तासगाव हत्याकांड: बिबवेवाडी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक; क्रूर हत्याकांडाचा पर्दाफाश.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात वाईफळे येथे गुरुवारी सायंकाळी घडलेल्या ओंकार ऊर्फ रोहित संजय फाळके हत्याकांडातील आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. क्रौर्याची सीमा ओलांडून झालेल्या या हत्येमध्ये आरोपींनी कुदळ आणि तलवारीचा वापर केला होता. घटनेचा तपशील: गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता वाईफळे गावात ओंकार ऊर्फ रोहित फाळके यांच्यावर आरोपी विशाल साज्जन फाळके आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला. या हल्ल्यात ओंकार यांचा...
धुलिवंदन निमित्त पुणे मेट्रो सेवा काही तासांसाठी बंद
धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. १४) पुणे मेट्रोची सेवा काही तासांसाठी बंद राहणार आहे. महामेट्रोकडून प्रवाशांना सहकार्याची विनंती करण्यात आली आहे. मेट्रो प्रशासनाच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ६ ते दुपारी ३ या वेळेत दोन्ही मार्गांवरील मेट्रो सेवा बंद असेल. मात्र, दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो सध्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज...
पुणे पोलिसांची नवी पहल! पोलीस उप-आयुक्त स्वतः येणार ठाण्यांमध्ये – प्रलंबित तक्रारींवर थेट मार्गदर्शन | नागरीकांनी घ्यावी उपस्थिती
पुणे शहर पोलिसांकडून नागरिकांशी थेट संवाद वाढवण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये पोलीस परिमंडळाचे उप-आयुक्त स्वतः पोलीस ठाण्यांमध्ये हजर राहून प्रलंबित गुन्हे व तक्रारी अर्जांच्या निपटाऱ्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. पोलीस ठाण्यांना भेट देणार पोलीस उप-आयुक्त हा उपक्रम मंगळवार, २९ जुलै ते गुरुवार, ३१ जुलै २०२५ दरम्यान राबवण्यात येणार...
पुण्यात ‘पब कल्चर’ला पोलीस आयुक्तांचा पाठिंबा, मात्र गैरप्रकारांना कडक विरोध; पबसाठी नियमावली आवश्यक.
पुण्यात पब कल्चर वाढले आहे, मात्र त्यासोबतच होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. पोलीस आरोग्य मित्र फाऊंडेशन आणि सुभाषनगर माडीवाले कॉलनी मंडळाच्या वतीने आयोजित ‘कॉफी विथ सीपी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. परिस्थितीचा आढावा: पुण्यात परप्रांतीय विद्यार्थ्यांची आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंत्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील सांस्कृतिक रूप बदलले आहे. शहरात...
ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
शहरवासियांनी स्वत:च्या विकासासोबत गावाच्याही विकासावर भर दिला पाहिजे : प्रवीण दरेकर
पुणे : पोलादपूर मुळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासीयांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावाच्या ही विकासाचा विचार करावा असे प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर (आमदार- विधान परिषद, अध्यक्ष-मुंबई बँक) यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयेजित भव्य सत्कार समारंभात बोलत होते. पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे प्रवीण दरेकर यांच्या हस्ते माधुरीताई मिसाळ (राज्यमंत्री, महाराष्ट्र ) आणि संतोष...
पुणे गुन्हे शाखा युनिट-6 ची मोठी कारवाई! तब्बल ₹18 लाखांचा जुगार अड्डा उध्वस्त, 17 जुगारी अटकेत
पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-6 ने मोठी धडक कारवाई करत बेकायदेशीर जुगार अड्डा उध्वस्त केला आहे. या कारवाईत तब्बल ₹18 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 8 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बाणेर परिसरातील एका ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी...
लोणावळा घरफोडी प्रकरणातील मोठा खुलासा! ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; चार आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार अटकेत
लोणावळा – पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात घरफोडी प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करत तब्बल ३० लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत चार आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींची नावे अशी – 🔹 चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू (३२, रा. चाफेकरनगर, चिंचवड गाव)🔹 धनंजय हरीष काळे (२०, रा. भारतनगर झोपडपट्टी)🔹...
महापालिकेच्या स्वीप उपक्रमांतर्गत शेकडो युवक-युवतींनी घेतली मतदानाची शपथ, १००% मतदानाचा निर्धार
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वीप (सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) उपक्रमांतर्गत शेकडो युवक-युवतींनी मतदानाचे महत्त्व समजून घेतले आणि १००% मतदान करण्याचा निर्धार केला आहे. या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या तरुण पिढीने देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सक्रीय योगदान देण्याचे वचन दिले. महापालिकेने मतदार जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात युवक-युवतींनी लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी आपल्या मताचा हक्क योग्य प्रकारे बजावण्याची...
मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मुलीच्या बनावट अकाउंटचा वापर, सिंहगड रोडवर कोयत्याने हल्ला – पुण्यात गुन्हेगारीचा नवीन धक्कादायक प्रकार.
पुणे: शहरातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, सिंहगड रस्त्यावर आज (दि.४) सकाळी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य आणि खुनाचा बदला असल्याचे समजते. सागर चव्हाण (जखमी तरुण) याच्यावर हा हल्ला करण्यात आला. किरकटवाडी भागातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. सागर याचा मे महिन्यातील डहाणूकर कॉलनीत झालेल्या खुनाच्या घटनेशी...
















