Breaking News
पुण्यातील बाणेरमध्ये स्पावर पुणे पोलिसांचा छापा; तीन महिलांची सुटका, व्यवस्थापक अटकेत, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश!.
पुणे, ५ डिसेंबर २०२४ – पुणे शहर गुन्हे शाखेने ३ डिसेंबर रोजी बाणेर येथील एका स्पावर छापा टाकून वेश्याव्यवसाय चालवल्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापकासह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही धडक कारवाई बाणेर रोडवरील बापूसाहेब मुरकुटे पाटील कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘मून थाई स्पा’ या केंद्रावर करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकाराची...
T20 World Cup 2026: टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व, गिल बाहेर, अक्षर पटेल उपकर्णधार
नवी दिल्ली | आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. आज (२० डिसेंबर) झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयने पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया,...
कोलकाता डॉक्टर प्रकरण: सर्वोच्च न्यायालय सुनावणी.
सर्वोच्च न्यायालयाने कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू केली आहे. या प्रकरणाच्या तपासावर केंद्रिय अन्वेषण विभाग (CBI) आपला अहवाल सादर करणार आहे. या घटनेने संपूर्ण देशात आंदोलन पेटवले असून वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या गरजेवर भर दिला आहे, कारण त्यांच्या सुरक्षिततेचा अधिकार मूलभूत आहे. ९ ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह...
मोबाईल हिसकावून पळणारे तिघे गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
पुणे – शहरातील लक्ष्मी रोड परिसरात घडलेल्या मोबाईल हिसकावण्याच्या गंभीर घटनेचा अखेर उलगडा झाला असून, विश्रामबाग पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. घटना ३० जुलै २०२५ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी नेहमीप्रमाणे मुळचंद दुकान, लक्ष्मी रोड येथे स्वीट कॉर्न विक्रीचे काम करून घरी जात असताना ते आपल्या आईशी फोनवर बोलत होते. याचवेळी...
निवडणूक आचारसंहिता लागू; शहरात महापालिकेची धडक कारवाई, ४,८१९ अनधिकृत राजकीय फ्लेक्स हटवले
पिंपरी-चिंचवड | राज्य निवडणूक आयोगाकडून १५ डिसेंबर २०२५ रोजी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली असून, १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल ४,८१९ अनधिकृत व नियमबाह्य राजकीय फ्लेक्स, बॅनर्स आणि जाहिरात साहित्य हटवण्यात आले आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व...
महाराष्ट्राचा औद्योगिक विकास आणि सांस्कृतिक जपणूक – विधिमंडळातील महत्त्वाचे क्षण उजळले!
मुंबई – महाराष्ट्राने जागतिकीकरणाचा स्वीकार करत मोठ्या औद्योगिक विकासाची दिशा आखली आहे. परंतु, या विकासाच्या प्रवासात राज्याची समृद्ध संस्कृती आणि परंपरा अबाधित ठेवण्यावरही भर देण्यात येत आहे. विधिमंडळात आणि त्याबाहेरही महाराष्ट्राच्या संपन्न वारशाचा गौरव साजरा होत असल्याचे काही महत्त्वाचे क्षण नुकतेच पाहायला मिळाले. औद्योगिक धोरणांची नव्याने मांडणी – महाराष्ट्र जागतिक पटलावर झळकतोय! महाराष्ट्र सरकारने जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन औद्योगिक धोरणे...
मुंबई इंडियन्ससाठी दिलासादायक बातमी; हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाचे संकेत, KKR विरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता
IPL 2026 मध्ये निराशाजनक कामगिरीमुळे स्पर्धेबाहेर गेलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आता एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार Hardik Pandya लवकरच मैदानात पुनरागमन करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे आणि बॅक स्पॅझमच्या त्रासामुळे हार्दिकने चालू हंगामातील चार सामने गमावले होते. मात्र आता तो फिटनेसकडे वेगाने वाटचाल करत असून कोलकात्यात संघासोबत दाखल झाल्याने त्याच्या पुनरागमनाची चर्चा रंगली आहे. मुंबई...
नोएडामध्ये इन्फोसिसचा भव्य नवा कॅम्पस – रोजगार व गुंतवणुकीला नवी चालना!
नोएडा (उत्तर प्रदेश) : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आपला भव्य कॅम्पस उभारणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. या प्रकल्पामुळे आयटी क्षेत्रातील नवे दालन उघडण्यासोबतच स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. रोजगार निर्मिती व गुंतवणूकहा कॅम्पस तयार झाल्यानंतर हजारो तरुण अभियंते, आयटी व्यावसायिक व इतर कर्मचाऱ्यांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. इन्फोसिसकडून या प्रकल्पात...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण
पिंपरी, दि. २६ जानेवारी २०२६ : भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी उपस्थितांना तसेच शहरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, ‘भारतीय संविधानाच्या...
खाजगी कंत्राटी PMPML बसेसचा अपघाती ‘ट्रॅक रेकॉर्ड’ धोक्याचा; ३९ महिन्यांत ३८५ पैकी २३७ अपघात कंत्राटी बसांमुळे!
पुणे – पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि PMRDA अंतर्गत ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या PMPML बस सेवेमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, विशेषत: खाजगी कंत्राटदारांकडून चालवल्या जाणाऱ्या बससेवांमुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. PMPML च्या अधिकृत आकडेवारीनुसार एप्रिल २०२२ ते १० जून २०२५ या ३९ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३८५ बस अपघात घडले असून, त्यातील २३७ अपघात...









