Breaking News
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मधुकर दामोदर जोशी यांचा मानपत्र देऊन सन्मान
पिंपरी - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मानपत्र देऊन माझा सन्मान केला याचा आनंद आहे, परंतु त्याहून अधिक समाधान या महानगरपालिकेच्या सर्वांगीण प्रगतीकडे पाहून मिळत आहे. आजच्या घडीला अनेक महानगरपालिकांमध्ये कार्यातील समर्पकपणा आणि एकसंधता दिसून येत नाही मात्र येथे ती स्पष्टपणे जाणवते. सुखद आणि सुरक्षित निवास, सुलभ व परिणामकारक प्रवास व्यवस्था, आणि आपुलकीचा सहवास या अपेक्षा एक नागरिक म्हणून सर्वांच्या आहेत....
मुंबई इंडियन्ससाठी दिलासादायक बातमी; हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाचे संकेत, KKR विरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता
IPL 2026 मध्ये निराशाजनक कामगिरीमुळे स्पर्धेबाहेर गेलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आता एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार Hardik Pandya लवकरच मैदानात पुनरागमन करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे आणि बॅक स्पॅझमच्या त्रासामुळे हार्दिकने चालू हंगामातील चार सामने गमावले होते. मात्र आता तो फिटनेसकडे वेगाने वाटचाल करत असून कोलकात्यात संघासोबत दाखल झाल्याने त्याच्या पुनरागमनाची चर्चा रंगली आहे. मुंबई...
होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद
मावळ : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर दरीत पडून मृत्यू झाल्याचे मानले जात असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणाने आता अत्यंत धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला ही घटना अपघाती मृत्यू म्हणून पाहिली जात होती. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनंतर हे प्रकरण हत्येचे असू शकते, असा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या नव्या घडामोडीमुळे संपूर्ण पुणे...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन…
पिंपरी, १२ फेब्रुवारी २०२६ :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरात विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली आहे. या प्रबोधन पर्वात ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्यासह ‘शिवशंभो गर्जना’, ‘शाहीरी कार्यक्रम’,...
लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडी करणारा आरोपी २ तासांत जेरबंद, ४.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक करत ४,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. दिनांक १२/०२/२०२६ रोजी फिर्यादी यांनी घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि अंदाजे २,९०,००० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लोणी काळभोर...
मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात BMC ची धडक मोहीम; आयुक्त भूषण गगराणी यांची दादरमध्ये अचानक पाहणी
मुंबई महानगरातील रस्ते आणि पदपथ अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्त करण्यासाठी तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. Brihanmumbai Municipal Corporation (BMC) प्रशासनाच्या वतीने ही कारवाई प्रभावीपणे राबवली जात असून शहरातील विविध विभागांमध्ये सातत्याने पाहणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त Bhushan Gagrani यांनी आज एफ दक्षिण, एफ उत्तर आणि जी उत्तर विभाग कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात अचानक...
पिंपरीत ‘बेरोजगार एल्गार’ आंदोलनाचा आवाज बुलंद; तरुणांच्या १० प्रमुख मागण्यांसाठी झुरळं जनता पार्टीचे धरणे आंदोलन
पिंपरी : राज्यातील वाढत्या बेरोजगारी, रखडलेल्या नोकरभरती प्रक्रिया आणि वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात झुरळं जनता पार्टीच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘बेरोजगार एल्गार’ धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनात बेरोजगार युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनापूर्वी आयोजकांच्या वतीने हवेली तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले....
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा प्रचंड कहर! शिळफाटा जलमय, घरांमध्ये पाणी; मुंबई-नाशिक महामार्गावर किलोमीटरच्या रांगा
कल्याण | प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत केले आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने बुधवारी पुन्हा जोर धरत शहरातील अनेक भाग जलमय झाले. शिळफाटा परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक चारचाकी वाहने पाण्याखाली गेल्याचे भीषण चित्र समोर आले आहे. तर मुंबई-नाशिक महामार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांना तासन्तास अडकून...
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने ‘समर्पण दिन’ साजरा
पिंपरी चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६): भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी आणि 'समर्पण दिन' भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजप कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार...
“बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याची!” – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे परिवर्तनाचे ठाम आवाहन
पिंपरी–चिंचवड : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २५ (क) मध्ये प्रचाराला वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांनी आपल्या प्रभावी भाषणातून नागरिकांना परिवर्तनाचा संदेश दिला. “मी आहे – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी. एक शिक्षित महिला, कायद्याची जाण असलेली वकील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव उभी राहणारी कार्यकर्ती,” असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेची ठाम...









