येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वारकरी आचारसंहिता परिषद तथा हरिभक्त परायण निलेश महाराज झरेगावकर आणि राष्ट्रसंत आचार्य परमपूजनीय स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. हा किर्तन सोहळा राष्ट्रसंत आचार्य परमपूजनीय स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ०७.०६.२०२४ रोजी पार पडला.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या “जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो” या पसायदानातील आकांक्षेचे प्रत्यक्ष प्रकटीकरण करणारा हा किर्तन सोहळा होता. यामध्ये कैद्यांच्या मनावर किर्तनाच्या प्रभावाने बदल घडवून त्यांचे ज्ञानदीप प्रज्वलित होईल, असा उद्देश होता.
हा उपक्रम अमिताभ गुप्ता (भा.पो.से), अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, आणि डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से), विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे, यांच्या संकल्पनेतून तसेच श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा खुले कारागृह, डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक, श्रीमती पी. पी. कदम, उपअधीक्षक, एम. एच. जगताप, उपअधीक्षक, श्रीमती मंजीरी कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, दक्षता पथक, उपमुख्यालय, पश्चिम विभाग, पुणे, आनंदा एस कांदे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, सी. आर. सांगळे, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, व्ही. के. खराडे, सुभेदार, तसेच भजनी मंडळ, देवाची आळंदी यांनी काम पाहिले.











