“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा”
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पडली. आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी ९२ तक्रारी वजा सूचना मांडल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १२, ९, २, १८, ३, ८, ८ आणि ९ अशा एकूण ६९ तक्रारवजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेसाठी...
पुण्यात मर्सिडीजचा भीषण अपघात; हिट अँड रनमुळे तरुणाचा जागीच मृत्यू
पुणे – शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवले ब्रिजजवळ भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज कारने एका दुचाकीस्वाराला उडवल्याने चिंचवडमधील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव कुणाल हुशार (राहणार – चिंचवड) असे असून, ही घटना शनिवारी (३ मे २०२५) पहाटे सुमारे चारच्या सुमारास घडली. अपघात...
पिंपळे गुरवमध्ये धक्कादायक अपघात: धावत्या कारने दुचाकीस्वाराला फरफटत नेले, दुचाकीस्वार गंभीर जखमी.
पुणे: पिंपळे गुरव परिसरात झालेल्या धक्कादायक अपघातात, एका आलिशान कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. हा अपघात दुपारी ४ वाजता मुख्य बस थांब्याजवळ झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, कारने त्याला अनेक मीटरपर्यंत फरफटत नेले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, तो पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. साक्षीदारांच्या माहितीनुसार, कारचालक नशेत होता आणि त्याने दुचाकीला मागून...
धक्कादायक! पुण्यात महाविद्यालयीन युवकाकडून पिस्तूल खरेदी-विक्री; पोलिसांनी युवकाला अटक केली
पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून पिस्तूल खरेदी-विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परिसरात एक तरुण पिस्तूल घेऊन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत आर्यन बापू बेलदरे (वय 19, रा. श्री व्हिला अपार्टमेंट, अंबेगाव) या युवकाला अटक केली. पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त: पोलीस तपासात समोर आले की, आर्यन बेलदरेने कमी किंमतीत पिस्तूल खरेदी करून त्याचा...
प्रियाताई बेर्डे यांना कसबा संस्कार केंद्र, पुणे परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा; सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी गौरव
पुणे | कसबा पेठ : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख आणि समाजहितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या प्रियाताई बेर्डे यांना कसबा संस्कार केंद्र, पुणे परिवाराच्यावतीने वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. केंद्राच्या हितचिंतक सहकारी आणि मार्गदर्शिका असलेल्या प्रियाताईंनी केवळ कलाक्षेत्रातच नव्हे, तर समाजप्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि संस्कारमूल्ये जपणाऱ्या उपक्रमांमध्येही मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रातर्फे...
मावळ तालुक्यात पर्यावरणपूरक ऐतिहासिक निर्णय – विदेशी वृक्ष काढून स्थानिक प्रजातींची लागवड; जैवविविधतेला मिळणार नवा श्वास
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मावळ तालुक्यात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सह्याद्री देवराई संस्था आणि पुणे उपवनसंरक्षक कार्यालय (पुणे विभाग) यांच्यातील करारावर आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. या करारानंतर सोमाटणे, गहुंजे आणि भंडारा डोंगर परिसरात विदेशी वृक्षांची जागा भारतीय स्थानिक प्रजाती घेणार आहेत. गेल्या काही दशकांत सबबाबूल, ग्लिरिसीडिया यांसारख्या विदेशी जातींचा परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रसार...
आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ‘चितळे बंधू’ दुकानफोडी प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद, तीन गुन्ह्यांचा उलगडा
पुणे : आंबेगाव परिसरातील नामांकित ‘चितळे बंधू’ दुकानात घरफोडी करून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत एका विधीसंघर्षित बालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या चौकशीत एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ₹1,24,600 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 10.15 ते दि. 26 जानेवारी रोजी सकाळी...
पुणे मेट्रोच्या वनाज-रामवाडी मार्गाची पूर्ण कार्यक्षमता; येरवडा स्टेशनचे उद्घाटन आज.
पुणे: पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गावरील येरवडा मेट्रो स्टेशनचे व्यावसायिक संचालन बुधवारी सुरू होत आहे. या स्टेशनची वास्तू ऐतिहासिक दांडी मार्चने प्रेरित असून, ती भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण अध्यायाचे प्रतीक आहे. हे स्टेशन केवळ एक महत्त्वपूर्ण परिवहन दुवा म्हणून काम करणार नाही, तर आपल्या समृद्ध वारशाची आठवण करून देईल. आता वनाज ते रामवाडी मार्ग पूर्णपणे कार्यान्वित होणार असून,...
पुणे: राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या कुस्तीपटू विजय दोइफोडे खड्ड्यामुळे जखमी; खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली भेट.
पुणे महापालिकेने शहरातील खड्डे दुरुस्त केल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्ष परिस्थिती चिंताजनकच आहे. नुकताच २२ वर्षीय कुस्तीपटू विजय दोइफोडे स्वारगेटजवळ आपल्या दुचाकीवरून जात असताना खड्ड्यामुळे अपघात झाला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सध्या दोइफोडे यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रुग्णालयात दोइफोडे यांची भेट घेतली आणि डॉक्टरांशी त्यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा...
तलावडेतील वादातून मित्राचा खून: फरार आरोपीला भुसावळ येथून अटक.
पुणे: देहू रोड पोलिसांनी मित्राच्या खुनात फरार असलेल्या १९ वर्षीय कामगाराला भुसावळ येथून अटक केली आहे. आरोपी जयप्रकाश सादय याने २ नोव्हेंबर रोजी झालेल्या या खुनानंतर शहर सोडले होते. या प्रकरणात दुसऱ्या साथीदाराला शिक्रापूर येथे अटक करण्यात आली आहे. मयत अमोद कुमार यादव (२३), मूळचा बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील होता, आणि त्याच्या भावाने देहू रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली...













