Breaking News

Home Breaking News Page 204

खराडी पोलिसांची जलद कारवाई – अवघ्या २४ तासांत घरफोडी प्रकरणाचा छडा, आरोपी महिला मुद्देमालासह जेरबंद!

0

पुणे शहरातील खराडी परिसरात झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा पोलिसांनी अतिशय जलदगतीने उकलत अवघ्या २४ तासांत आरोपी महिलेला अटक केली आहे. पोलिसांच्या या जलद व प्रभावी तपासामुळे चोरी गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम परत मिळाली असून, रहिवाशांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधानाचे वातावरण आहे. खराडी परिसरातील एका गृहनिर्माण संकुलात राहणाऱ्या फिर्यादी महिलेने मेहनतीने जमवलेले सोन्याचे दागिने (सुमारे अडीच तोळे) आणि ३० हजार...

सांगवीतील बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी

0

पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. सांगवी येथील मानसी प्रशांत गोविंदपुरकर (वय २१) या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी आढळून आला. नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.  परीक्षेच्या तणावातून टोकाचे पाऊल? मानसी हिची काही महिन्यांपूर्वी पोटाची शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे ती परीक्षेला बसू शकली नाही. या गोष्टीमुळे ती मानसिक तणावाखाली होती. परीक्षेचे नुकसान झाल्याने...

मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी दौऱ्यावर

0

सोलापूर : मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी दौ-यावर असून त्यांनी दिनांक २०.०३.२०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा विभाग येथे तपासणी घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील वापीक तपासणी दरम्यान उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वार्षीक कामगिरीचा आढावा घेवून अभिलेखांची पडताळणी केली आहे. तसेच उपविभागातील पोलीस अधिकारी यांच्या मुलाखती...

महाराष्ट्राचा औद्योगिक विकास आणि सांस्कृतिक जपणूक – विधिमंडळातील महत्त्वाचे क्षण उजळले!

0

मुंबई – महाराष्ट्राने जागतिकीकरणाचा स्वीकार करत मोठ्या औद्योगिक विकासाची दिशा आखली आहे. परंतु, या विकासाच्या प्रवासात राज्याची समृद्ध संस्कृती आणि परंपरा अबाधित ठेवण्यावरही भर देण्यात येत आहे. विधिमंडळात आणि त्याबाहेरही महाराष्ट्राच्या संपन्न वारशाचा गौरव साजरा होत असल्याचे काही महत्त्वाचे क्षण नुकतेच पाहायला मिळाले. औद्योगिक धोरणांची नव्याने मांडणी – महाराष्ट्र जागतिक पटलावर झळकतोय! महाराष्ट्र सरकारने जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन औद्योगिक धोरणे...

नागपूर हिंसाचारामागे बांगलादेशी कनेक्शन? १७२ भडकावणारे व्हिडिओ, फहीम खान आणि सय्यद अलीचा मास्टरमाईंड रोल उघड!

0

नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेने देशभर खळबळ उडवली असताना या प्रकरणामध्ये बांगलादेशी कनेक्शन असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी या हिंसाचारामागे दहशतवादी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, फहीम खान आणि सय्यद अली हे या कटाचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट होत आहे.  हिंसाचार भडकवण्यासाठी व्हायरल झाले तब्बल १७२ व्हिडिओ! सायबर पोलिसांनी तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड केली असून, तब्बल १७२ व्हिडिओ सोशल...

हिंजवडीतील हृदयद्रावक घटना : कर्मचाऱ्यांची बस पेटवून ४ जणांचा मृत्यू!

0

हिंजवडी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक आग लागली, ज्यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमागील खळबळजनक कारण समोर आले असून, बस चालकानेच सूडभावनेतून ही आग लावल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालक जनार्दन हंबर्डिकर याने दिवाळी बोनस आणि पगार कपातीच्या वादातून सूड घेण्याच्या हेतूने बसला आग लावली....

नागपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब – ६१ वाहनांचे नुकसान, प्रशासनाकडून भरपाई जाहीर!

0

नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत ६१ हून अधिक वाहनांचे नुकसान झाले असून, अनेक दुकानांवरही तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने नुकसानग्रस्तांना आर्थिक भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसाचार कशामुळे पेटला? प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक गटांमध्ये झालेल्या वादातून ही हिंसक घटना घडल्याचे सांगितले जात आहे. काही असामाजिक तत्वांनी या वादाला अधिक चिघळवले, परिणामी...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05 लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या 14 मालमत्ता केल्या जप्त

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. महानगरपालिका प्रशासनाने आता थकबाकीदारांच्या पाच लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ही जप्ती मोहिमेमध्ये महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होत आहेत. गुरुवार (20 मार्च) रोजी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी थेट महानगरपालिका कार्यक्षेत्रात चिखली, तळवडे, आकुर्डी, वाकड झोनमधील मिश्र, बिगनिवासी, व्यावसायिक  थकबाकीदारांच्या...

महायुती सरकारची योजना: फक्त आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर!

0

महायुती सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजना केवळ निवडणुकीपुरत्या घोषणाबाजीपुरत्या नाहीत, तर त्या योजनांची अंमलबजावणी आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून विविध विकासकामे, सामाजिक कल्याण योजना आणि पायाभूत सुविधा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहेत. सरकारने नागरिकांसाठी दिलेले आश्वासन म्हणजे केवळ घोषणाबाजी नाही, तर त्या वचनांना सत्यात उतरवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मराठी चित्रपट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला मराठी चित्रपट महोत्सव…

0

‘मराठी चित्रपट संवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या बहूउद्देशीय संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यगृहात चित्रपट संकल्पने अंतर्गत मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. २४ मार्च ते २५ मार्च २०२५ याकाळात पिंपरी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे पोस्टर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे...

Copyright ©