महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 110

पुण्याजवळ हेलिकॉप्टर अपघात, चारही प्रवासी सुखरूप बचावले.

0

पुणे: हैदराबादकडे मुंबईहून जाणारे एक खाजगी हेलिकॉप्टर पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात शनिवारी दुपारी कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व चार प्रवासी सुखरूप बचावले असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले. पायलटला पवड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. पवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले की, या भागात जोरदार पावसामुळे खराब...

बचत गटातील महिलांमार्फत घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वाटप – लवकरात लवकर मालमत्ता कर भरण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व आकारणी विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी मालमत्ता कर संकलन सुरू आहे. मालमत्ताधारकांना बिलांचे महिला बचत गटांच्या महिलांमार्फत घरोघरी जाऊन बिल वाटप करण्यात आले आहे. बचत गटातील महिलांनी निवासी,  बिगर निवासी औद्योगिक व इतर मालमत्ताधारकांपर्यंत जाऊन प्रत्यक्ष भेट घेत बिलांचे वितरण केले आहे. मालमत्ता कर बिल ऑनलाइन पद्धतीनेही उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच...

कोंढवा येथे मोठी कारवाई: १३.६ लाखांच्या मेफेड्रॉनसह एक जण अटक, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची यशस्वी धडक

0

पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ (Anti-Narcotics Cell - 2) ने मोठी यशस्वी कारवाई करत १३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई दि. २ जुलै २०२५ रोजी करण्यात आली असून, कोंढवा परिसरातील अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई समोर संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीवर...

राष्ट्रद्रोहासाठी २०० रुपयांचा सौदा: पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवणाऱ्या गुजरातच्या कामगाराला अटक!

0

गुजरात एटीएसची मोठी कारवाई: गुजरात एटीएसने (Anti-Terrorist Squad) देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानली जाणारी घटना उघडकीस आणली आहे. दीपेश बटूक गोहेल, एक खाजगी कंपनीत काम करणारा कामगार, भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांच्या हालचालींची संवेदनशील माहिती पाकिस्तानला केवळ २०० रुपये रोजंदारीच्या बदल्यात पुरवत होता. घटनेचा तपशील: दीपेश गोहेल हा ओखा जेट्टी, देवभूमी द्वारका, गुजरात येथे वेल्डर-कम-कामगार म्हणून काम करत होता. सुमारे सात...

सलीम खान यांच्या प्रकृतीत सुधारणा; आमिर खान यांची भेट, कुटुंबीय आशावादी

0

मुंबई : ज्येष्ठ पटकथालेखक Salim Khan यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती अभिनेते Aamir Khan यांनी दिली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आमिर खान यांनी सकारात्मक अपडेट देत “सलीम साहेब लवकरच बरे होऊन घरी परततील,” असा विश्वास व्यक्त केला. बुधवारी Mumbai Press Club च्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आमिर खान यांना माध्यमांनी सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी विचारले...

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ ला प्रारंभ; अजितदादांच्या आर्थिक शिस्तीची आठवण, लोकहिताच्या निर्णयांची अपेक्षा

0

मुंबई | मंत्रालय दरवर्षी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar हे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असत. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणी, आकडेवारीवरील पकड आणि आर्थिक शिस्तीबाबतच्या ठाम भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणाला एक वेगळी दिशा मिळाली. राज्याच्या आर्थिक शिस्तीची परंपरा अधिक बळकट करणाऱ्या त्यांच्या कार्याची आज विशेष आठवण होत आहे. आजपासून Maharashtra State Legislature चे ‘अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६’ औपचारिकपणे सुरू होत...

लाच घेताना दोन न्यायालयीन लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; पिडीत तक्रारदाराला मिळाला न्याय

0

पुणे : पुण्यातील भाडे नियंत्रण कायद्यान्वये दाखल खटल्यात न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर फ्लॅटचा ताबा मिळावा यासाठी तडजोड म्हणून लाच मागणाऱ्या दोन न्यायालयीन लिपिकांना अंमलबजावणी करताना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ जून रोजी सापळा रचून केली असून, यात लिपिक रविंद्र हिंदूराव पवार (वय ४०) आणि अमित बबन भुसारी (वय ३४) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. प्रकरण काय...

संतांचा पालखी सोहळा, पिंपरी-चिंचवड महापालिकेची जय्यत तयारी! – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी घेतला आढावा

0

पिंपरी – जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा वार्षिक आषाढीवारी पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, या ऐतिहासिक आणि अध्यात्मिक सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका युद्धपातळीवर काम करत आहे. पालखी मार्ग, मुक्कामस्थळे व वारकऱ्यांच्या सोयीसुविधा यांचा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी प्रत्यक्ष दौरा करून आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात विविध विभागांचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते....

चंदननगरमध्ये ड्रग्ज माफियांवर पुणे पोलिसांचा मोठा घाव; २५ लाखांचा मॅफेड्रॉन जप्त, एक आरोपी अटकेत

0

पुणे शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक ०२ ने चंदननगर परिसरात मोठी कारवाई करत २५ लाख रुपये किमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अंमली...

सिंहगड रोड परिसरात दोन पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त; विधीसंघर्षित बालकांकडून अग्निशस्त्र हस्तगत

0

सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलीस यांच्या तपास पथकाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंगदरम्यान दोन विधीसंघर्षित बालकांकडून दोन पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करत मोठी कारवाई केली आहे. दि. १४/०२/२०२६ रोजी विठ्ठलवाडी मंदिरासमोर, सिंहगड रोड परिसरात नदीपात्राजवळ दोन संशयित इसम अंधारात थांबले असल्याची माहिती पोलिसांना खास बातमीदारामार्फत मिळाली होती. संबंधित इसमांकडे अग्निशस्त्र असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तात्काळ...

Copyright ©