हडपसरच्या सराईताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी
पुणे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या प्रयत्नात, बंडगार्डन पोलिसांनी हडपसरच्या सराईताला अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. कॅम्प परिसरातील एका बंगल्यात चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ८ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव आर्यन अजय माने (वय २०, रा. भेकराईनगर, हडपसर) असे आहे. काही दिवसांपूर्वी कॅम्प परिसरातील ओल्ड खान रोड येथे...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप
पिंपरी : “महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे केवळ प्रशासनाचे घटक नाहीत, तर शहर विकासाचे प्रेरक बिंदू आहेत. खेळातून संघभावना, शिस्त आणि उत्साह वाढतो; हेच गुण उत्तम नागरिकसेवेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आरोग्य टिकवा, खेळत राहा आणि जनसेवेतील कार्य अधिक प्रभावी बनते. या उपक्रमांमधून महापालिका परिवारातील एकजूट, उत्साह आणि कार्यक्षमतेचे दर्शन घडले. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्यदायी शरीर, समर्पित मन आणि नागरिकसेवेची भावना...
पिंपरी चिंचवड महापालिकेत महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी; विचार प्रबोधन पर्वासह विविध उपक्रमांचे आयोजन
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयात अभिवादन प्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे,अनिल लखन उपस्थित होते. तर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय,संत तुकारामनगर येथील कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे,अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.अभयचंद्र दादेवार, तसेच डाॅ. मनिषा सुर्यवंशी,आरोग्य निरीक्षक राजकुमार वाघमारे, सिस्टर इनचार्ज सविता निगडे आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महर्षि वाल्मिकी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी मोकळ्या मैदानात करण्यात आले होते. या प्रबोधन पर्वास उप आयुक्त अण्णा बोदडे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,विधीतज्ञ अँड.सागर चरण, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रबोधन पर्वाच्या प्रारंभी महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील उत्कृष्ट कामकाज करणा-या सफाई कामगार, वॉर्डबॉय, आया,आरोग्य निरीक्षक यांना प्रशस्तीपत्रक, शाल देऊन गौरविण्यात आले. सफाई कर्मचारी यांचेकरीता बहारदार हिंदी, मराठी गीतांसह महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष होम मिनिस्टर- खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन उस्फुर्त प्रतिसाद दर्शवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार किरण गायकवाड यांनी मानले.
दलितांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी महाराष्ट्र बीजेपीने काँग्रेसवर आरक्षणविरोधी असल्याचा आरोप केला.
महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी, भाजप पुन्हा दलित समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसवर निशाणा साधत आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपवर ‘असंविधानिक’ असल्याचा आरोप करून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या मतांमध्ये घसरण घडवली होती. राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणावरील वक्तव्यांमुळे भाजप आता काँग्रेसला ‘आरक्षणविरोधी’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत विद्यार्थ्यांशी बोलताना भारतातील आरक्षण व्यवस्था केवळ 'न्याय्य भारत'...
बदलापूर-नवी मुंबई टनेल रोड पुढील वर्षी खुला होणार; प्रवास वेळ २० मिनिटांवर येणार!
मुंबई: बदलापूर आणि नवी मुंबई यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी टनेल रोड प्रकल्प पुढील वर्षी खुला होण्याच्या मार्गावर आहे. या टनेलमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, अवघ्या २० मिनिटांत बदलापूरहून नवी मुंबईत पोहोचणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर आणि वेगवान करण्याच्या दिशेने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. वाहतुकीस नवा पर्याय: मोठा दिलासा! सध्या बदलापूरहून नवी मुंबईला जाण्यासाठी...
निगडी प्रकरणात न्यायालयीन आदेशाचा अवमान; PCMC पोलिस आयुक्तांविरोधात अवमान याचिका, उच्च न्यायालयाची नोटीस
पुणे : निगडी, पुणे येथील एका गंभीर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 09 जून 2025 रोजी दिलेल्या स्पष्ट, ठोस व बंधनकारक आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगर पोलिस आयुक्त (PCMC Police Commissioner) यांच्याविरोधात थेट Contempt of Court Act, 1971 अंतर्गत अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेतील उत्तरदायित्व आणि कायद्याच्या...
मेट्रोमुळे कोंढव्याला नवी गती; शहराच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार
पुणे | कोंढवा परिसराचा सर्वांगीण आणि वेगवान विकास साधण्यासाठी मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याला पुणे शहराच्या इतर भागांशी जोडण्यात येणार असल्याची ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कात्रज–कोंढवा मार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून, शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत वाढवणे आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळाशी जोडणारी मेट्रो लाईन कोंढवा परिसराशी संलग्न...
FS Compressors India ने १५ वर्षांची प्रगती साजरी केली; २०२६ पर्यंत ५०,००० चौ.मी. क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्राची घोषणा
पुणे (महाराष्ट्र) – FS Compressors India Pvt. Ltd., जागतिक Fusheng Group ची भारतातील शाखा, ज्या FUSHENG, FSCURTIS, FSELLIOTT, ALMiG आणि FIRSTAIR सारख्या बहु-ब्रांड्सद्वारे भारतात कार्यरत आहे, यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाची औचित्यपूर्ण साजरी केली. या विशेष समारंभाला देशभरातील ग्राहक, पुरवठादार, डीलर आणि कर्मचारी उपस्थित होते. समारंभात कंपनीच्या सातत्यपूर्ण वाढीच्या प्रवासावर आणि भारतातील कम्प्रेस्ड एयर सोल्यूशन्स मार्केटमध्ये कंपनीच्या वाढत्या...
उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी उपाययोजना करण्याचे महापालिकेचे नागरिकांना आवाहन
पिंपरी, दि.१३ मार्च २०२५:- पिंपरी चिंचवड शहरातील तापमानात सतत वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण येण्याची आणि गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेऊन संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे. उष्णतेपासून बचावासाठी खालील उपाययोजना कराव्यात काय करावे व काय करू नये उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून...
नववर्ष स्वागतासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त: नियमांचे पालन करण्याचे आवाहन
नववर्षाच्या स्वागताच्या उत्सवाला राज्यभरात जल्लोषात तयारी सुरू असून, त्यासोबतच सुरक्षा व्यवस्थेचाही काटेकोर बंदोबस्त करण्यात आला आहे. राज्यातील मोठ्या शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. थर्टी फर्स्टच्या रात्री संभाव्य अडचणी टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. वाहनचौकशी आणि मद्यपानावर कडक कारवाई वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन करू नये म्हणून प्रत्येक प्रमुख चौक आणि महामार्गांवर पोलिसांकडून वाहनचौकशी मोहिमा राबवल्या जात आहेत....
















