गुन्हेगारी

Home गुन्हेगारी Page 23

पुण्यातील धक्कादायक दरोडा प्रकरणातील मुख्य फरार आरोपी अखेर जेरबंद!

0

पुणे | पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या प्राणघातक हल्ला व दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी फिरोजखान शरीफखान दुल्होत उर्फ मेवाती याला नाशिक येथून सापळा रचून अटक करण्यात आले आहे. या अटकेनंतर पोलीस विभागाने मोठा सुटकेचा नि:श्वास सोडला असून, हा गुन्हा उकलण्याच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई ठरली आहे. गुन्ह्याची पार्श्वभूमी ▪️ २२ ऑक्टोबर २०२४ रोजी डेक्कन पोलीस हद्दीत प्रभात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार – डिजिटल पोलीस सेवांचा विस्तार!

0

मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी! आता मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाणे थेट 'X' (पूर्वीचे Twitter) वर उपलब्ध होणार आहे. नागरिकांना तक्रारी नोंदवणे आणि मदतीसाठी संपर्क करणे आता अधिक सोपे आणि वेगवान होणार आहे. ➡ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार – डिजिटल पोलीस सेवांचा विस्तार!सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च-तंत्रज्ञानयुक्त पोलीस वाहने आणि अत्याधुनिक सायबर प्रयोगशाळांचे उद्घाटन केले....

खंडणीसाठी अपहरण! पुणे पोलिसांची तात्काळ कारवाई; २४ तासांत पिडीताची सुटका व गुन्हा उघडकीस

0

पुणे – वडगाव शेरी परिसरात कामावर निघालेल्या एका इसमाचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्याच्या मोबदल्यात २ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांनी केवळ २४ तासांत अटक करून पिडीताची सुटका केली आहे. ही धडाकेबाज व वेगवान कारवाई चंदननगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा विश्वास बसला आहे. घटनाक्रम : ३० जून २०२५ रोजी एक इसम कुबा मस्जिदजवळून...

रत्नागिरीतील परिचारिका विद्यार्थिनीवर अत्याचारप्रकरणी तीन जण ताब्यात; गुन्हेगाराचा शोध सुरू.

0

रत्नागिरी जिल्ह्यातील एका १९ वर्षीय परिचारिका विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची ओळख अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही, आणि त्यांची चौकशी सुरू आहे. या तरुणीवर एका अज्ञात ऑटो रिक्षा चालकाने अत्याचार केला असल्याचा आरोप आहे. सकाळी देवघर शहरातून परतत असताना हा प्रकार घडला. कथितरित्या, ऑटो चालकाने तिला...

नाशिक दांपत्याकडून ओळखीच्या लोकांना तब्बल ₹२.२५ कोटींचा गंडा – खोट्या ‘इन्कम टॅक्स’ छाप्याच्या कहाणीने फसवणूक!

0

नाशिक शहरातील एका दांपत्याने ओळखीच्या लोकांना तब्बल २.२५ कोटी रुपयांचा गंडा घालून शहरात खळबळ उडवली आहे. खोट्या ‘आयकर विभाग’ छाप्याची कथा रचून संशयितांनी पैशांची उकळपट्टी केली. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी ऋषिराज टेकाडे याला अटक केली असून, त्याची पत्नी रविना टेकाडे फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. तक्रारदार ज्ञानेश्वर संपतराव तिडके (रा. दिंडोरी) यांच्याकडून सुरुवात झाली. संशयिताने तिडके यांना सांगितले...

जमावबंदी आदेश झुगारून मनसे-शिवसेना मराठी मोर्चा; आयोजकांवर कारवाईची शक्यता!

0

मीरा-भाईंदरमध्ये काल, ८ जुलै मंगळवारी काढण्यात आलेल्या मराठी अस्मितेच्या मोर्चावर आता कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून हा मोर्चा आयोजित केला होता. मात्र, पोलिसांनी पूर्वीच या मोर्च्याला परवानगी नाकारली होती आणि त्याच दिवशी जमावबंदीचे आदेश लागू होते. सदर आदेशांची पायमल्ली करत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि मराठी माणसाच्या...

पुण्यात धक्कादायक घटना : डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार खंडणीप्रकरणी निलंबित! कायदेकर्तेच ठरले कायदाभंग करणारे?

0

पुणे | २१ जून २०२५ :- पुणे शहर पोलीस दलात एका अत्यंत लज्जास्पद आणि धक्कादायक प्रकाराने खळबळ माजवली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन अंमलदारांनीच एका तरुणाला खोट्या तक्रारीच्या नावाखाली अटक करण्याची धमकी देत थेट एटीएममध्ये नेऊन त्याच्याकडून तब्बल २०,००० रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. कायद्याचे रक्षक की भक्षक? पोलीस हे समाजाच्या सुरक्षेसाठी असतात, पण जेव्हा हेच रक्षक खंडणी वसूल...

मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा; मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय, देशभरातील मच्छीमारांना वार्षिक ₹६,००० चा लाभ

0

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. देशातील कोट्यवधी मच्छीमारांसाठी दिलासादायक ठरणारा हा निर्णय म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देणे. भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मत्स्य व्यवसायाला आता कृषी व्यवसायाच्या समकक्ष मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मच्छीमार बांधवांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळणार असून, थेट वर्षातून ₹६,०००...

वाघोलीत सोनसाखळी चोरीचा पर्दाफाश; गुन्हेगार जेरबंद, पोलिसांकडून १ लाखांची सोनसाखळी जप्त

0

पुणे शहरातील वाघोली पोलीस स्टेशनच्या कार्यकुशल तपासातून अट्टल सोनसाखळी चोरट्याला अखेर जेरबंद करण्यात आले. दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी मौजे केसनंद, थेऊर रोडवरील पाटील वस्ती येथे गणेश किराणा स्टोअरमध्ये घडलेल्या सोनसाखळी चोरीप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेच्या दिवशी दोन अनोळखी इसम मोटारसायकलवरून किराणा दुकानात आले. त्यातील एकाने दुकानात बिस्किटे आणि चॉकलेट मागण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याशी संवाद साधला व संधी...

पुणे पोलिसांची अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई! दोन्ही ठिकाणाहून ७.८८ लाख रुपयांचा दोडाचुरा व गांजा जप्त – पाच जणांना अटक

0

पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक २ ने मोठी कारवाई करत तब्बल ₹७,८८,१००/- किंमतीचा अफूच्या बोंडांचा चुरा (दोडाचुरा) व गांजा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी मिळून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही विशेष कारवाई हडपसर आणि खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून, ही धडक मोहीम वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात...

Copyright ©