Breaking News

Home Breaking News Page 209

शिवाजीनगर पोलिसांची कारवाई: शरीरसौष्ठवासाठी गैरवापर होणाऱ्या मेफेन्टामाईन इंजेक्शन्सची विक्री करणारे दोघे जेरबंद.

0

पुणे: शिवाजीनगर पोलिसांनी मेफेन्टामाईन सल्फेट इंजेक्शन्सची अवैध विक्री करणाऱ्या दोघांना अटक करून मोठी कारवाई केली आहे. ही औषधे शरीरसौष्ठवासाठी ऊर्जा वाढवणाऱ्या आणि कामगिरी सुधारण्यासाठी वापरली जात होती. रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांनी १४ इंजेक्शन वायल्स आणि एक कार जप्त केली. आरोपींची नावे: दीपक वाडेकर (खडकी) साजन जाधव (सांगली) घटनेचा तपशील: १४ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजता, पोलिस उपनिरीक्षक अजीत बडे व त्यांच्या पथकाने गस्त...

पुण्यात मुसळधार पावसाचा कहर! रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, नागरिक त्रस्त…

0

पुणे – गुरुवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे पुणे शहरात अनेक भाग जलमय झाले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. भारत हवामान विभागानुसार, १९ जून रोजी सकाळी १२ ते संध्याकाळी...

नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेत ‘Starlit Adventures 2025’ उत्साहात संपन्न विद्यार्थी-शिक्षकांचा एकत्रित आनंदोत्सव

0

पिंपरी-चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा आणि आनंददायी उपक्रम ‘‘Starlit Adventures 2025’-नववाटेचे घडणारे शिल्पकार’ या संकल्पनेअंतर्गत मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एकत्रित सहभागातून साकारलेला एक संस्मरणीय आनंदोत्सव ठरला. या कार्यक्रमाला नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार श्री. अमित गोरखे (नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट), संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे,तांत्रिक विभाग प्रमुख श्री. समीर जेऊरकर, मुख्याध्यापिका सौ....

उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना ठार करणारी लष्करी कारवाई

0

उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (LoC) दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. केरन सेक्टरमध्ये चाललेल्या या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कराच्या चिनीकोरने एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. लष्कराने सांगितले की, अद्यापही कारवाई सुरू आहे आणि ठार केलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम बाकी आहे. कुपवाडा पोलिस नियंत्रण कक्षातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या...

पाकिस्तानला धास्ती; आता भारतीय गाण्यांवरही बंदी

0

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर संताप उसळला असून, २६ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू नदी करार स्थगित केला, अटारी बॉर्डर बंद केली आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. या भारताच्या निर्णायक भूमिकेनंतर पाकिस्ताननेही बिचकून प्रत्युत्तर दिलं असून, आता भारतीय गाण्यांवर थेट बंदी घालण्याचा निर्णय घेतला...

वृद्धाला रिक्षातून सोडण्याच्या बहाण्याने चोरी; पुणे गुन्हे शाखेची तत्पर कारवाई, आरोपी जेरबंद

0

पुणे शहर पोलीस यांच्या गुन्हे शाखेतील युनिट–४ ने वृद्ध इसमाला रिक्षातून सोडण्याच्या बहाण्याने त्याच्या सामानातील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. खडकी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक २१/२०२६ (भा.न्या.सं.क. ३०३(२), ३४) अन्वये ही कारवाई करण्यात आली.  गुप्त माहितीच्या आधारे सापळा दि. १३/०२/२०२६ रोजी युनिट–४ चे पथक खडकी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार...

पुण्यात सौन्य दलासाठी दारू गोळा बनविणाऱ्या खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीतील कामगाराकडे आढळली जिवंत काडतुसे

0

सौन्य दलासाठी दारू गोळा बनविणाऱ्या खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीतील कामगाराकडे ३१ जिवंत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोन महिने बेपत्ता असणाऱ्या कामगाराच्या दुचाकीच्या डिकीत ही काडतुसे आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.भगवान दत्तात्रय सस्ते (वय ५३, रा. दिघी) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. तर त्याचा साथीदार कामगार नितीन किसन माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला...

तांब्याच्या तारांची मोठी चोरी उघडकीस, वाघोली पोलिसांचे कारनामे; २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, मुंबईतील तीन सराईत चोर जेरबंद

0

पुणे (वाघोली) : वाघोली येथील औद्योगिक गोडाऊन फोडून तब्बल २५ लाख रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना वाघोली पोलिसांनी अटक करत मोठ्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. चोरीस गेलेल्या मालासह एकूण २४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. दि. २७...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मराठी चित्रपट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला मराठी चित्रपट महोत्सव…

0

‘मराठी चित्रपट संवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या बहूउद्देशीय संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यगृहात चित्रपट संकल्पने अंतर्गत मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. २४ मार्च ते २५ मार्च २०२५ याकाळात पिंपरी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे पोस्टर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे...

“मी मरू इच्छितो…” १८ वर्षीय संजयकुमारने ऑडिओ क्लिप पाठवत घेतला टोकाचा निर्णय; पिंपरी-चिंचवड परिसरात दुर्दैवी आत्महत्येची घटना!

0

पिंपरी-चिंचवड, पुणे – “मम्मी, मी माझा मोबाइल तोडणार आहे... मी विष प्राशन केलंय... माझ्या बहिणींची काळजी घ्या...” – आपल्या आईवडिलांना शेवटची ऑडिओ क्लिप पाठवत संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय १८) या तरुणाने घोरडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऑडिओ क्लिपमधील मजकूर काळजाला चिरून टाकणारा संजयकुमारने आपल्या व्हॉट्सअ‍ॅप ऑडिओ क्लिपमध्ये लिहिलं – "मम्मी, मी...

Copyright ©