पुणे

Home पुणे Page 95

प्रशिक्षक विवेक मालशे यांचे यश अभिमानास्पद – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे

0

पिंपरी : नवी दिल्ली येथे इंडीयन डेफ क्रिकेट असोसिएशन (आयडीसीए) तर्फे ९ व्या टी-२० राष्ट्रीय डेफ क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र मूकबधिर क्रिकेट संघाने जम्मू काश्मीर मूकबधिर क्रिकेट संघाचा ८ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल विवेक मालशे मोलाचा वाट उचलला. या स्पर्धेत प्रशिक्षक या नात्याने...

मांजरी पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गांजा विक्री करणारा आरोपी अटकेत, ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे | प्रतिनिधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. याच कारवाईचा भाग म्हणून मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस अटक करून मोठी कामगिरी बजावण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलाकडून सातत्याने नाकाबंदी, पेट्रोलिंग, गुन्हेगार तपासणी तसेच अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार,...

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकची धडक; वडील-मुलगी ठार, १२ जण जखमी

0

पुणे, २२ एप्रिल २०२५ : पुणे-मुंबई महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या प्रवासी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात वडील आणि त्यांची लहान मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती. अपघातात मृत्युमुखी पडलेले पिता-पुत्री हे आप्तस्वकीयांसह सासवडकडे जात...

मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे : मानव - बिबट संघर्षात आता पर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे यावर तात्पुरती उपाययोजना न करता कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड आणि दौंड तालुक्यांमध्ये वाढलेल्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे, सोलर कुंपण, सायरन पोल, बिबट रिस्कयू सेंटर उभारण्याबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले.  ...

‘पुणे श्री २०२५’ शरीरसौष्ठव स्पर्धेची उत्सुकता शिगेला – १६ फेब्रुवारीला रंगणार पर्वणी

0

🔹 पुण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाची शरीरसौष्ठव स्पर्धा 🔹 शरीरसौष्ठव प्रेमींसाठी सुवर्णसंधी – विजेत्यांना पाच लाखांचे बक्षीस! पुणे शहराच्या क्रीडा परंपरेला सन्मान मिळवून देणारी ‘पुणे श्री २०२५’ शरीरसौष्ठव स्पर्धा येत्या १६ फेब्रुवारी रोजी नवी पेठेतील लोकमान्य नगर जॉगिंग पार्क येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. द हिंदू फाउंडेशन यांच्या वतीने आणि पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना व फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड...

मोका व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

0

गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई – आदित्य उर्फ बंटी मंडलीक जेरबंद! पुणे – शहरात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत मोका आणि जबरी चोरी प्रकरणातील पाहिजे आरोपी आदित्य उर्फ बंटी मंडलीक याला ताब्यात घेतले आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शिताफीने केलेल्या या कारवाईमुळे मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. वारजे माळवाडीतील गुन्हेगारी टोळीतील प्रमुख...

पुणेकरांना सायबर गुन्ह्यांचा फटका – २०२४ मध्ये ₹६,००७ कोटींचे आर्थिक नुकसान! पुणे पोलिसांचा सायबर सुरक्षेसाठी मोठा निर्णय

0

पुणे, ८ मार्च: महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अहवालानुसार २०२४ मध्ये पुणेकरांना सायबर गुन्ह्यांमुळे तब्बल ₹६,००७ कोटींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. एकूण १,५०४ प्रकरणांमध्ये एवढा मोठा फटका बसल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुंबई, नागपूर आणि ठाणे या तिन्ही शहरांतील एकत्रित नुकसानाच्या तुलनेत पुण्याचे नुकसान पाचपट अधिक आहे. मुंबईत ४,८४९ प्रकरणांमध्ये ₹८८८ कोटींचा तोटा, ठाण्यात...

हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक!

0

पुणे शहरातील हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) या घातक इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन जणांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सुमारे १९० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या असून त्यांची एकूण बाजारभावानुसार किंमत सुमारे १ लाख रुपये आहे. दिनांक ९ मार्च २०२५ रोजी हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई केली. तपास पथक...

पुण्यात मद्यपी चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; ४ दिवसांत २४२ जणांवर कारवाई

0

पुणे | दि. 29 डिसेंबर 2025 पुणे शहरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कडक पावले उचलण्यात आली आहेत. ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी २५ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत सलग चार दिवस विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान पुणे शहरातील विविध प्रमुख चौक, रस्ते व...

महागाईचा झटका: डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ.

0

लागणारी किंमत वाढ डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी देशभरात LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. वाणिज्यिक सिलिंडरच्या किमतीत 18.50 रुपये वाढ झाली आहे. या वाढीचा फटका मुख्यत: व्यावसायिक ग्राहकांना बसला आहे. तथापि, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही. वाढीचे कारण: या किंमत वाढीचा मुख्य कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आहे, तसेच सरकारी खर्च वाढण्याच्या कारणास्तव...

Copyright ©