सिग्नलवर अपघाताचा बहाणा करून मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद; मेरठच्या दोन आरोपींना पुणे पोलिसांनी पकडले
Pune शहरात सिग्नल व गर्दीच्या ठिकाणी अपघाताचा बनाव करून वाहनचालकांची फसवणूक करत मोबाईल व इतर वस्तू जबरदस्तीने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील Meerut येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई Faraskhana Police Station यांच्या गुन्हे तपास पथकाने केली. आरोपींची नावे रवी ओमप्रकाश कोहली आणि अफजल कयूम अब्बासी अशी असून दोघेही मेरठ...
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या घरगुती पाईपलाईन जोडणी कामकाज करिता प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एम एन जी एल) कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांची आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या समवेत घरगुती पाईपलाईन जोडणी कामकाज संदर्भात नुकतीच बैठक घेण्यात झाली त्या बैठकीत कंपनीने कुशल मनुष्यबळ प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असून याबाबत महापालिकेने सहकार्य करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली, महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मोरवाडी येथे उपरोक्त विषयांकित प्रकरणी एमएनजीएल यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनपर कार्यक्रम व भरती मेळावा घेण्यात आला.यात संस्थेमधील प्लंबर या ट्रेडचे आजी व माजी विद्यार्थ्यांशी समक्ष संपर्क साधून...
व्यापाऱ्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश – गुन्हे शाखेच्या युनिट-४ ची मोठी कारवाई!
पुणे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने धडक कारवाई केली जात असून, युनिट-४ गुन्हे शाखेच्या पथकाने व्यापाऱ्याच्या कुटुंबाला धमकावून खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना, पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या आरोपींना विश्रांतवाडी परिसरात अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १४,४२,०७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्याची पार्श्वभूमी येरवडा पोलीस...
पुणे कॉमिक कॉन २०२५ ने चाहत्यांना दिल्या अविस्मरणीय आठवणी – कॉमिक्स चाहत्यांना मिळाली ब्लॉकबस्टर वीकेंडची पर्वणी
पुणे, १० मार्च:- क्रंची रोलच्या सौजन्याने आयोजित मारुती सुझुकी अरीना पुणे कॉमिक कॉन २०२५ ने पुणेकरांना या वर्षातील सर्वोत्तम ब्लॉकबस्टर वीकेंडची पर्वणी दिली आहे. अविस्मरणीय आठवणींसह हा कार्यक्रम संपूर्ण शहराला पॉप कल्चरच्या भव्य उत्सवात न्हाऊन काढणारा ठरला. पुण्यासह विविध भागांतून आलेल्या चाहत्यांना या दोन दिवसीय उत्सवाने नॉन-स्टॉप मनोरंजनासह, खास चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी आणि इंडस्ट्रीतील नामांकित ब्रँड्सच्या आकर्षक अनुभवांसाठी...
वाहतूक पोलीस व जहागीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ट्रॅफिक मिटिगेशन’ इंटर्नशिप प्रोग्रामचा शुभारंभ
पुणे – पुणे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाहतूक पोलीस, जहागीर हॉस्पिटल, पीपीसीआर आणि टीएमसीएफ संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘ट्रॅफिक मिटिगेशन’ इंटर्नशिप प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आणि लेक्सिकॉन कॉलेजच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५.२० वा. पोलीस आयुक्त कार्यालयातील कॉप एक्सलन्स हॉलमध्ये...
“एक दिवा – पराक्रमासाठी”: सीमारेषेवरील वीरांसाठी पुण्यात दिवे लावून अभिवादन!
पुणे :- देशाच्या संरक्षणासाठी सीमारेषेवर दिवस-रात्र झगडणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या जवानांना आणि सीमावर्ती भागातील सामान्य नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर प्रांगणात “एक दिवा – पराक्रमासाठी” हा प्रेरणादायी कार्यक्रम असीम फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, लहान मुलं, महिलावर्ग आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत एकात्मतेचा, शौर्याचा आणि आशेचा दिवा...
‘Run For Walk’ एकता दौडीत हजारो नागरिकांचा सहभाग — राष्ट्रभावना आणि आरोग्याचा संगम!
पुणे: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘Run For Walk’ या एकता दौडीत नागरिक, विद्यार्थी, पोलीस अधिकारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या उपक्रमाचे आयोजन पुणे शहर पोलीस, अंमली पदार्थ विरोधी पथक, तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६:३० वाजता पुणे पोलीस आयुक्तालयातून झाली. या प्रसंगी पुणे...
विश्वेश कुलकर्णी यांची ICHRA च्या सरचिटणीसपदी एकमताने निवड; जागतिक मानव संसाधन क्षेत्रात पुण्याचा मान उंचावला
पुणे : मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रात महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी महत्त्वपूर्ण घटना घडली असून पुण्यातील ज्येष्ठ मानव संसाधन तज्ज्ञ विश्वेश कुलकर्णी यांची इंटरनॅशनल कॉन्फिडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स असोसिएशन्स (ICHRA) या जागतिक संस्थेच्या सरचिटणीसपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. ट्युनिशियातील ट्युनिस येथे नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ICHRA ही मानव संसाधन विकास क्षेत्रातील जागतिक...
पत्रकारांच्या आरोग्य संरक्षणासाठी नवा उपक्रम : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची महत्त्वपूर्ण घोषणा!
पुणे : समाजातील घडामोडींचे नेमके आणि वस्तुनिष्ठ दर्शन घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करतात. मात्र, सातत्याने कार्यरत राहिल्याने त्यांचे आरोग्य अनेकदा दुर्लक्षित होते. या पार्श्वभूमीवर, पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना सवलतीच्या दरात आरोग्यसेवा मिळावी यासाठी पुण्यातील विविध रुग्णालयांशी लवकरच चर्चा करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि क्रस्ना डायग्नोस्टिक्स...
“पुणे पोलिसांचे अमूल्य सदस्य श्वान ‘लिओ’चा मृत्यू: अनेक मोठọ अमली पदार्थ प्रकरणांचा साक्षीदार”
पुणे: पुणे शहर पोलिस दलाने मंगळवारी आपल्या अमली पदार्थ तज्ञ श्वान, लिओ याला गमावले. लिओने आपल्या आठ वर्षांच्या सेवाकाळात अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या सन्मानार्थ पोलिसांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लिओचा जन्म आणि पोलिस दलात प्रवेश: लिओ, एक लॅब्राडॉर जातीचा श्वान, २० जुलै २०१६ रोजी जन्मला. सप्टेंबर २०१६ मध्ये त्याला पुणे पोलिसांच्या श्वान पथकात...












