मुंबई पावसाचा कहर! रेड अलर्ट जारी, पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा; ठाणे-रायगड रेड, पुणे-कोल्हापूर ऑरेंज अलर्टवर
दिनांक: १५ जुलै २०२५ | मुंबई :- मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. सततच्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, रायगड, मुंबई उपनगरासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे.पुणे, सातारा, अहमदनगर ऑरेंज अलर्टवर, तर कोल्हापूर, गडचिरोली, पालघर, सांगली आणि गोंदिया यलो अलर्टवर आहेत. वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम अंधेरी पश्चिमेतील अंधेरी सबवे...
अहमदाबादमध्ये भारताचा दणदणीत विजय! इंग्लंडवर १४२ धावांनी मात, मालिकेवर कब्जा
अहमदाबाद, १३ फेब्रुवारी २०२५: भारतीय क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करत इंग्लंडवर १४२ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका जिंकली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत करत देशवासीयांना अभिमानाची अनुभूती दिली आहे. शुभमन गिलची अप्रतिम खेळी, भारताचा पराभव न होणारा किल्ला! या सामन्यात युवा फलंदाज शुभमन गिलने जबरदस्त खेळी करत ‘सामनवीर’ आणि ‘मालिकावीर’ (Man...
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा भयंकर फटका! मशिद बंदरजवळ लोकलखाली चिरडले ४ प्रवासी; २ ठार – मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प!
मुंबईच्या लोकल प्रवासाला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या अचानक आंदोलनामुळे गुरुवारी सायंकाळी संपूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.या आंदोलनाचा फटका थेट प्रवाशांना बसला असून, मशिद बंदर स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात लोकलखाली ४ जण उडाले, त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४५ वर्षीय पुरुष आणि १९ वर्षीय तरुणीचा समावेश असल्याची...
पिंपळे निलखमध्ये दिवाळी साजरी नारीशक्तीच्या सन्मानासह! कै. प्रभाकर साठे मेमोरियल फाउंडेशनतर्फे ‘भाऊबीज २०२५’ महिला स्नेह सोहळा उत्साहात पार
पिंपळे निलख (पिंपरी-चिंचवड) : दिवाळीच्या आनंदी वातावरणात पिंपळे निलख परिसराने नारीशक्तीला सन्मान देणारा उपक्रम साजरा केला. कै. प्रभाकर नारायणराव साठे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने “भाऊबीज २०२५ महिला स्नेह सोहळा” मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी पिंपळे निलख येथील मनपा शाळेसमोरील मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला परिसरातील हजारो नागरिक, विशेषतः महिला भगिनी मोठ्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट; महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा
देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांची आज नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून राज्यातील सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. भेटीदरम्यान महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, जलसंधारण, रोजगारनिर्मिती, परिवहन व्यवस्था, ग्रामीण विकास तसेच विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या...
ड्रग्स प्रकरणात ओरीची दीर्घ चौकशी; “सेलिब्रिटी स्वतःहून फोटोसाठी बोलावतात,” ओरीचे मोठे विधान!
महाराष्ट्रात सुरु असलेल्या ड्रग्जविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरी (Ori) यांना मुंबई पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स सेल (ANC) समोर चौकशीसाठी हजर राहावे लागले. बुधवारी अनेक तास चाललेल्या चौकशीदरम्यान ओरीकडून विविध महत्त्वाची माहिती घेण्यात आली. यामध्ये त्यांनी ड्रग्स प्रकरणाशी संबंधित काही मुद्द्यांसह त्यांच्या सेलिब्रिटी-कनेक्शनबद्दलही खुलासे केले. ओरी यांनी चौकशीत सांगितले की, “मी कोणत्याही सेलिब्रिटींच्या घरी जबरदस्ती जात नाही. उलट अनेक सेलिब्रिटी...
महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनविण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई :- महाराष्ट्र हे जागतिक गुंतवणुकदारांसाठी सर्वात आकर्षक 'डेस्टिनेशन' बनविण्याचा शासनाचा संकल्प आहे. भारतीय विदेश सेवेतील सेवा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनांचा विचार करून राज्य शासन विविध क्षेत्रातील बाबींसाठी नवी धोरणे आखेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वेगाने बदलणाऱ्या पायाभूत सुविधा, गुंतवणूक संधी आणि राज्याच्या जागतिक स्तरावरील प्रगतीविषयी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र...
“विठ्ठल भेटीसाठी तुकोबारायांची पालखी निघाली पंढरीच्या दिशेने; देहू नगरीतून टाळ मृदंगाच्या निनादात भव्य प्रस्थान सोहळा संपन्न”
देहू | पुणे – भक्तीरसात न्हालेली देहूनगरी, टाळ-मृदंगाच्या निनादाने गजरलेली गल्लीबोळं, आणि "ज्ञानोबा-तुकोबा"चा अखंड जयघोष करत लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे साक्षीदार ठरले. जगद्गुरू तुकोबारायांची पालखी आज विठुरायाच्या भेटीसाठी देहूनगरीहून पंढरपूरकडे निघाली. देवेंद्र फडणवीस आणि अण्णा शेलके यांच्या उपस्थितीत, मोठ्या भक्तिभावाने पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. या सोहळ्यात वारकऱ्यांसह वरुणराजानेही हजेरी लावली, त्यामुळे वातावरण अधिकच...
ठरलं! १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर – ५ फेब्रुवारीला मतदान
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असतानाच, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे. या घोषणेमुळे गावोगावी प्रचारसभा, बैठका आणि राजकीय हालचालींना वेग येणार आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य...
तुळशीबाग मंडळाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, पुण्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
पुणे शहरातील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्यावतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबवला जात आहे. रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नु. म. वि. शाळा, बाजीराव रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रुद्रांग वाद्य पथक, स्वरूप वर्धिनी, शिवमुद्रा, गजलक्ष्मी यांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम पार पडणार...








