सामाजिक

Home सामाजिक Page 94

पुणे जिल्हा परिषद निवडणूक २०२६: भाजपाचा स्वबळाचा निर्धार, रणनिती ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

0

पुणे | १६ जानेवारी २०२६ पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात भाजपाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक माझ्या तसेच केंद्रीय मंत्री मा. मुरलीधरजी मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनिती, संघटनात्मक मजबुती आणि उमेदवार निवडीसंदर्भात सविस्तर, सकारात्मक व भविष्याभिमुख चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान “पुणे जिल्हा परिषद...

पुण्यातील रस्त्यावर जीव धोक्यात घालून अश्लील चाळे; सार्वजनिक शिस्तीला सुरूंग!

0

पुणे – महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि निषेधार्ह घटना समोर आली आहे. शिंदेवाडी – खेड-शिवापूर मार्गावर एका धावत्या दुचाकीवर एका जोडप्याने अश्लील चाळ्यांचे प्रदर्शन करत संपूर्ण शहराची अब्रू झाकली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काय आहे नेमकी घटना? ▪️ व्हायरल व्हिडिओमध्ये...

‘३६ तासांत १२ मुले बेपत्ता’ अफवा ठरली खोटी; मुंबई पोलिसांचा नागरिकांना इशारा, अफवा पसरवणाऱ्यांवर FIRची कारवाई

0

मुंबई | प्रतिनिधी मुंबईत अवघ्या ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी याबाबत ठाम शब्दांत खुलासा करत नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. या खोट्या पोस्ट्समुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई पोलिसांचा अधिकृत खुलासा मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर स्पष्ट करत म्हटले आहे की,“काही...

राजू मिसाळ : जनतेच्या विश्वासाचा चेहरा, माणुसकी जपणारे आणि कार्यकर्त्यांशी नाळ जोडणारे नेतृत्व!

0

पिंपरी-चिंचवडच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करणारे माजी उपमहापौर तथा चार वेळा नगरसेवक राहिलेले राजू मिसाळ हे सर्वसामान्य नागरिकांशी आपुलकीचे संबंध जपणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. राजकारणात अनेक वर्षे सक्रिय राहून विविध पदांवर जबाबदारी सांभाळताना त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांशी सातत्याने संवाद ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा आढावा घेताना जनतेशी निर्माण झालेले...

मतदान जनजागृतीच्या ब्रँड ॲम्बेसिडर श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी लोकशाहीचा जागर

0

पिंपरी, दि. १० जानेवारी २०२६ :- अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या माध्यमातून करण्यात येणारी मतदान जनजागृती… ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा जोशपूर्ण घोषणांनी दुमदुमलेला परिसर… आणि लोकशाहीच्या जागृतीसाठी निघालेली शेकडो जणांची प्रभातफेरी…असे उत्साहपूर्ण वातावरण आज सकाळी निगडी येथील दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी निर्माण झाले होते.     लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला मतदानाच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार यांना अखेरचा निरोप; बारामतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती

0

बारामती | प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आज बारामती, पुणे येथे देशपातळीवरील राजकीय नेतृत्व उपस्थित राहिले. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. नितीन नबीन यांनी बारामतीत दाखल होत दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यातील विविध मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इस्कॉनचे डॉ. सूरदास प्रभू यांची मंत्रालयात सदिच्छा भेट; आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांवर सखोल चर्चा

0

मुंबई (दि. १७ जून २०२५) – इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस) चे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. सूरदास प्रभू यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सामाजिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांबाबत विस्तृत चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. सूरदास प्रभू यांच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा करत इस्कॉनच्या उपक्रमांना शासनाची पूर्ण सहकार्याची हमी...

“नीरज चोप्राने केली ९० मीटरच्या पलीकडची झेप!” डोहा डायमंड लीगमध्ये ९०.२३ मीटर भालाफेक करत इतिहास रचला – वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी

0

डोहा | भारताचा सुवर्णवीर आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अखेर भालाफेकीतील ९० मीटरचा टप्पा पार करत नवा इतिहास रचला आहे. डोहा येथे झालेल्या डायमंड लीग २०२५ स्पर्धेत त्याने तब्बल ९०.२३ मीटरची भालाफेक करत आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ९० मीटर क्लबमध्ये प्रवेश करणारा भारताचा पहिला अ‍ॅथलीट ठरला. स्वप्नवत कामगिरी! भारताच्या अ‍ॅथलेटिक्स इतिहासात सुवर्णाक्षरात नोंद नीरज चोप्रा याने यापूर्वी...

विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, दि. 24 : पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ...

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय!

0

पुणे – कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. विमाननगर, पुणे येथील एका खासगी कंपनीत महिला कामगाराला तिच्या सहकाऱ्याने जखमी केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.  काय घडले नेमके? दिनांक ०७ जानेवारी २०२५ रोजी विमाननगर येथे एका कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास सहकाऱ्याने हातात धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी येरवडा पोलीस...

Copyright ©