा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. या टोळीमुळे परिसरात गुन्हेगारी वाढू शकते, अशी शक्यता वर्तविली...
पिंपरीत किरकोळ वादातून चाकू हल्ला; लिफ्ट परिसरातील घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निवासी इमारतीतील लिफ्ट परिसरात शू रॅकवर थुंकण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच गंभीर हाणामारीत बदलला आणि एका तरुणाने थेट चाकू काढून एका व्यक्तीवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात...
सांगवी विभागाला मिळाले नवे ACP कार्यालय; नागरिकांना अधिक तत्पर आणि पारदर्शक पोलीस सेवा मिळणार
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि जलद पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सांगवी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) कार्यालयाचे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या नव्या कार्यालयाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) फीत कापून आणि फलकाचे अनावरण करून करण्यात आले. सांगवी विभागातील वाढते कामकाज, नागरिकांच्या तक्रारी आणि पोलीस प्रशासनाशी...









