बागेश्वरधाम महाराष्ट्र सेवा समिती आणि रिक्षा संघटनेकडून भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा!
पुणे:- पुण्यात बागेश्वरधाम महाराष्ट्र सेवा समिती आणि रिक्षा संघटनेच्या वतीने अत्यंत भव्य आणि भक्तीमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात हजारो रामभक्तांनी सहभाग घेतला असून, संपूर्ण परिसर श्रीरामाच्या जयघोषांनी दुमदुमून गेला. रामनामाचा जयघोष आणि भक्तीमय वातावरण श्रीराम नवमीच्या निमित्ताने बागेश्वरधाम महाराजांचे भक्त आणि रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेलमध्ये गोळीबार; एक जण अटकेत.
पिंपरी-चिंचवड: काल रात्री ८:४५ वाजता काळेवाडी येथील राहुल बार आणि खुशबू रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा गोळीबार माजी नगरसेवक विनोद नाधे यांच्या लायसन्स असलेल्या पिस्तुलातून करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासाअंती समजले की, गुरुवारी रात्री आरोपी सचिन दत्तू नाधे, सचिन नाधे, माजी नगरसेवक विनोद नाधे, तुकाराम नाधे आणि माऊली नाधे हे सर्व हॉटेलच्या पहिल्या...
अभिषेक–रिंकूचा धडाका, न्यूझीलंडसमोर भारताचे 239 धावांचे आव्हान
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत विक्रमी धावसंख्या उभारली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून तब्बल 238 धावा केल्या असून न्यूझीलंडसमोर 239 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात युवा फलंदाज अभिषेक शर्मा याने आपल्या तुफानी खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या 35 चेंडूत 84 धावा करताना त्याने 5...
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ साठी अधिकाऱ्यांचे मास्टर प्रशिक्षण यशस्वी
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला मास्टर प्रशिक्षण कार्यक्रम (प्रशिक्षकांचे प्रशिक्षण – ToT) यशस्वीरित्या पार पडला. भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्ष सभागृह येथे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री....
महागाई आटोक्यात, GDP ‘फुल स्पीड’मध्ये; रेपो रेट कपातीची अपेक्षा वाढली, तरी RBI कडून ‘सरप्राईज’ निर्णयाची शक्यता वाढली
देशाची अर्थव्यवस्था सध्या सकारात्मक संकेत देत असताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आगामी द्विमासिक पतधोरण (MPC) बैठक सर्वांच्या नजरा खिळवून ठेवत आहे. 3 ते 5 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीचे निर्णय 5 डिसेंबर, शुक्रवारी जाहीर केले जाणार आहेत. महागाई नियंत्रणात आल्याचे स्पष्ट दिसत असून, GDPने दुसऱ्या तिमाहीत घेतलेला वेग अक्षरशः रॉकेटसारखा असल्याने अर्थव्यवस्थेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. यासोबतच, GST दर कपात...
हिंजवडी व चाकण वाहतूक कोंडीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल! PMRDA ला ‘सिंगल पॉइंट कोऑर्डिनेटर’ ची जबाबदारी!
हिंजवडी आयटी पार्क, चाकण-तळेगाव-माळुंगे औद्योगिक पट्टा तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांवरील ताण दूर करण्यासाठी आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ला ‘सिंगल पॉइंट कोऑर्डिनेटर’ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंदवार यांनी दिली असून, यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि यंत्रणांमध्ये एकत्रित समन्वय साधला जाणार आहे. मुख्यमंत्री मा....
पीएमटी बसमध्ये चोऱ्या करणारा अट्टल गुन्हेगार वानवडी पोलिसांच्या जाळ्यात; सोन्याचे बांगड्यांसह अटक!
पुणे | पुणे शहरात पीएमटी बसमध्ये प्रवासी महिलांच्या सोन्याच्या बांगड्या चोरणारा अट्टल गुन्हेगार चंद्रकांत राजू जाधव (वय ३१) याला वानवडी पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली असून, त्याच्याकडून ३.५१ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या विरोधात आधीपासूनच पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. कारवाईचे तपशील: दिनांक ११ जुलै २०२५ रोजी वानवडी पोलिसांचे...
नालासोपाऱ्यात पोलिसांच्या मानसिक छळाला कंटाळून बिल्डरचा आत्महत्येचा टोकाचा निर्णय; चौकशीची मागणी तीव्र
नालासोपारा (जि. पालघर) – नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, जयप्रकाश (JP) चौहान या स्थानिक बिल्डरने पोलिसांच्या मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. चौहान यांच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जयप्रकाश चौहान यांच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोन पोलीस अधिकारी – शाम शिंदे आणि...
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विनम्र अभिवादन; चित्रनगरीत पुष्पहार अर्पण
मुंबई | प्रतिनिधी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. भारतीय सिनेमाच्या समृद्ध परंपरेला आणि दादासाहेब फाळके यांच्या अतुलनीय योगदानाला मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी राज्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर,...
नवी मुंबईसाठी दिलासादायक ठरणारी ऐतिहासिक कामगिरी! हेटवणे पाणीपुरवठा योजनेत CIDCO चा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू लवकरच
मुंबई | प्रतिनिधी — सिडको (CIDCO) हद्दीतील भागांना भेडसावणारी दीर्घकाळाची पाणीटंचाई लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. हेटवणे पाणीपुरवठा वाढ योजनेचे काम वेगाने प्रगतीपथावर असून, पुढील आठवड्यात CIDCO आपल्या सर्व प्रकल्पांमधील पहिल्या-वहिल्या ‘टनल ब्रेकथ्रू’ची नोंद करणार आहे. हा क्षण सिडकोच्या पायाभूत सुविधा विकासातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना नवी मुंबई आणि आजूबाजूच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरी, औद्योगिक आणि...






