Breaking News
७९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोपाळ मुखर्जींचा सन्मान; शुभेंदू अधिकारींच्या पुढाकाराने भाजपचा ऐतिहासिक निर्णय
कोलकाता : तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे १९४६ च्या दंगलीत बंगाली हिंदूंना वाचवणारे धाडसी योद्धा गोपाळ मुखर्जी यांचे नाव तब्बल ७९ वर्षे झाकोळलेले राहिले. इतिहासाच्या पानांमध्ये असामान्य शौर्य दाखवणाऱ्या या योद्ध्याचा सन्मान करण्याचे धाडस अखेर भारतीय जनता पक्षाने दाखवले आहे. भाजप नेते आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी पुढाकार घेत, गोपाळ मुखर्जी यांच्या पुतळ्याचे अनावरण करून बंगालच्या संस्कृतीला न्याय दिला....
खंडणीसाठी अपहरण! पुणे पोलिसांची तात्काळ कारवाई; २४ तासांत पिडीताची सुटका व गुन्हा उघडकीस
पुणे – वडगाव शेरी परिसरात कामावर निघालेल्या एका इसमाचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्याच्या मोबदल्यात २ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांनी केवळ २४ तासांत अटक करून पिडीताची सुटका केली आहे. ही धडाकेबाज व वेगवान कारवाई चंदननगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा विश्वास बसला आहे. घटनाक्रम : ३० जून २०२५ रोजी एक इसम कुबा मस्जिदजवळून...
लोणावळा घरफोडी प्रकरणातील मोठा खुलासा! ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; चार आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार अटकेत
लोणावळा – पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात घरफोडी प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करत तब्बल ३० लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत चार आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींची नावे अशी – 🔹 चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू (३२, रा. चाफेकरनगर, चिंचवड गाव)🔹 धनंजय हरीष काळे (२०, रा. भारतनगर झोपडपट्टी)🔹...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वित्झर्लंडमध्ये जल्लोषपूर्ण स्वागत!
झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मराठी बंधु-भगिनींच्या या प्रेमळ स्वागताने मुख्यमंत्री फडणवीस भारावून गेले आणि आपल्या भाषणातून त्यांनी मराठी अस्मितेचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल आहे, मला या प्रेमातच कायम राहायचे आहे!" त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्र भारताचे "पॉवर हाऊस" आहे आणि...
आई-वडिलांशी किरकोळ वाद… आणि थेट पुण्याला! पुणे पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे १६ वर्षीय मुलगी सुखरूप घरी परतली
पुणे :- हिंगोली जिल्ह्यातील एका लहानशा गावातून अचानक बेपत्ता झालेली १६ वर्षीय मुलगी पुण्यात सापडली. आई-वडिलांशी झालेल्या किरकोळ वादामुळे मानसिक तणावात आलेल्या या मुलीने कोणालाही न सांगता घर सोडले आणि पुणे गाठले. मात्र पुणे शहरातील पोलिसांच्या सजगतेमुळे आणि सहृदयतेमुळे ही मुलगी सुखरूप आपल्या कुटुंबाकडे परतली. पुण्यात पोहोचल्यावर ही मुलगी बुधवार पेठ परिसरात एकटीच फिरत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती, चिंता आणि...
मुंबईत BMC चा प्रकल्प बुडाला! अंधांसाठी टाकलेल्या टॅक्टाईल टाईल्स अवैध पार्किंगमुळे तुटल्या – Horniman Circle परिसरात बेशिस्त वाहनधारकांचा कहर
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहराला पादचारी-मैत्रीपूर्ण बनवण्यासाठी ‘पादचारी प्रथम’ धोरणांतर्गत लाखो रुपये खर्च करून केलेले काम पुन्हा एकदा निष्काळजीपणामुळे वाया जाण्याच्या मार्गावर आहे. फोर्ट परिसरातील Horniman Circle Garden जवळ शाहिद भगतसिंह रोडवर अंध व्यक्तींना चालताना मार्गदर्शन मिळावे म्हणून टाकलेल्या टॅक्टाईल टाईल्स फक्त एका वर्षातच मोडकळीस आल्या आहेत. अवैध पार्किंगमुळे झाला ऱ्हासBMC च्या A वॉर्ड कार्यालयाबाहेर, RBI मुख्यालयासमोर आणि इतर...
केयूडब्ल्यूजे महाराष्ट्र निवडणुकीत डॉ. शिवा मुदिगेरे अध्यक्ष, दयानंद सल्यान सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवडून; पत्रकार संघटनेला नवे नेतृत्व
नवी मुंबई :- पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटक वर्किंग जर्नलिस्ट असोसिएशन (Karnataka Working Journalists Association - KUWJ) च्या महाराष्ट्र युनिटच्या निवडणुकीत नव्या नेतृत्वाची निवड झाली आहे. २०२५ ते २०२८ या कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. शिवा मुदिगेरे यांची अध्यक्षपदी, तर सा. दया (दयानंद सल्यान) यांची सरचिटणीसपदी एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीची...
नसरापूर संतापाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात धक्कादायक घटना; ९ वर्षीय नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, आजोबा ताब्यात
पुणे | पर्वती : नसरापूरमधील भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Parvati परिसरात ७० वर्षीय व्यक्तीने आपल्या ९ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघड झाला आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झोपडपट्टी भागातील एका घरात घडली. आरोपीने मुलीला एकटे पाहून तिच्यावर अत्याचार करण्याचा...
१७ महिन्यांपासून फरार असलेला दरोडा प्रकरणातील आरोपी अटकेत; पुणे गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई
पुणे शहर पोलीस यांच्या गुन्हे शाखेतील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–१ ने तब्बल १७ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोडा व घातक शस्त्र बाळगण्याच्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा दि. १३/०२/२०२६ रोजी पथकातील पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उत्तमनगर...
गायक अरिजित सिंगच्या कार्यक्रमामुळे देहूरोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी; वाहनचालक त्रस्त
गहुंजे, १७ मार्च २०२५ : सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंग यांच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियम, गहुंजे येथे आयोजित कार्यक्रमामुळे देहूरोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रविवारी संध्याकाळी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने वाहने वाहतूक मार्गावर जमा झाल्याने वाहनचालकांना तब्बल १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी थांबावे लागले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत...







