महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 180

पुण्यात प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का फ्लेवरवर मोठा घाव; अंमली पदार्थ विरोधी पथकाची सहा ठिकाणी धडक कारवाई

0

पुणे : पुणे शहरात तरुणाईला व्यसनाधीन करण्याचा धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित ई-सिगारेट (वेप) आणि तबाखुजन्य हुक्का फ्लेवरच्या अवैध विक्रीविरोधात अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. शहरातील कोरेगाव पार्क, कॅम्प, कोथरूड आणि लष्कर परिसरातील एकूण सहा ठिकाणी छापे टाकून तब्बल ८,३२,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन,...

पहिल्या कसोटीत भारताचा धक्कादायक पराभव — गंभीरांवर तुफान टीका, दबाव वाढल्याने गाठले गुवाहाटीचे प्रसिद्ध कामाख्या मंदिर

0

गुवाहाटी : भारताच्या पहिल्या कसोटीत झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर प्रचंड टीका झाली आहे. तीन दिवसांत सामना हरल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये संताप आणि निराशा पसरली. आणि त्याच दरम्यान गौतम गंभीर यांनी गुरुवारी सकाळी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, गुवाहाटीतील ऐतिहासिक कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांचा मंदिरातील हा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर वणव्यासारखा...

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, पुणे गुन्हे शाखा युनिट-६ ची मोठी कारवाई

0

पुणे शहरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः कोरेगाव भीमा येथे जयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेत, तसेच बसस्टॉप, सार्वजनिक ठिकाणे व इतर गर्दीच्या परिसरात महिलांना लक्ष्य करून मंगळसूत्र चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी अखेर पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-६ च्या जाळ्यात अडकली आहे. या कारवाईमुळे पुणे शहरातील अनेक प्रलंबित गुन्हे उघडकीस आले असून...

“ICGS ‘समुद्र प्रताप’चा सेवेत समावेश : आत्मनिर्भर भारत, सागरी सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वततेकडे महत्त्वपूर्ण पाऊल”

0

भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात इंडियन कोस्ट गार्ड शिप (ICGS) ‘समुद्र प्रताप’ या अत्याधुनिक जहाजाचा अधिकृतपणे सेवेत समावेश करण्यात आला असून, हा क्षण देशाच्या सागरी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. ‘समुद्र प्रताप’चे कमिशनिंग अनेक कारणांनी उल्लेखनीय ठरत असून, विशेषतः आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळ देणारा हा ठोस पुरावा आहे. हे जहाज देशांतर्गत तंत्रज्ञान व संसाधनांच्या आधारे विकसित करण्यात आले...

गोरखपूरमध्ये PNG ज्वेलर्सच्या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन; अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची विशेष उपस्थिती

0

Gorakhpur येथील असुरन चौक परिसरात प्रसिद्ध दागिने ब्रँड PNG Jewellers यांच्या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन सोहळ्यात संपन्न झाले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे या सोहळ्यात बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री Madhuri Dixit यांची उपस्थिती लाभल्यामुळे कार्यक्रम अधिकच आकर्षक आणि संस्मरणीय ठरला. उद्घाटन सोहळ्यादरम्यान नव्या शाखेचे रिबन कापून औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या व्यवस्थापनाचे...

शाखा १११ मध्ये शिवशक्तीचा ऐतिहासिक विजय; दीपक सावंत यांना १२,२०६ मतांची घवघवीत आघाडी

0

मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार दीपक राजाराम सावंत यांनी शाखा क्रमांक १११ मधून दणदणीत विजय मिळवला आहे. तब्बल १२,२०६ मतांच्या भरघोस फरकाने त्यांनी विजय संपादन करत परिसरात शिवशक्तीचा झेंडा फडकावला आहे. या विजयामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांच्या गजरात,...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत पुन्हा अजिंक्य; सलग दहा वर्षे विजेतेपदाची अभिमानाची परंपरा कायम

0

पिंपरी: पुणे आंतर कचेरी असोसिएशनतर्फे आयोजित अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धा दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना व्हॉलीबॉल कोर्ट येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठित स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवत विजेतेपद पटकावले. एकूण १४ खेळाडू, संघव्यवस्थापक आणि मार्गदर्शकांसह महापालिकेच्या दोन संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सदर संघात महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभाग, पर्यावरण अभियांत्रिकी...

अभिषेक–रिंकूचा धडाका, न्यूझीलंडसमोर भारताचे 239 धावांचे आव्हान

0

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत विक्रमी धावसंख्या उभारली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून तब्बल 238 धावा केल्या असून न्यूझीलंडसमोर 239 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात युवा फलंदाज अभिषेक शर्मा याने आपल्या तुफानी खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या 35 चेंडूत 84 धावा करताना त्याने 5...

प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी ‘बदाम’ ठरत आहेत गेमचेंजर – अभिनेत्री सोहा अली खान पुण्यात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केला अनुभव!

0

पुणे :- सोहा अली खान म्हणाल्या,जेव्हा मी घरी जेवण बनविण्याची तयारी करते, तेव्हा प्रोटीनला सर्वात वरचे स्थान असते. विशेषतः माझी मुलगी वाढत्या वयाची आणि खूप ऍक्टिव्ह असल्याने. बदाम हे आमच्यासाठी पोषणाचा सोपा आणि विश्‍वासार्ह स्रोत ठरले आहेत. शूट्सदरम्यान देखील मला बदाम खायला आवडतात. ते मला पचायला जड न वाटता एनर्जी देतात. मी माझ्या मुलीच्या आहारात, तिच्या नाश्त्यात किंवा सॅलडमध्ये...

मुंबई हादरली! पवईतील आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवलं — पोलिसांची शौर्यपूर्ण कारवाई, आरोपीचा जागीच अंत!

0

मुंबईच्या पवई भागात बुधवारी घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने तब्बल 17 लहान मुलांना ओलीस ठेवत, त्यांना मारण्याची धमकी देत व्हिडिओद्वारे समाजमाध्यमांवर भीतीचं वातावरण निर्माण केलं. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि अत्यंत शौर्य, संयम आणि बुद्धिमत्तेने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, आरोपीवर गोळीबार करण्यात आला आणि त्यात...

Copyright ©