मतदानाचा उत्सव, माणुसकीचा हात; ज्येष्ठ नागरिकांसाठी पुणे पोलिसांचा आदर्श उपक्रम
पुणे : लोकशाहीच्या महोत्सवात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. वय, आजारपण किंवा हालचालीतील अडचणी या कुठल्याही कारणामुळे कोणाचाही मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी माणुसकीचा आणि जबाबदारीचा आदर्श दाखवला आहे. शहरातील विविध मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना मतदान करताना मदतीचा हात देत पुणे पोलिसांनी लोकशाहीचे खरे रक्षणकर्ते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. काठीचा आधार घेऊन आलेले आजी-आजोबा, व्हीलचेअरवर...







